औषधे आणि आरोग्य औषधशास्त्र

उंदरीसाठी औषध कोणते?

1 उत्तर
1 answers

उंदरीसाठी औषध कोणते?

0
    उंदरांचा त्रास होतोय?, मग 'असे' करा घरगुती उपाय


हिवाळा आला की अनेक प्रकारचे किटक, पाखरं आणि उंदीर घरात येऊ लागतात. ते घरात आल्याने लोकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. मात्र, या समस्येवरवर तोडगा कसा काढायचा असा विचार करत असाल, तर हे घरगूती उपाय करा अणि अगदी सगजच त्यांना घराबाहेर काढा. पाहूयात मग कोणते आहेत ते घरगूती उपाय...


पेपरमिंट ऑइल
पेपरमिंट ऑइलच्या सुगंधाचा उंदरांना भरपूर त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला घरातील उंदरांची लपण्याची जागा माहीत असेल, तर राईत थोडसं पेपरमिंट ऑइल टाकून त्या जागी ठेवा. हा उपाय फक्त एकदा न करता आठवडाभर करायचा आहे. असे केल्याने नक्कीच तुम्ही उंदरांच्या त्रसापासून मुक्त व्हाल.



बटाट्याची पावडर
तुमच्या घरात ज्या ठिकाणी उंदीर येऊन लपतात, अशा ठिकाणी बटाट्याची पावडर टाकून ठेवा. बटाट्याची पावडर खाल्ल्याने पावडरमधील काही घटकांमुळे उंदीरांच्या आतड्यांत सूज येते, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू होतो.


कांद्याचा वास
काद्याच्या वासाचा त्रास जसा आपल्याला होतो, तसाच, किटक, पाखरं आणि उंदरांनाही होतो. मात्र, हा उपाय घरात करणं थोडं कठीण आहे. कारण कांदा लवकर खराब होतो आणि खराब झालेला कांदा जर तुमच्या घरातील पाळीव प्राण्यांनी खाल्ला तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दर दोन दिवसांनी चांगला कांदा ठेवा.


कोको पावडर
सुकलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये कोको पावडर टाका, ते मिक्स करून त्याचं मिश्रण उंदराच्या लपण्याच्या ठिकाणी ठेवा. एकदा का उंदरांनी हे मिश्रण खाल्ल की ते पाण्याच्या शोधात बाहेर जातील आणि काही सेकंदातच त्याचा मृत्यू होईल.

मिर्ची पावडर
उंदरांना घरातून बाहेर काडण्यासाठी मिर्ची पावडर हा अत्यंत सोपा उपाय आहे. मिर्चीच्या पावडरचा उपयोग जनावरांना झाडांपासून दूर ठेवण्यासाठीही केला जातो. त्यामुळे ज्या ठिकाणाहून उंदीर घरात येतात त्या ठिकाणी मिर्चीची पावडर टाकून ठेवा.


लसणाच्या पाकळ्या
उंदरांना घरातून बाहेर काढण्याचा आणखी एक सोपा उपाय आहे. लसूण किंवा लसणाच्या पाकळ्या आणि पाणी एकत्र करा आणि ते पाणी उंदीर घरात ज्या ठिकाणी फिरतात अशा ठिकाणी ठेवा.



लवंग किंवा लवंग तेल
उंदरांना लवंगाच्या वासाचा त्रास होतो. त्यामुळे मलमपट्टीत मुठभर लवंग गुंडाळून ती लवंगपट्टी उंदरांच्या बिळाबाहेर ठेवा. त्यामुळे लवंगाच्या वासाने उंदीर बिळाबाहेर येणार नाहीत.



उत्तर लिहिले · 9/2/2023
कर्म · 9415

Related Questions

भारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणती केमिकल फवारले जाते?
ज्या आजारात दुखण्याचा त्रास होतो, त्या आजारात दुखणं थांबण्यासाठी जे औषध/गोळ्या दिल्या जातात त्यामध्ये स्टेराँइड असते का? व स्टेराँइड वापरण्याने हाडे ठिसूळ होण्याचा किंवा इतर काही त्रास होण्याचा धोका असतो का?
काही औषधांच्या गोळ्यांवर मध्यभागी एक रेष असते जिथे ती गोळी अर्धी तोडता येईल.काही औषधांवर अशी रेष नसते.हा फरक का असतो?
एकाद्या त्रासासाठी आयुर्वेदिक औषध जास्त काळ म्हणजे एक दिड वर्ष घेतल्यास काहि दुसरा शारिरीक त्रास उद्भवू शकतो का?
ज्याप्रमाणे औषधाने त्रास/आजार/रोगबरे होतात त्याचप्रमाणे प्राणिक/काँस्मिक/रेकी या वैश्विक उर्जा असलेल्या उपचार पध्दतीने हिलिंग दिले असता त्रास/आजार/रोग बरे होतात का?
चाफ्याच्या शेंगाचा औषधी उपयोग काय?
दुखापतीचे मूलभूत कारणे कोणती?