1 उत्तर
1
answers
चाफ्याच्या शेंगाचा औषधी उपयोग काय?
1
Answer link

"चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी, काही केल्या हलेना." कवी 'बी' यांनी म्हटले. असे कवना खुलविणारे झाड व नाजुक सुंदर फूल आपल्या विविध छटांनी आणि गुणांनी कठोर हृदयी पुरुषालाही आपल्याकडे मोहून घेते. असे हे कवींनी प्रेमाचे प्रतीक बनविलेले चाफ्याचे फूल.
पिवळ्या धम्मक सोनेरी अंगाचा दरवळून टाकतो आसमंत सारा
चाफा देखील एक सुवासिक आणि औषधीयुक्त वनस्पती आहे यास चंपक असेही संबोधण्यात येते. पांढरा चाफा, लाल चाफा, हिरवाचाफा, सोनचाफा, नागचाफा, भुईचाफा, कवठोचाफा असे ७ प्रकार आढळतात.
चंपकाच्या विविध जाती प्राचीन कालापासून भारतात होत्या. अनेक साहित्यांत चाफ्याचा उल्लेख आढळतो नंतर पांढरा चाफा या फुलास सुगंध बेताचाच पण ग्रामकन्या, ग्रामस्त्रिया, वन्यस्त्रिया, ती फुले प्राचीन काळापासून वापरत असल्याचे आढळते. चाफ्याचा वृक्ष मध्यम उंचीचा व निसरडा असतो. त्याच्या सुंदर कलिकेची उपमा स्त्रियांच्या नाकास देण्यात येते. वृक्ष सदाहरित असल्याने आजही बागांतून तो मोठ्या प्रमाणावर लावतात.
चंपक पुष्प विशेष प्रसिद्धीस आले ते इ.स. १-२ शतकातील कुषाण काळात. शिल्पकृतीत व प्राचीन भारतीय चित्रकलेत चंपकाची चित्रे आढळतात अजिंठा लेण्याचे ७ वे दालन म्हणजे चंपकाच्या विविध जातीची माळच! नागचाफा अतिशय श्रेष्ठ. याची गणना जगातील सुंदर पुष्पात करतात. मोठ्या धवल पाकळ्या सुवर्णाशी साम्य असणारे पुंकेसराचा सुगंध सर्वत्र दरवळत असतो, यापासून नागकेशर तयार केले जाते. म्हणूनच तो कामदेवाच्या पंचबाणातील एक आहे. हिरव्या चाफ्याची झुडपे असतात. फुले प्रथम हिरवी व जुनी झाल्यावर पिवळी होतात. सुगंधही खूप असतो. पांढऱ्या चाफ्यामध्ये दोन प्रकार असतात, १ ल्या प्रकारातील फुलाचा आतील भाग किंचित पिवळसर असतो, चाफ्याच्या लाल व पांढऱ्या फुलांना हलका सुगंध असून फुले उमलल्यावर दुसऱ्या प्रकारात फुले पांढरी स्वच्छ असून आकाराने जरा मोठी असतात या फुलांना भरपूर सुगंध असतो, ही फुले सहसा गळून पडत नाहीत तसेच या चाफ्याची पानेही गळत नाहीत. पाने हिरवीकंच, काळपट हिरवी व मोठ्या आकाराची असतात. एकाच वेळी भरपूर गर्द हिरवा पर्णसंभार आणि पांढरी स्वच्छ टपोरी व सुगंधी फुले गुच्छल रूपाने झाडावर असल्यामुळे उन्हाळ्यातही नितांत शोभिवंत दिसतो. चाफ्याचे औषधी उपयोग
१) चाफ्याची साल, मुळी, पाने, फुले एकत्र कुटून त्याचा मोहरीचे तेल व त्याच्या चार पट खोबऱ्याचे तेल मिसळून त्याचे मिश्रण तयार काढावा तेवढेच करावे याचा उपयोग सांधेदुखोवर, अंगदुखी, कंबरदुखीवर केल्यास आराम मिळतो.
२) गळू (टॉन्सिल) वर चाफ्याच्या झाडाचा चीक उपयोगी आहे. (३) चाफ्याची शेंग उगाळून लावल्यास सापाचे विषसुद्धा उतरते असे म्हणतात.
४) कोणत्याही कारणाने नाकात मास वाढले की त्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही परंतु चाफ्याच्या फुलांचा सतत वास घेतला आणि नाकात सैधवादी तेल आणि वचादी तेलाचे मिश्रण टाकल्यास मास नाहीसे होते. नाकात येणारा फोड (माळीण) फुलांच्या वासामुळे बरा होतो.
५) चाफ्याची फुले उत्तेजक, दाहनाशक आणि नेत्र ज्योतिवर्धक असतात. ६) चाफ्याच्या फुलांपासून अत्तर तयार करतात. ७) डोकेदुखीवर चाफ्याची पाने वाटून रस लावावा. चाफ्यालाही जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे.