औषधे आणि आरोग्य औषधशास्त्र आरोग्य

दुखापतीचे मूलभूत कारणे कोणती?

1 उत्तर
1 answers

दुखापतीचे मूलभूत कारणे कोणती?

1
दुखापतीची कारणं आणि संरक्षण


दुखापतीपासून संरक्षण
दुखापतीपासून संरक्षणाच्‍या बाबतीत माहिती आणि कार्य यांचे वाटप का आवश्‍यक आहे?
महत्‍वाचा संदेश
प्रत्‍येक कुटुंबास किंवा समुदायास दुखापतींपासून संरक्षणाच्‍या बाबतीत माहिती मिळविण्‍याचा अधिकार आहे का?
सहाय्यक माहिती: दुखापतींपासून संरक्षण
महत्‍वपूर्ण संदेश :जर आईवडील किंवा संगोपनकर्ता लहान मुलांकडे काळजीपूर्वक लक्ष देतील आणि त्‍यांच्‍या आसपासचे वातावरण सुरक्षित ठेवतील तर पुष्‍कळशा दुखापतींपासून संरक्षण केले जाऊ शकते.
महत्‍वाचा संदेश : मुलांना आग, कुकिंग स्‍टोव्‍ह, लैंप, काड्यांची पेटी आणि विजेच्‍या साधनांपासून दूर ठेवावे.
महत्‍वाचा संदेश : लहान मुलांना कोठे ही चढून जायला फार आवडते. जिने, बालकनी, गच्‍ची, खिडक्‍या आणि खेळण्‍याच्‍या जागा सुरक्षित असाव्‍यात म्‍हणजे मुले पडणार नाहीत व त्‍यांना दुखापत होणार नाही.
महत्‍वाचा संदेश : चाकू, कात्री, तीक्ष्‍ण आणि धारदार वस्‍तू आणि फुटक्‍या काचा यांमुळे फार गंभीर दुखापती होतात. अशा वस्‍तू लहान मुलांच्‍या हातास न लागतील अशा जागी ठेवाव्‍यात.
महत्‍वाचा संदेश : लहान मुलांना वस्‍तू तोंडात घालणे फार आवडते. लहान-सहान वस्‍तू त्‍यांचया घशात अडकू नयेत म्‍हणून त्‍यांच्‍या हाती लागणार नाहीत अशा जागी ठेवाव्‍यात.
महत्‍वाचा संदेश : विष, औषधे, ब्‍लीच, ऍसिड, आणि तरल इंधन जसे पैराफिन (रॉकेल तेल) कोणत्‍या ही पेयपदार्थांच्‍या बाटलीत ठेऊ नये. अशा प्रकारच्‍या वस्‍तू, पदार्थ आणि विष स्‍पष्‍टपणे खूण करून ठेवलेल्‍या कंटेनरांमध्‍ये (किंवा लिहिलेल्‍या) आणि मुलांच्‍या दृष्टिपासून दूर ठेवाव्‍यात.
महत्‍वाचा संदेश : मुले फार थोड्याशा पाण्‍यात दोन मिनिटांपेक्षा ही कमी वेळात बुडून जाऊ शकतात. त्‍यांना कधी ही एकटे सोडू नये जेव्‍हा ती पाण्‍याच्‍या जवळपास असतील किंवा पाण्‍यात असतील.
महत्‍वाचा संदेश : विशेषत: पाच वर्षापेक्षा लहान वयाच्‍या मुलांना रस्‍त्‍यांत अपघात होण्‍याची फार शक्‍यता असते. त्‍यांच्‍या बरोबर नेहमी कोणी तरी मोठे असायला हवे आणि त्‍यांनी पायी चालणे शिकतांच त्‍यांना रस्‍त्‍याचे सुरक्षित नियम शिकवायला हवे.
दुखापतीपासून संरक्षणाच्‍या बाबतीत माहिती आणि कार्य यांचे वाटप का आवश्‍यक आहे?
दर वर्षी, 750,000 मुलांना दुखापत झाल्‍याने मृत्‍युमुखी पडतात. इतर 400 मिलियन मुलांना गंभीर दुखापती होतात. पुष्‍कळदा दुखापत झाल्‍याने कायमचे पंगुत्‍व देखील येते किंवा मेंदूला हानि (ब्रेन हॅमरेज) पोचते. दुखापत होणे हे लहान मुलांमध्‍ये पंगुत्‍व आणि मृत्‍यु येणे यांचे एक मुख्‍य कारण आहे.

