3 उत्तरे
3
answers
मकर संक्रात विषयी काय सामाजिक संदेश देता येईल?
6
Answer link
*१४ जानेवारी १७६१--- पानिपत*
मकर संक्रांत आली की पानिपतची आठवण आल्याशिवाय राहत नाही...
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सहज पानिपत विषयी थोडंसं...
पानिपत….जे नाव नुसत ऐकलं कित्येक मराठ्यांच्या काळजात कुठे ना कुठे एक ठोका चुकतोच…सव्वा लाख बांगडी फुटली अस वर्णन ज्याच केल जाते…मराठय़ांसाठी एक आख्यायिका बनलेल्या अश्या ह्या मराठय़ांच्या आणि एकूणच सबंध भारताच्या इतिहासावर सखोल परिणाम करणाऱ्या पानिपतच्या महासंग्रामाला १४ जानेवारी रोजी २६० वर्षे पूर्ण होत आहेत.
पानिपतावरील ह्या युद्धाचा महाराष्ट्रातील जनमानसावर निश्चितच खोल परिणाम झाला होता.त्यामूळे ह्या युद्धा संदर्भातील अनेक बाबी पुढे म्हणी व वाक्यप्रचार म्हणून मराठीत रुढ झाल्या आहेत.पानिपत होणे (अगदी वाईट पराभव होणे ह्या अर्थी ),संक्रांत कोसळणे (संक्रातीच्या दिवशी हे युद्ध झाल्यामुळे मोठे संकट येणे ह्या अर्थाने ही म्हण वापरतात) ,पाचावर धारण बसणे (युद्धापूर्वी भाऊंच्या सैन्यात जी महागाई होउन जी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली होती त्या संदर्भात),´विश्चास गेला पानिपतात` हे वाक्य तर अगदी सर्रास वापरले जाते,’१७६० काम काय करत बसला आहेस’ ह्यातील १७६० चा संदर्भही १७६० साली मराठ्यांनी संबध भारतात ज्या विविध मोहिमा आयोजल्या होत्या, त्याबाबत आहे.खरतर पानिपत हा तेव्हापासून मराठी संस्कृतीचा कसा कां होईना एक अविभाज्य घटकच बनलेला आहे.
खरच विश्वास पाटील ह्यांच पानिपत वाचतांना ज्याच्या अंगावर काटा येत नाही तो खरा मराठा नव्हेच,इतक सुंदर शैलीत त्यांनी हे पुस्तक लिहल आहे.पुस्तक वाचतांना कित्येक वेळा आपल रक्त अस सळसळते कि आता आपण उठून लढायला जाव अस वाटते. “बचेंगे तो और भी लढेंगे” म्हणत मृत्युला सामोरे जाणारया दत्ताजींचा व इब्राहीमखानाचा शेवट तसेच लढाई हरल्यावर झालेले मराठ्यांचे हाल हे प्रसंग त्यांनी असे उभे केले आहेत कि ते वाचतांना अगदी भरून येत,आत कुठे तरी आपण रडतो पण त्याबरोबरच संतापाची, त्वेषाची भावनाही उफाळून येते.ज्या भाऊचे कौतुक तत्कालीन उत्तरेतील लोकांनी केले व ते आजही करत आले आहेत,त्या भाऊला त्याच्याच मातीत वेडा ठरवले गेले.त्या भाऊंची बाजूही अगदी योग्यरीत्या ह्या कांदबरीत मांडली आहे. ‘पानिपत’ जरी कांदबरी स्वरुपात असल तरी ते नुसत्या ऐकीव कथांवर आधारित नाहीये. विश्वास पाटलांनी त्यासाठी खूप संशोधन केल आहे आणि त्यांची मेहनत पुस्तक वाचतांना आपल्याला नक्कीच जाणवते.
पानिपत म्हटले, की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो फक्त पराभवाचा इतिहास….नामुष्की,हळहळ ,दु:ख…पण लक्षात ठेवा, पानिपतचा लढा महाराष्ट्रासाठी नव्हता तो होता संपुर्ण हिदुंस्थानासाठी,अवघ्या हिदुंस्थानासाठी मराठ्यांच्या एका संबध पिढीने दिलेलं बलिदान होत ते..ह्या गोष्टीचा सार्थ अभिमान बाळगायला नको कां ?… किंबहुना मला तर वाटते आपण ते युद्ध हरूनही जिंकलो होतो,कारण….
१) सर्वात प्रथम म्हणजे त्याकाळच्या जगातल्या एका मोठ्या शक्तीशाली आणि अनुभवी बादशहाशी मायभूमीच्या रक्षणासाठी आपण एकट्याने न भिता टक्कर घेतली होती.
२)युद्ध झाल्यावर अब्दालीने दिल्लीच्या बंदोबस्तासाठी मराठ्यांनाच परत कायम केले,ह्यातच सगळ आल.
३)ह्या युद्धानंतर अब्दाली किंवा इतर कोणांही अफगाणी सेनापतीला ह्या मार्गाने भारतावर परत आक्रमण करायची हिंमत झाली नाही.
४)पराभवानंतर काही काळातच माधवरावपेशवे व महादजीशिंदे ह्यांनी मराठ्यांचे उत्तरेतील गतवैभव पुन: प्रस्थापित केले व सुमारे पंचवीस वर्षे भगवा झेंडा अखंड दिल्लीच्या किल्ल्यावर फडकत ठेवून ‘दिल्लीचे तख्त राखिले’.

अनेक लोकांच अस म्हणण आहे कि पुराणातली वांगी पुराणात ठेवा आजच काय ते बोला, पण मी म्हणतो मराठी शूरांनी त्या वेळी गाजविलेल्या मर्दुमकीचा ,त्यांच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास,त्यांचे बलिदान नव्या पिढीला कसे कळणार.त्यांचे हे कार्य विसरून कसे चालेल,ह्याचा अभिमान बाळगायला हवा,त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास, पराभवानंतरही खचून न जाता घेतलेली गरुडझेप ह्यापासून आपण काहीतरी स्फुर्ती,प्रेरणा घ्यायला हवी.वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी अनंत अडचणींना तोंड देत,हिदुंस्थानासाठी मायभूमीपासून इतक्या दूर जाऊन अगदी धीरोदात्तपणे झुंझार लढा देवून वीरगती पत्करलेल्या तरीही त्याच्या मायभूमीने वेडा ठरवलेल्या,दुर्दैवाने एका मोठ्या शोकांतिकेचा धनी बनलेल्या, पानिपतच्या रणभूमीवर आजही एखाद्या कोपरयावर विचारमग्न होउन बसलेल्या भाऊच्या मनावरील भार आपल्याला थोडा कां होईना कमी करायचा आहे….
व्हाट्सअप्पवरून साभार
2
Answer link
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहांचे तिळ मिळवा त्यात, तिळावर फुलेल पाकाचा काटा, प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा... मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
अधिक संदेश मॅसेज साठी खालील वेबसाईट ला भेट द्या