झाडे

वृक्षारोपण करण्यासाठी झाडे कुठे मिळतील?

3 उत्तरे
3 answers

वृक्षारोपण करण्यासाठी झाडे कुठे मिळतील?

2
भविष्यात फुकटात (मोफत)भरपूर ऑक्सिजन व पर्यावरण सरंक्षण साठी आता ही चळवळ उभारण्याची गरज आहे.🌳🌳🌿
  
जिथे कुठे पिंपळ उगवले असतील ते जपा.. रस्याच्या दुतर्फा लावा.. तसेच निंब आणि चिंचाही.. 🌱🌱

😇स्कन्द पुराणात एक अद्भुत श्लोक आहे

अश्वत्थमेकम् पिचुमन्दमेकम्
न्यग्रोधमेकम् दश चिञ्चिणीकान् ।
कपित्थबिल्वाऽऽमलकत्रयञ्च. पञ्चाऽऽम्रमुप्त्वा नरकन्न पश्येत्।।

अश्वत्थः = पिपंळ
पिचुमन्दः = कडूनिंब
न्यग्रोधः = वट वृक्ष
चिञ्चिणी = चिंच
कपित्थः = कवठ
बिल्वः = बेल
आमलकः = आवळा
आम्रः = आंबा
(उप्ति = झाडे लावणे)

जो कोणी या झाडांची लागवड करेल ,त्यांची निगा राखेल त्याला नरकाचे दर्शन होत नाही. 
हे न अनुसरल्यामुळे आपल्याला दुष्काळ स्वरूपात नरकाचे दर्शन घडते आहे. 
अजूनही वेळ गेलेली नाही आता तरी चुका सुधारू. 

गुलमोहर निलगिरी सुबाभूळ ही झाडे आपल्या देशातील पर्यावरणाला घातक आहेत. 
तरी पाश्चात्यांचे अंधानुकरण करून अगदी पर्यावरणाच्या बाबतीत देखील ज्या चुका घडल्या त्या *वड, पिंपळ,आंबा चिंच आदी झाडे लावून पुढच्या पिढीला निरोगी आणि सुजलां सुफलां पर्यावरण देण्याचा प्रयत्न करु.🌱🌱🌳🌳

दुष्काळाचे खरे कारण 🍂🍁
पिंपळ, वड आणि लिंब हि झाडे लावणे बंद केल्याने होत आहे हे वाचुन आपल्याला विचित्र वाटेल, परंतु हे सत्य आहे.

( पिंपळ कार्बन डाय ऑक्साइड १००% शोषून घेतो, तर वड ८०% आणि नीम ७५% शोषतो आणि हि झाडे परिसराला थंड हवामान तसेच ऑक्सिजन देवुन नैसर्गिक ताजेतवाने करण्याचे काम करतात ). 🌳🌳🌿🌿

आपणच लोकांना खुश करण्यासाठी ह्या झाडांना लावणे टाळले आणि उलट यूकेलिप्टसची (नीलगिरी) झाडे लावण्यास सुरुवात केली. यूकेलिप्टस फार पटकन वाढते आणि दलदलीची जमीन कोरडी करण्यासाठी हे झाड लावले जाते. ज्यामुळे जमीन जलविहीन होते.गेल्या ४० वर्षांपासून हे वृक्ष सर्वमहामार्गांवर दुतर्फा लावले गेले आहेत. त्यामुळे नैसर्गिक ताजेतवाने न राहिल्याने, उष्णता वाढून वेगाने पाण्याची वाफ होत आहे. 

पिंपळाला झाडांचा राजा म्हणतात.
त्याच्या स्तुती मध्ये एक श्लोक आहे -
मूले ब्रह्मा त्वचा विष्णु शाखा शंकरमेवच!!
पत्रे पत्रे सर्वदेवायाम् वृक्ष राज्ञो नमोस्तुते!!
याचा अर्थ समजला गेला पाहिजे.

येत्या काही वर्षांत प्रत्येक ५०० मीटर अंतरावर एक एक पिंपळ, वडाचे झाड लावले तर प्रदूषणमुक्त भारत होईल #झाडे_लावा_झाडे_जगवा #पाणि वाचवा झाडे लावा #ऑक्सिजन-झाडे लावा,झाडे जगवा# #झाडे लावा....🌱   
या जीवन-वृक्षांची जास्त झाडे लावा आणि नीम आणि वडाची झाडे लावा. ज्यांच्याबाजूला जागा असेल तुळस लावा
या आपण सर्वांनी एकत्रितपणे आपल्या "भारताला " नैसर्गिक आपत्तीतून वाचवू या.

सर्वांना विनंती आहे. कृपया जिथे शक्य होईल तिथं वृक्षारोपण करा.🌳🌿🌳🌿🌳🌿 #🔴🚩👉 शुध्द ऑक्सिजन करिता : झाडे लावा, झाडे जगवा.






🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🪴🪴🪴🪴🪴🪴🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🪴🪴🪴🪴🪴🪴









वृक्षारोपण हा केवळ सोहळा नाही, कुटुंबातील सदस्याप्रमाणे झाडांची काळजी घ्यावी लागते. तुम्ही पालकत्व स्वीकारणार असाल, तर आम्ही तुम्हाला हवी तेवढी झाडे दत्तक देण्यासाठी मदत करणार... पुण्यातील देवराई फाउंडेशनशी संपर्क साधल्यास तुम्हाला ही वाक्ये हमखास ऐकायला मिळतील. देशी झाडांच्या लागवडीचे जाळे विस्तारण्यासाठी देवराई फाउंडेशन गेल्या अकरा वर्षांपासून काम करत आहे. या दशकात संस्थेने हजारो पालकांना बारा लाख रोपे दत्तक दिली आहेत.