पडणे, भाजणे, पाण्‍यात वाहून जाणे किंवा बुडणे तसेच रस्‍त्‍यातील अपघात ह्या बहुतेक सामान्‍य प्रकारच्‍या दुखापती आहेत. यांतील पुष्‍कळशा दुखापती घराच्‍या आंतमध्‍ये किंवा जवळपास लागतात. सामान्‍यपणे, सर्व प्रकारच्‍या दुखापतींपासून संरक्षण केले जाऊ शकते. पुष्‍कळशा दुखापतींची गंभीरता कमी होऊ शकली असती जर आईवडिलांस हे ठाऊक असते की दुखापत झाल्‍यावर काय करावे.

महत्‍वाचा संदेश
प्रत्‍येक कुटुंबास किंवा समुदायास दुखापतींपासून संरक्षणाच्‍या बाबतीत माहिती मिळविण्‍याचा अधिकार आहे का?
जर आईवडील किंवा संगोपनकर्ता लहान मुलांकडे काळजीपूर्वक लक्ष देतील आणि त्‍यांच्‍या आसपासचे वातावरण सुरक्षित ठेवतील तर पुष्‍कळशा दुखापतींपासून संरक्षण केले जाऊ शकते.
मुलांना आग, कुकिंग स्‍टोव्‍ह, लैंप, काड्यांची पेटी आणि विजेच्‍या साधनांपासून दूर ठेवावे.
लहान मुलांना कोठे ही चढून जायला फार आवडते. जिने, बालकनी, गच्‍ची, खिडक्‍या आणि खेळण्‍याच्‍या जागा सुरक्षित असाव्‍यात म्‍हणजे मुले पडणार नाहीत व त्‍यांना दुखापत होणार नाही.
चाकू, कात्री, तीक्ष्‍ण आणि धारदार वस्‍तू आणि फुटक्‍या काचा यांमुळे फार गंभीर दुखापती होतात. अशा वस्‍तू लहान मुलांच्‍या हातास न लागतील अशा जागी ठेवाव्‍यात.
लहान मुलांना वस्‍तू तोंडात घालणे फार आवडते. लहान-सहान वस्‍तू त्‍यांच्या घशात अडकू नयेत म्‍हणून त्‍यांच्‍या हाती लागणार नाहीत अशा जागी ठेवाव्‍यात.
विष, औषधे, ब्‍लीच ऍसिड, आणि तरल इंधन जसे पैराफिन (रॉकेल तेल) कोणत्‍या ही पेयपदार्थांच्‍या बाटलीत ठेऊ नये. अशा प्रकारच्‍या वस्‍तू, पदार्थ आणि विष स्‍पष्‍टपणे खूण करून ठेवलेल्‍या कंटेनरांमध्‍ये (किंवा लिहिलेल्‍या) आणि मुलांच्‍या दृष्टिपासून दूर ठेवाव्‍यात.
मुले फार थोड्याशा पाण्‍यात दोन मिनिटांपेक्षा ही कमी वेळात बुडून जाऊ शकतात. त्‍यांना कधी ही एकटे सोडू नये जेव्‍हा ती पाण्‍याच्‍या जवळपास असतील किंवा पाण्‍यात असतील.
विशेषत: पाच वर्षापेक्षा लहान वयाच्‍या मुलांना रस्‍त्‍यांत अपघात होण्‍याची फार शक्‍यता असते. त्‍यांच्‍या बरोबर नेहमी कोणी तरी मोठे असायला हवे आणि त्‍यांनी पायी चालणे शिकतांच त्‍यांना रस्‍त्‍याचे सुरक्षित नियम शिकवायला हवे.
सहाय्यक माहिती: दुखापतींपासून संरक्षण
महत्‍वपूर्ण संदेश :जर आईवडील किंवा संगोपनकर्ता लहान मुलांकडे काळजीपूर्वक लक्ष देतील आणि त्‍यांच्‍या आसपासचे वातावरण सुरक्षित ठेवतील तर पुष्‍कळशा दुखापतींपासून संरक्षण केले जाऊ शकते.
18 महिने अ‍ाणि 4 वर्षे वयाच्‍या मुलांना मृत्‍यु व गंभीर दुखापत होण्‍याची शक्‍यता असते. यांतील पुष्‍कळशा दुखापती घरातच होतात. तरी पण या सर्वांपासून बचाव केला जाऊ शकतो.

