औषधे आणि आरोग्य
फरक
औषधशास्त्र
काही औषधांच्या गोळ्यांवर मध्यभागी एक रेष असते जिथे ती गोळी अर्धी तोडता येईल.काही औषधांवर अशी रेष नसते.हा फरक का असतो?
1 उत्तर
1
answers
काही औषधांच्या गोळ्यांवर मध्यभागी एक रेष असते जिथे ती गोळी अर्धी तोडता येईल.काही औषधांवर अशी रेष नसते.हा फरक का असतो?
1
Answer link
कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. वाढत्या रुग्णसंख्यामुळे औषधांची मागणी वाढली आहे. कोरोनाग्रस्तांना औषध दिली जात आहेत. मात्र दुसरीकडे अनेकजण आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी विविध गोळ्यांचे सेवन करताना दिसत आहेत. त्यामुळे अनेकदा मेडिकल दुकानात पाहिजे त्या गोळ्या मिळत नाहीत. आपल्याला 250 एमजीच्या डोसची गरज आहे. पण मेडिकलमध्ये 500 एमजीचा डोस आहे. अशावेळी आपण 500 एमजीची गोळी अर्धी करून खावू शकतो का? 500 एमजीची गोळी अर्धी करून खाणे आरोग्यासाठी लाभदायक आहे का? याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या.याबाबत डॉ. प्रदीप चौरसिया म्हणाले की, ज्या गोळीवर रेघ असते, अशी गोळी आपणाला अर्धी करून खाता येते. त्यासाठी गोळ्यांवर रेघ दिलेली असते. समजा आपल्याला 500 एमजीची गोळी हवी आहे, पण आपल्याकडे 1000 एमजीची गोळी उपलब्ध आहे. तर अशावेळी आपण ती गोळी अर्धी करून खावू शकतो. 1000 एमजीची गोळी अर्धी करून खाल्यास ती 500 एमजीच्या गोळी प्रमाणे काम करते. तसेच मध्ये रेघ नसलेल्या गोळ्या आपण अर्ध्या करून खावू शकत नाही. त्यामुळे फक्त मध्ये रेघ असलेल्या गोळ्या आपणाला अर्ध्या करून खाता येते. तसेच कॅप्सूल देखील अर्ध्या तोडून खाता येत नसल्याने म्हणाले. ↑