देवराई फाउंडेशनचे प्रमुख रघुनाथ ढोले आणि विश्वस्त धनंजय शेडबाळे यांनी इकॉलॉजिकल सोसायटीचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी दहा वर्षांपूर्वी त्यांनी देशी झाडांच्या बियांचे संकलन सुरू केले आणि त्याची रोपे तयार करून लोकांना ती दत्तक देण्यास सुरुवात केली. २०१०मध्ये बियांचे संवर्धन आणि रोपांच्या वाटपाला सुरुवात केली. ही झाडे हौस म्हणून नव्हे, तर जबाबदारीने वाढवली पाहिजेत या उद्देशाने रोपांच्या वाटपाला नियमांची चौकट घालून दत्तक मोहीम लोकांसमोर आणली. या उपक्रमाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सर्व पालक संस्थेच्या संपर्कात आहेत. रघुनाथ ढोले यांच्या थेऊर येथील नर्सरीत ही झाडे दत्तक मिळतात.

रोपे दत्तक देण्यापूर्वी नागरिकांना एक प्रश्नावली भरून द्यावी लागते. झाडे कुठे लावणार आहेत, पाण्याची आणि देखभालीची व्यवस्था कशी असेल, त्यांचे संरक्षण कसे करणार, हे जाणून घेतले जाते. प्रश्नावलीतून इच्छुक नागरिकांचा अंदाज येतो. त्यानंतरच झाडे मोफत दत्तक दिली जातात. वृक्षारोपणानंतरही वृक्ष पालकांकडून गुगल लोकेशन घेतले जाते. दर तीन महिन्यांनी संस्थेचा फोन जातो. याशिवाय व्हॉट्सअॅप ग्रुपमधून नियमित चर्चाही होते. आमची झाडे सुरक्षित हातात आहेत, याची खात्री आम्ही करून घेतो असतो, असे देवराई फाउंडेशनचे रघुनाथ ढोले आणि धनंजय शेडबाळे यांनी सांगितले.

उन्हाळ्यात रानावनात पडलेल्या बिया, लोकांकडून फळांच्या बियांचे आम्ही संकलन करतो. पावसाळ्यात त्यांची रोपे करायचे काम सुरू होते. वर्षभरात रोपं बाळसे धरतात आणि पुढील वर्षी जूनमध्ये ती दत्तक दिली जातात. या वर्षीही १२० प्रकारच्या देशी झाडांच्या बिया गोळा केल्या आहेत. गेल्या वर्षीची एक लाख रोपे लोकांना देण्यासाठी तयार आहेत, असे शेडबाळे यांनी सांगितले.

...

'आम्ही साकारतो देवराई'

मोठ्या जागेत वृक्षारोपण करण्याऱ्या संस्था आणि व्यक्तींसाठी आम्ही मानवनिर्मित देवराई हा उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी किमान एक एकर जागा आवश्यक आहे. यासाठी देशी झाडे, झुडपे, वेली, महावेली, फळझाडे, फुलझाडे अशा १३५ प्रकारच्या एकमेकांना पूरक अशा झाडांचा आम्ही आऱाखडा केला आहे. विशेष म्हणजे पाणी फाउंडेनशनने यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी दत्तक घेतलेल्या सातारा येथील वेळू या गावातील एक एकर जागेत जानेवारी महिन्यात या उपक्रमाला सुरुवात झाली. गावकरी या देवराईची काळजी घेत आहेत, अशी माहिती शेडबाळे यांनी दिली.

...

एक झाड ५० वर्षे जगले, तर माणसाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचवते. झाड ऑक्सिजन देते, हवा प्रदूषण रोखते, जमिनीची धूप थांबवते, माणसाला निवारा देते आणि उत्पन्न देते. पूर्वी देशात ९० टक्के जंगल होते. ४०० पिढ्यांनी केलेल्या वृक्षतोडीमुळे वृक्षाच्छादन १० टक्क्यांवर आले आहे. आता पूर्वजांनी निसर्गाकडून घेतलेले कर्ज फेडण्याची वेळ आली आहे.

रघुनाथ ढोले, मुख्य विश्वस्त, देवराई फाउंडेशन

    

उत्तर लिहिले · 4/6/2022
कर्म · 48555
1
आमराई
उत्तर लिहिले · 10/7/2022
कर्म · 20
0
आपण सुजाण आहात , कितीतरी वृक्षवाटीका आहेत, वेळ पैसा व मेहनतीने कष्टांचे श्रेय मिळते ,चीज होते . सातारा जिल्हा आणि तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करत आहे.
एकतर विश्वासाने जीवभाव लावणे असेल अगर घडेल अशी निर्मल सेवा अमृता सारखी गोड कार्यपद्धती बनावी . आणि जागा शोधा जागृत रहा , झाडं लावा नाहीतर झाडाझडती द्यावी लागेल अगर होईल..
 आता तरी जागा ,गजा सारखे गाज करीत जगा ..
सागरा सारखे रत्नाकर व्हा ... कृपासिंधु !!

उत्तर लिहिले · 14/7/2024
कर्म · 475

Related Questions

झाडे लावा झाडे जगवा निबंध?
एका रस्त्याच्या कडेने लावलेल्या लगतच्या चार झाडांमधील अंतर 24 मी असून त्या रस्त्याच्या कडेने एकूण 151झाडे लावली असल्यास पहिल्या झाडापासून शेवटचे झाड किती अंतरावर असेल?
झाडे नसतील तर काय होईल?
शेतीच्या बांधावर कोणती झाडे लावावी?
कर्दळीच्या पानाचा प्रकार कोणता?
उंबराच्या झाडाची वैशिष्टे कोणती आहे?
वृक्ष-वेलींना ही प्राण्यांप्रमाणे भावना असतात,हे कोणी दाखवून दिले?