घरातच होऊ शकतील अशा दुखापतींची मुख्‍य कारणे:

आग, स्‍टोव्‍ह, ओव्‍हन, स्‍वयंपाकाची भांडी, गरम पदार्थ, उकळते पाणी, वाफ, गरम तेल, तूप इत्‍यादि), घासलेटचा दिवा (केरोसिन लैंप), इस्‍तरी आणि विजेच्‍या उपकरणांनी भाजणे
फुटक्‍या काचा, चाकू, कात्री किंवा कुदळ/फावडे इत्‍यादि
पलंग, खिडकी, टेबल आणि जिन्‍यावरून पडणे
नाणी, बटणे आणि नटस् यासारख्‍या वस्‍तू गिळणे
रॉकेल, किटकनाशके, ब्‍लीच आणि डिटर्जेंट (कपडे धुण्‍याचा साबण, पावडर)
विजेच्‍या तुटक्‍या उपकरणांना किंवा तारेला हात लावणे, किंवा विजेच्‍या कुठल्‍याही आउटलेटमध्‍ये काड्या किंवा चाकू इत्‍यादिंसारख्‍या वस्‍तू घालणे यांमुळे शॉक (करंट) लागणे
जे काही ही लहान मुलांसाठी धोक्‍याचे आहे ते सुरक्षित जागी, त्‍यांच्‍या हाती लागणार नाही असे ठेवावे.

मुलांकडून कधी ही तासन् तास काम करण्‍याची किंवा असे कोणते ही काम करण्‍याची अपेक्षा बाळगू नये जे त्‍यांच्‍या शाळेच्‍या कामात बाधक ठरेल, असे काही ही काम करण्‍याची अपेक्षा करू नये.

भारी श्रम, जोखमीची हत्‍यारे आणि विषारी रसायने यांपासून मुलांना नेहमीच दूर ठेवावे.

महत्‍वाचा संदेश : मुलांना आग, कुकिंग स्‍टोव्‍ह, लैंप, काड्यांची पेटी आणि विजेच्‍या साधनांपासून दूर ठेवावे.
भाजणे व भाजल्‍याने चट्टे पडणे/दाह लहान मुलांना होणारी गंभीर दुखापत आहे. मुलांनी कुकिंग स्‍टोव्‍ह, उकळते पाणी, गरम पदार्थ आणि गरम इस्‍तरी (प्रेस) यांना स्‍पर्श करण्‍यापासून बचाव करायला हवा. भाजल्‍यामुळे गंभीर दुखापत होते आणि नेहमी करीता डाग पडतात तसेच मृत्‍यु देखील येऊ शकतो. यापैकी पुष्‍कळ उपाय बचावात्‍मक आहेत.

भाजण्‍यापासून संरक्षण असे होऊ शकते:

लहान मुलांना काडेपेटी, आग व सिगारेटपासून दूर ठेवावे.
स्‍टोव्‍ह मुलांच्‍या हातापासून लांब एखाद्या उंच सपाट जागी ठेवावा. जर चूल वापरत असाल तर ती देखील जमिनीवर न मांडता उंचावर मांडावी.
स्‍वयंपाकाची सारी भांडीदेखील त्‍यांचे हैंडल मुलांच्‍या हातापासून दूर फिरवून ठेवावे.
रॉकेल, पेट्रोल, लैंप, काडेपेटी, मेणबत्ती, लायटर्स, गरम प्रेस आणि विजेच्‍या तारा मुलांपासून दूर ठेवा.
मुलांना गंभीर दुखापत होऊ शकते जर ते विजेच्‍या सॉकेटमध्‍ये बोटे घालतील किंवा इतर काही घालतील. संरक्षणासाठी पावर सॉकेटस् कव्‍हर करून ठेवायला हवी.

विजेच्‍या तारा मुलांपासून दूर ठेवा. विशेषरीत्‍या विजेच्‍या नेकेड तारा फार धोक्‍याच्या असतात.

महत्‍वाचा संदेश : लहान मुलांना कोठे ही चढून जायला फार आवडते. जिने, बालकनी, गच्‍ची, खिडक्‍या आणि खेळण्‍याच्‍या जागा सुरक्षित असाव्‍यात म्‍हणजे मुले पडणार नाहीत व त्‍यांना दुखापत होणार नाही.
ओरखडे, अस्थिभंग आणि डोक्‍याच्‍या गंभीर दुखापतींचे एक कारण पडणे हे आहे. गंभीर दुखापत होईल अशा प्रकारे पडण्‍यापासून अशा प्रकारे बचाव करता येतो:

