झाडे

कर्दळीच्या पानाचा प्रकार कोणता?

1 उत्तर
1 answers

कर्दळीच्या पानाचा प्रकार कोणता?

1
कर्दळीचे जमिनीखालील खोड (मूलक्षोड) जाड असते. तिचे जमिनीवरील खोड ०.९-१.२ मीटर उंच असते. पाने साधी व आकाराने मोठी असतात. फुले अनियमित, द्विलिंगी, जोडीने, लाल, शेंदरी व मिश्र रंगांची असतात.

पुर्वी घरोघरी आढळणारे पिवळ्या फुलांचे कर्दळीचे झाड. हे शुभ समजले जायचे. केळीचे खांब तसेच कर्दळीचे खांब शुभकार्यात वापरले जायचे. सत्यनारायणाच्या पुजेच्या चौरंगाला चार खांब कर्दळीचे असायचे. केळीच्या पानासारखे प्रसाद वाटायला ही पाने वापरली जायची. हेया पानात बांधुन बरेच पदार्थ उकढले किंवा भाजले जायचे. त्याची चव काही खास वेगळाच लागायची. तांदळाच्या पिठाचे पानगे कर्दळ किंवा पळसाच्या पानावर उकडायचे.
उत्तर लिहिले · 25/8/2022
कर्म · 48555

Related Questions

झाडे लावा झाडे जगवा निबंध?
एका रस्त्याच्या कडेने लावलेल्या लगतच्या चार झाडांमधील अंतर 24 मी असून त्या रस्त्याच्या कडेने एकूण 151झाडे लावली असल्यास पहिल्या झाडापासून शेवटचे झाड किती अंतरावर असेल?
झाडे नसतील तर काय होईल?
शेतीच्या बांधावर कोणती झाडे लावावी?
उंबराच्या झाडाची वैशिष्टे कोणती आहे?
वृक्ष-वेलींना ही प्राण्यांप्रमाणे भावना असतात,हे कोणी दाखवून दिले?
वृक्षारोपण करण्यासाठी झाडे कुठे मिळतील?