औषधे आणि आरोग्य
आजार
जात व कुळे
औषधशास्त्र
ज्या आजारात दुखण्याचा त्रास होतो, त्या आजारात दुखणं थांबण्यासाठी जे औषध/गोळ्या दिल्या जातात त्यामध्ये स्टेराँइड असते का? व स्टेराँइड वापरण्याने हाडे ठिसूळ होण्याचा किंवा इतर काही त्रास होण्याचा धोका असतो का?
1 उत्तर
1
answers
ज्या आजारात दुखण्याचा त्रास होतो, त्या आजारात दुखणं थांबण्यासाठी जे औषध/गोळ्या दिल्या जातात त्यामध्ये स्टेराँइड असते का? व स्टेराँइड वापरण्याने हाडे ठिसूळ होण्याचा किंवा इतर काही त्रास होण्याचा धोका असतो का?
2
Answer link
स्टेरॉईडचा अतिरेक हाडांसाठी घातक
Iकोरोना किंवा अन्य एखाद्या गंभीर आजारातून बरे करण्यासाठी स्टेरॉईडचा मारा केल्यास तो आजार बरा होईल पण स्टेरॉईडच्या अतिरेकामुळे हाडे ठिसूळ होण्याचा धोका वाढेल, असे हाडांचे डॉक्टर सांगतात.
Iस्टेरॉईडचा अतिरेक हाडांसाठी घातकथोडं पण कामाचंस्टेरॉईडचा अतिरेक हाडांसाठी घातकहाडे मजबूत करण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा स्वीकार कराव्हिटॅमिन डी ने समृध्द पदार्थांचे सेवन करा
हाडांची घनता कमी होणे ही प्रत्येक वयोगटातील सामान्यतः दिसणारी समस्या आहे. ऑस्टियोपोरोसिस सारख्या काही समस्या आहेत ज्या हाडे ठिसूळ करतात आणि त्यामुळे हाडांची घनता कमी होते. काही घटक जसे की केमोथेरपी, स्टेरॉईड्स, ऑस्टियोपोरोसिसचा कौटुंबिक इतिहास, शारीरिक हालचालींचा अभाव, धूम्रपान करणे अशा समस्यांना आमंत्रण देऊ शकते. म्हणून, हाडे मजबूत करण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करा.
ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. आनंद जाधव म्हणाले की, हाडांची मजबूती विविध समस्या टाळू शकतात. ऑस्टियोपोरोसिस सारख्या गंभीर आजाराचा संबंध हाडांची खनिज घनता (बीएमडी) कमी होणे, हाडांचे वस्तुमान कमी होणे, अस्थिरता, दाह आणि संवेदनशीलता यामुळे मणक्याचे हाड, कूल्हे किंवा मनगटाचे फ्रॅक्चर होते. ऑस्टिओपोरोसिस चटकन निदान न होणारा रोग आहे आणि विशेषत: वृद्धांमध्ये जास्त प्रमाण सर्वाधिक दिसून येत आहे. परंतु, सध्या लॉकडाऊनमध्ये तरूणांमध्येही हे प्रमाण प्रकर्षानं वाढताना पाहायला मिळत आहे. बऱ्याचदा कोविड संसर्गामुळे व्हायरल इन्फेक्शन, अस्थिरता आणि उपचारात वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉईडचा वापर यामुळे हाडं ठिसूळ होऊन अस्थिरोगाची समस्या उद्भवू शकते. कोरोनातून बरे झालेल्या तरूणांमध्ये हा त्रास बरा होण्यासाठी साधारणतः सहा ते एक वर्षांचा कालावधी लागू शकतो. परंतु, वृद्धांमध्ये ही समस्या कायमस्वरूपी राहते. म्हणून कोरोनातून बरे झाल्यानंतर हाडांचे आरोग्य तपासून पाहण्यासाठी हाडांची खनिज घनता (बीएमडी) चाचणी करून घेणं गरजेचं आहे.
ऑस्टिओपेनिया (कमकुवत हाडे) किंवा ऑस्टियोपोरोसिस (फ्रॅक्चरच्या वाढत्या जोखमीसह कमकुवत हाडे) सिंगल ऑस्टियोपोरोटिक फ्रॅक्चर दुस-यांदा फ्रॅक्चरचा धोका ५० टक्क्यांनी वाढवते. शरीरात कुठेही दोन ऑस्टियोपोरोटिक फ्रॅक्चरमुळे तिसऱ्या फ्रॅक्चरचा धोका ८० टक्क्यांनी वाढतो, असेही डॉ. जाधव म्हणाले.
ऑर्थोपेडीक सर्जन डॉ. मयांक पाठक म्हणाले की, कमी हाडांचे वस्तुमान कमी असल्यासही ऑस्टियोपोरोसिसचे लेबल लावले जाते, याला ऑस्टियोपेनिया म्हणतात. काही औषधे, रजोनिवृत्ती, म्हातारपण, लठ्ठपणा, निष्क्रिय जीवनशैली कमी हाडांसंबंधीत समस्यांना आमंत्रण देते. हाडांच्या वस्तुमान कमी असलेल्या प्रत्येकाला ऑस्टियोपोरोसिस होऊ शकत नाही. परंतु या लोकांना भविष्यात याचा जास्त धोका आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये कमी हाडांची घनता आणि ऑस्टियोपोरोसिस होण्याची शक्यता जास्त असते. स्त्रियांमध्ये हाडांची घनता कमी असते. याचं कारण रजोनिवृत्ती दरम्यान हार्मोनल बदलांमुळे हाडांच्या वस्तुमानाचा वेग वाढतो. चूकीचा आहार, केमोथेरपी, स्टेरॉईड्स, ऑस्टियोपोरोसिसचा कौटुंबिक इतिहास, धूम्रपान आणि अल्कोहोलचे अतिसेवन हाडांच्या कमी घनतेचा आणि शेवटी ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढवते. १८ ते ४० वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये ऑस्टियोपोरोसिस ही समस्या वाढताना दिसून येत आहे. वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे ड जीवनसत्वाचे प्रमाण कमी होणे, बैठी जीवनशैली, तणाव, मद्यपान आणि धूम्रपान हे यामागील मुख्य कारण आहे.
, जीवनशैलीतील काही बदल हाडांच्या नुकसानाचा धोका कमी करतात. व्यायामामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. चालणे, हायकिंग आणि नृत्य यासारख्या व्यायामाची निवड करा. हाडांच्या आरोग्यासाठी जास्त वजन न उचलणे, हलके आणि शरीराची लवचिकता वाढविणारे व्यायामप्रकार निवडा. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायामाचे योग्य प्रशिक्षण घ्या. दूध, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या भाज्या आणि सोयाबीन द्वारे कॅल्शियमचा दैनंदिन डोस घ्या. सार्डिन, सॅल्मन आणि अंडी यांसारखे व्हिटॅमिन डी ने समृध्द पदार्थांचे सेवन करा. सकाळी कोवळ्या उन्हात बसा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि ऑस्टियोपोरोसिस औषधे घ्या.
दररोज व्यायाम, तेलबियांचे सेवन, शेंगा, सुका मेवा, प्रथिने आणि ओमेगा -3 फॅटी एसिड युक्त अन्नाचे सेवन करा. धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा. हाडांचे नुकसान होण्याचा धोका कमी करण्यासाठी उच्च-कॅलरीयुक्त आहार, जंक फूडचे सेवन आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा. डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतरच कोणतीही औषधे घ्या