मुलांना असुरक्षित जागी चढण्‍यापासून परावृत्त करणे.
जिने, खिडक्‍या आणि बालकन्‍यांमध्‍ये रेलिंग लावाव्‍यात
घर स्‍वच्‍छ आणि प्रकाशमय ठेवावे.
महत्‍वाचा संदेश : चाकू, कात्री, तीक्ष्‍ण आणि धारदार वस्‍तू आणि फुटक्‍या काचा यांमुळे फार गंभीर दुखापती होतात. अशा वस्‍तू लहान मुलांच्‍या हातास न लागतील अशा जागी ठेवाव्‍यात.
फुटक्‍या काचेमुळे गंभीर जखम होऊ शकते, रक्‍त वाहू शकते आणि जखमांना संसर्ग होऊ शकतो. काचेच्‍या बाटल्‍या लहान मुलांच्‍या हाती लागणार नाहीत अशा ठेवाव्‍यात, आणि घर व खेळण्‍याच्‍या जागी काच नाही याची खात्री करून घ्‍यायला हवी. लहान मुलांना काचेस हात न लावण्‍याबाबत शिकविले पाहिजे, मोठ्या मुलांना शिकवायला हवे की त्‍यांनी फुटक्‍या काचा काळजीपूर्वक फेकून द्याव्‍यात.

चाकू, रेझर आणि कात्री यांसारख्‍या वस्‍तू लहान मुलांच्‍या हाती लागणार नाहीत अशा ठेवाव्‍यात. मोठ्या मुलांना अशा वस्‍तू काळजीपूर्वक हाताळायला शिकवावे.

धातूच्‍या टोकदार वस्‍तू, यंत्रे आणि गंज लागलेल्‍या डब्‍यांपासून गंभीर संसर्गजन्‍य जखमा होतात. मुलांच्‍या खेळण्‍याच्‍या जागांवर अशा वस्‍तू नाहीत याची काळजी घ्‍यायला हवी. घरातील केर-कचरा, ज्‍यांमध्‍ये फुटक्‍या बाटल्‍या व जुने डबे असतील, काळजीपूर्वक फेकून द्यावेत.

घरातील इतर दुखापतींपासून बचावाच्‍या बाबतीत मुलांना शिकवायला हवे की त्‍यांनी दगड किंवा इतर तीक्ष्‍ण धारेच्‍या वस्‍तू, कात्री, चाकू इत्‍यादि वस्‍तूंशी खेळू नये, दुखापत होते.

महत्‍वाचा संदेश : लहान मुलांना वस्‍तू तोंडात घालणे फार आवडते. लहान-सहान वस्‍तू त्‍यांचया घशात अडकू नयेत म्‍हणून त्‍यांच्‍या हाती लागणार नाहीत अशा जागी ठेवाव्‍यात.
खेळण्‍याच्‍या आणि झोपण्‍याच्‍या जागेवर बारीक वस्‍तू जसे बटणे, मोती, नाणी, बिया आणि नट-स्‍क्रू इत्‍यादि नसावेत.

फार लहान मुलांना शेंगा, कडक मिठाई किंवा लहान हाडे किंवा बिया असलेले पदार्थ खाण्‍यास देऊ नयेत.

खोकणे, तोंडात काही तरी कोंबणे आणि जोरात बोलणे किंवा किंवा बोलण्‍यास त्रास होणे ही सर्व श्‍वास घेण्‍यास त्रास होत असल्‍याची लक्षणे आहेत किंवा गुदमरण्‍याचा संकेत देतात.

श्‍वास गुदमरल्‍याने मृत्‍यूसुध्‍दा होतो, ही आणीबाणीजन्‍य स्थिति आहे. संगोपनकर्ताने अचानक मूल गप्‍प झाल्‍यास किंवा बोलतांना किंवा आवाज करतांना त्‍याला त्रास पडत असलेला पाहिल्‍यास ताबडतोब श्‍वास गुदमरला असल्‍याची शक्‍यता समजावी, जरी कोणी ही मुलास काही ही तोंडात घालतांना पाहिले नसले तरी ही.

महत्‍वाचा संदेश : विष, औषधे, ब्‍लीच, ऍसिड, आणि तरल इंधन जसे पैराफिन (रॉकेल तेल) कोणत्‍या ही पेयपदार्थांच्‍या बाटलीत ठेऊ नये. अशा प्रकारच्‍या वस्‍तू, पदार्थ आणि विष स्‍पष्‍टपणे खूण करून ठेवलेल्‍या कंटेनरांमध्‍ये (किंवा लिहिलेल्‍या) आणि मुलांच्‍या दृष्टिपासून दूर ठेवाव्‍यात.
विषबाधा म्‍हणजे मुलांनी विष प्‍यायले तर हा फारच गंभीर धोका आहे. ब्‍लीच, किटकनाशक किंवा उंदीर मारायचे औषध, रॉकेल आणि घरगुती डिटर्जंट मुलांसाठी जीवघेणे ठरते किंवा आयुष्‍यभरासाठी निकामी करते.

