झाडे
उंबराच्या झाडाची वैशिष्टे कोणती आहे?
1 उत्तर
1
answers
उंबराच्या झाडाची वैशिष्टे कोणती आहे?
2
Answer link
उंबराचे (Ficus racemosa) झाड खूप मोठे असते. या झाडाचे खोड पांढरट रंगाचे असते. याची पाने हिरव्या रंगाची असतात. या पानांचा आकार लांबट असतो. तसेच या झाडांच्या पानांवर फोडफड असतात. हे झाड साधारणपणे ४० ते ४५ फूट उंच असते.या झाडाला खोडाच्या जवळ झुपक्यांनी गोल फळे येतात. ही फळे कच्ची असताना हिरवी, तर पिकल्यावर लाल रंगाची होतात.
उंबराचे खोड
उंबराची फळे
वैशिष्ट्ये
या झाडाखाली सद्गुरू दत्ताचे स्थान असते अशी लोकांची श्रद्धा आहे. म्हणून याला औदुंबर असे म्हटले जाते. हे झाड जमिनीतील पाण्याचा साठा दर्शवते. हे झाड जिथे असेल तिथे पाण्याचा साठा निर्माण होतो. शिवाय हे २४ तास प्राणवायू हवेत सोडते. या झाडाचे फूल कधीच दिसत नाही. उंबर हेच याचे फूल. उंबरामध्ये फुलाचे सर्व अवयव दिसतात. उंबरात किडे असतात. (उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिती लीला! जग हे बंदीशाला ... राजा परांजपे यांच्या 'जगाच्या पाठीवर' चित्रपटातले गीत)
धार्मिक महत्त्व
या झाडाच्या सुकलेल्या काड्या होमहवनात समिधा म्हणून अर्पण करतात. या झाडाची पूजा केली जाते.
औषधी उपयोग
या झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात. गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते. या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात.
इतर उपयोग
उंबराची फळे खाता येतात. याची पाने शेळी बकरी आवडीने खातात. पक्षी या झाडाची फळे खातात. या झाडाच्या सावलीत बसून पवित्र ग्रंथ पोथ्या वाचन करतात.
धन्यवाद...!!