पुष्‍कळशी विषे अशी असतात जी तोंडाद्वारे पोटात नसतील गेली तरी ही फारच घातक ठरतात. यांच्‍यामुळे मृत्‍यु येतो, मेंदू निकामी होतो, अंधत्‍व किंवा आयुष्‍यभरासाठी वैगुण्‍य येते, जर:

श्‍वासाद्वारे शरीरात गेल्‍यास
मुलांच्‍या त्‍वचेवर लागल्‍यास किंवा डोळ्यात गेल्‍यास
मुलांच्‍या कपड्यांवर लागल्‍यास
विषारी औषधे जर पेय पदार्थांच्‍या बाटल्‍यांमध्‍ये, बियरच्‍या बाटल्‍यांमध्‍ये, बरणी किंवा कपात ठेवल्‍यास मुले चुकीने अशा वस्‍तू पिऊ शकतात. सर्व औषधे, रसायने आणि विष त्‍यांच्‍या मूळ पॅकिंगमध्‍येच (ओरिजिनल पॅकिंग), करकचून बंद करून ठेवावे.

डिटर्जंट, ब्‍लीच, रसायने आणि औषधे कधी ही अशा जागी ठेवू नये जेथे मुले पोचू शकतात. त्‍यांना करकचून लेबल लावून ठेवावे किंवा कुलूप लावून कपाटात किंवा पेटीत ठेवावे जेथे ती मुलांच्‍या दृष्टिआड असतील.

प्रौढांची औषधे मुलांच्‍या मरणाचे करण ठरू शकतात. कोणते ही औषध मुलास तेव्‍हाच द्यावे जेव्‍हा ते मुलासाठीच लिहून दिलेले असेल. कधी ही मुलास मोठ्यांची औषधे देवू नयेत.

ऍन्टिबायोटिक्‍सचा उपयोग किंवा चुकीचा उपयोग मुलांमध्‍ये बहिरेपणाचे कारण ठरू शकते. औषधांचा उपयोग फक्‍त आरोग्‍य कर्मचारी सांगतील त्‍याप्रमाणे करावा.

एस्पिरिन विष-अपघाताचे एक सामान्‍य कारण आहे. हे मुलांच्‍या दृष्टि आणि हातांपासून दूर ठेवावे.

महत्‍वाचा संदेश : मुले फार थोड्याशा पाण्‍यात दोन मिनिटांपेक्षा ही कमी वेळात बुडून जाऊ शकतात. त्‍यांना कधी ही एकटे सोडू नये जेव्‍हा ती पाण्‍याच्‍या जवळपास असतील किंवा पाण्‍यात असतील.
विहीर, टब आणि पाण्‍याने भरलेल्‍या बादल्‍या झाकून ठेवाव्‍यात.
मुलांना लहानपणीच पोहायला शिकवावे म्‍हणजे त्‍यांना बुडण्‍याचा धोका कधा ही राहणार नाही.
मुलांना कधी ही जोरदार प्रवाह असलेल्‍या पाण्‍यात एकटे पोहू देवू नये.
महत्‍वाचा संदेश : विशेषत: पाच वर्षापेक्षा लहान वयाच्‍या मुलांना रस्‍त्‍यांत अपघात होण्‍याची फार शक्‍यता असते. त्‍यांच्‍या बरोबर नेहमी कोणी तरी मोठे असायला हवे आणि त्‍यांनी पायी चालणे शिकतांच त्‍यांना रस्‍त्‍याचे सुरक्षित नियम शिकवायला हवे.
लहान मुले रस्‍त्यावर धावण्‍याआधी विचार करीत नसतात. कुटुंबियांनी त्‍यांच्‍याकडे लक्षा ठेवावे.

मुलांनी चेंडू खेळत असता रस्‍त्‍याच्‍या कडेला अजिबात खेळू नये.

मुलांना रस्‍त्‍याच्‍या कडेला ट्रॅफिकच्‍या दिशेने तोंड करून चालायला शिकवावे (म्‍हणजे समोरून येत असलेली वाहने दिसतात).

रस्‍ता ओलांडतांना, मुलांना शिकवायला हव्‍या त्‍या काही गोष्‍टी:

रस्‍त्‍याच्‍या कडेला थांबावे
दोन्‍ही बाजूंना पहावे
रस्‍ता ओलांडतांना येत असलेल्‍या वाहनांचा आवाज ऐकावा
कोणाचा तरी हात धरून रस्‍ता ओलांडावा
रस्‍त्‍याने चालावे, धावू नये
मोठ्या मुलांना लहान मुलांची काळजी घेण्‍याची आणि एक चांगले उदाहरण समोर प्रस्‍तुत करण्‍यासाठी प्रोत्‍साहन द्यायला हवे.

सायकल अपघात हा मोठ्या मुलांमध्‍ये दुखापत आणि मृत्‍युचे सामान्‍य कारण आहे. कुटुंबियांनी याबाबत लक्ष द्यावे की मुलांना रस्‍ता सुरक्षिततेचे नियम शिकविलेले आहेत. या प्रकारे ते सायकल अपघातापासून सुरक्षित राहू शकतात. सायकल चालवितांना मुलांनी हेलमेट किंवा सुरक्षात्‍मक हेडगियर अवश्‍य घालायला हवे.

जेव्‍हा मुले गाडीच्‍या पुढच्‍या सीट वर किंवा एखाद्या ट्रकच्‍या बेड वर कोणाच्‍या दृष्टिपासून दूर किंवा निरीक्षणाआड असतात तेव्‍हा गंभीर दुखापतीचा धोका उद्भवतो.

प्राथमिक उपचार परामर्श वैद्यकीय मदत ताबडतोब न मिळाल्‍यास कोणती ही परिस्थिति बिघडणे किंवा गंभीर होण्‍यापासून बचावासाठी हे प्राथमिक उपचार उपाय करावेत.

भाजल्‍यावर प्राथमिक उपचार:

जर मुलांच्‍या कपड्यांमध्‍येच आग लागली तर त्‍याला ताबडतोब एखाद्या कांबळ्यात किंवा कपड्यांत गुंडाळून आग विझविण्‍यासाठी जमिनीवर लोळवावे. (रोल करावे म्हणजे आग विझेल).
भाजलेला भाग ताबडतोब थंड करावा. पुष्‍कळशा थंड व स्‍वच्‍छ पाण्‍याचा उपयोग करावा, जर जास्‍त भाजलेले असेल तर, मुलास थंड पाण्‍याच्‍या टबमध्‍ये किंवा बेसिनमध्‍ये ठेवावे. भाजलेला भाग थंड व्‍हायला अर्धा तास लागू शकतो.
भाजलेला भाग स्‍वच्‍छ आणि कोरडा ठेवावा आणि त्‍याला सुरक्षित ठेवण्‍यासाठी एक बँडेज ढीले बांधावे. जर एका नाण्‍याच्‍या आकारापेक्षा जास्‍त भाजले असेल आणि जर भाजल्‍याचा फोड उभारू लागला असेल तर, मुलास आरोग्‍य कर्मचार्याकडे घेवून जावे. फोड सोलू किंवा फोडू नका, कारण ते भाजल्‍या जागेला संसर्गापासून सुरक्षित ठेवतात.
भाजल्‍या जागी चिकटलेले कोणते ही कपडे फाडू नये. भाजल्‍या जागी पाण्‍याखेरीज काही ही लावू नये.
मुलांना पेय पदार्थ प्‍यायला द्यावा जसे फळांचा रस किंवा थोडीशी साखर आणि मीठ एकत्र केलेले पाणी.
शॉक लागल्‍यावर प्राथमिक उपचार:

जर मुलास शॉक लागला असेल तर किंवा शॉक लागल्‍याने भाजले असेल तर सर्वांत आधी म्‍हणजे मुलास स्‍पर्श करण्‍याआधी मेन स्विच बंद करावा. जरमूल बेशुध्‍द झाले तर, त्‍यास गरम ठेवाव आणि ताबडतोब डॉक्‍टरी मदत घ्‍यावी.
जर मुलास श्‍वास घेण्‍यास त्रास होत असेल किंवा ते श्‍वासच धेवू शकत नसेल तर, मुलास उताणे निजवावे आणि त्‍याचे डोके थोडे-से मागच्‍या बाजूस झुकवावे. मुलाच्‍या नाकपुड्या बंद करा आणि त्‍याच्‍या तोंडात फुंकर मारा. इतक्‍या जोराने फुंका की मुलाची छाती फुगेल. तीन पर्यंत मोजा व पुन्‍हा असेच करा तोपर्यंत करा जोपर्यंत मूल श्वास घेणे सुरू करीत नाही (असे करून देखील मूल श्‍वास घेत नसेल तर ताबडतोब डॉक्‍टरची मदत घ्‍या).
रस्‍त्‍यातील अपघात किंवा पडण्‍यावर प्राथमिक उपचार:

डोके किंवा पाठीच्‍या कण्‍याला दुखापत झाल्‍यास, विशेषत: मानेत, फार जासत धोक्‍याचे आहे कारण यामुळे जन्‍मभरासाठी लकवा होतो किंवा मरण देखील येते. जर अशी दुखापत झाली असेल तर पाठ किंवा डोके हलवू नये आणि जास्‍त हानि होवू नये म्‍हणून पाठीच्‍या कण्‍याची देखील हालचाल करू नये.
जर मूल हलू शकत नसेल किंवा त्‍यास फारच जास्‍त दुखत असेल तर त्‍याचे हाड मोडले असल्‍याची शक्‍यता आहे. इजा झालेली जागा (शरीराची) हलवू नये. त्‍याला आरामदायक पोझिशनमध्‍ये धरून ताबडतोब डॉक्‍टरची मदत घ्‍या.
जर मूल बेशुध्‍द झाले असेल तर त्‍याला गरम ठेवा आणि ताबडतोब डॉक्‍टरची मदत घ्‍या.
वाईट ओरखडे किंवा मुरगळले असेल तर, 15 मिनिटांसाठी दुखापत झाल्‍या जागी पाणी घाला किंवा बर्फ लावा. बर्फ सरळ त्‍वचेवर लावू नये, तर कापडात गुंडाळून मग लावावा. बर्फ किंवा पाणी बाजूला सारा आणि 15 मिनिटांनी गरल भासल्‍यास पुन्‍हा असे करा. थंडपणामुळे दुखणे, सूज आणि ओरखडे या सर्व बाबतीत आराम वाटेल.
कापल्‍यावर आणि जखमेवर प्राथमिक उपचार:

साधारण कापल्‍यावर किंवा जखमेवर प्राथमिक उपचार:

कापलेली जागा किंवा जखम चांगल्‍या प्रकारे स्‍वच्‍छ पाणी (स्‍वच्‍छ पाणी उकळून थंड केलेले) किंवा साबणाने चांगले स्‍वच्‍छ करा.
जखमेच्‍या जवळपासची जागा कोरडी करा.
जखम बँडेजने गुंडाळून टाका.
गंभीर दुखापत किंवा जखमांसाठी:

जर जखमेत कांच किंवा इतर काही तरी रूतलेले असेल तर त्‍यास ओढून काढू नका. कदाचित यामुळे जास्‍त रक्‍त वाहणार नाही असे होवू शकते, ओढून काढल्‍यास रक्‍त जास्‍त वाहून जाण्‍याची शक्‍यता आहे.
जर मुलाचे जास्‍त रक्‍त वाहून जात आहे, तर दुखापत झालेल्‍या जागेला (किंवा जखमेच्‍या जवळपास काही तरी रूतलेले असल्‍यास) त्‍याच्‍या छातीच्‍या लेव्‍हलच्‍या ही वर एखा़द्या स्‍वच्‍छ कापडाने करकचून दाबून धरा. जोपर्यत रक्‍त वाहणे थांबत नाही असेच धरून ठेवा.
एखादी वनस्‍पति किंवा एखाद्या जनावराचे शेण यांसारख्‍या वस्‍तू जखमेवर लावू नये यामुळे इन्‍फेक्‍शन (संसर्ग) होवू शकतो.
जखमेवर बँडेज ठेवा. बँडेज ढीले ठेवून सूज येत असल्‍यास येवू द्या.
मुलास ताबडतोब आरोग्‍य केंद्रात घेवून जा, डॉक्‍टरची मदत घ्‍या, आणि मुलास धनुवार्ताचे इंजेक्‍शन लावण्‍याबाबत विचारा.
काही तरी गिळल्‍यावर प्राथमिक उपचार:
जर मूल खोकत असेल तर त्‍यात हस्‍तक्षेप करू नका. (त्‍याला डिस्‍टर्ब करू नका) – त्‍याच्‍या घश्‍यातून ती वस्‍तू खोकून निघू शकत असेल तर काढू द्या. जर वस्‍तू मुलाच्‍या तोंडातून निघाली नाही तर काढण्‍याचा प्रयत्‍न करा.
जर ती वस्‍तू मुलाच्‍या घशात अजून ही अडकलेली असेल तर:
तान्‍ह्या किंवा लहान मुलांसाठी: (For Infants or young children)

डोके व मानेला आधार द्या. मुलास उलटे करा. त्‍याची पाठ आणि खादद्यांच्‍या मध्‍यभागी पांच गुद्दे मारा (फार जोरात नाही). मग मुलाचा चेहरा थोडा वर उचला व त्‍याच्‍या छातीला निप्‍पल्सच्‍यामध्‍ये पाच वेळा जोरात दाबा. अजून ही जा अडकलेली वस्‍तू निघाली नाही तर किंवा वेळ लागत असेल तर ताबडतोब डॉक्‍टरची मदत घ्‍या.

मोठ्या मुलांसाठी:

मुलाच्‍या मागे उभे राहून त्‍याच्‍या कमरेत आपले दोन्‍ही हात घालून आपले दोन्‍ही हात धरा. आपल्‍या हाताच्‍या अंगठ्यास मुठीत बंद करून मुलाच्‍या नाभीच्‍या (बेंबीच्‍या) वर

च्‍या बाजूस पण फासळ्यांच्‍या खाली दाबून टाका. दुसरा हात पहिल्‍या हाताच्‍या वरून आणीत मुलाच्‍या पोटाला आत व बाहेर असे हिसके द्या. जोपर्यंत वस्‍तू निघत नाही तोपर्यंत असे करा किंवा जास्‍त वेळ लागल्‍यास मुलास आरोग्‍य केंद्रात घेवून जा.

श्‍वास घेण्‍यास त्रास होत असल्‍यास किंवा बुडण्‍याच्‍या परिस्थितित प्राथमिक उपचार

जर मान आणि डोक्‍यात इजा झाल्‍याची शक्‍यता असेल तर, मुलाचे डोके हलवू नका. त्‍याचे डोके न हलविता खाली दिलेल्‍या निर्देशांचे पालन करा.
जर मुलास श्‍वास घेण्‍यास त्रास होत असेल तर किंवा जर मूल श्‍वास घेत नसेल तर, मुलास उताणे निजवावे आणि त्याचे डोके थोडे मागे वाकवावे. मुलाच्‍या नाकपुड्या बंद करा आणि त्‍याच्‍या तोंडात फुंकर घाला. इतक्‍या जोरात फुंकर मारा की त्‍याची छाती फुगेल. तीन पर्यंत मोजा आणि पुन्‍हा असेच करा जोपर्यंत मूल श्‍वास घेणे सुरू करीत नाही.
जर मूल श्‍वास घेत असेल व बेशुध्‍द असेल तर, त्‍याला एका कुशीवर निजवावे ज्‍यायोगे त्‍याची जीभ श्‍वासोच्‍छवासात अडथळा आणणार नाही.

विषबाधेवर प्राथमिक उपचार:

जर मुलाने विष गिळले असेल तर, मुलास वांती करविण्‍याचा प्रयत्‍न करू नका. यामुळे ते जास्‍त आजारी होईल.
जर मुलाच्‍या कपड्यांवर आणि त्‍वचेवर विष लागले असेल तर त्‍वचेवर खूप सारे पाणी टाकून साबणाने धुवून टाका. साबणाने त्‍वचा खूप वेळा धुवून टाका.
जर विष मुलाच्‍या डोळ्यात गेले असेल तर, स्‍वच्‍छ पाण्‍याने डोळ्यांवर कमीत कमी 10 मिनिटे हबके मारावेत.
मुलास ताबडतोब आरोग्‍य केंद्र किंवा इस्पितळात घेवून जावे. शक्‍यतोवर मुलास जास्‍त हलवू नये, शांत ठेवावे.
 


उत्तर लिहिले · 30/11/2021
कर्म · 121725

Related Questions

भारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणती केमिकल फवारले जाते?
ज्या आजारात दुखण्याचा त्रास होतो, त्या आजारात दुखणं थांबण्यासाठी जे औषध/गोळ्या दिल्या जातात त्यामध्ये स्टेराँइड असते का? व स्टेराँइड वापरण्याने हाडे ठिसूळ होण्याचा किंवा इतर काही त्रास होण्याचा धोका असतो का?
काही औषधांच्या गोळ्यांवर मध्यभागी एक रेष असते जिथे ती गोळी अर्धी तोडता येईल.काही औषधांवर अशी रेष नसते.हा फरक का असतो?
उंदरीसाठी औषध कोणते?
एकाद्या त्रासासाठी आयुर्वेदिक औषध जास्त काळ म्हणजे एक दिड वर्ष घेतल्यास काहि दुसरा शारिरीक त्रास उद्भवू शकतो का?
ज्याप्रमाणे औषधाने त्रास/आजार/रोगबरे होतात त्याचप्रमाणे प्राणिक/काँस्मिक/रेकी या वैश्विक उर्जा असलेल्या उपचार पध्दतीने हिलिंग दिले असता त्रास/आजार/रोग बरे होतात का?
चाफ्याच्या शेंगाचा औषधी उपयोग काय?