1 उत्तर
1
answers
हिंदू धर्मात कंबरेला काळा दोरा का बांधतात?
4
Answer link
या मागे फार प्रभावी असे शास्त्र आहे ………१) करदोडा हा रेशमीचं पाहिजे २) तो काळ्या रंगाचाच पाहिजे ३) त्याचे कंबरे भोवती घर्षण होईल आणि तो गोलाकार फिरू शकेल इतपतच तो बांधला गेला पाहिजे .आता यामागील कारण ….. त्वचेवर रेशीम घासले गेले की स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी (स्थिर विद्युत भार ) तयार होते आणि त्यामुळे काही ऊर्जा उष्णतेच्या रूपात प्रकट होते ज्यामुळे ओटीपोट,पुरुषातील पुनरुत्पादन करणारी यंत्रणा यांना अधिक वेगवान आणि पुरेसा रक्त पुरवठा होतो,आणि जो पुढे जाऊन पुरुषांना उपयुक्त ठरतो !! (आता ठरत होता असे म्हणावे लागेल ) करदोड्याचा काळा रंग उष्णता जास्त वेळ रोखून ठेवतो म्हणून काळे रेशीमच यासाठी वापरले जाते (जात होते ) !! आपल्याकडे एखाद्या शास्त्रीयदृष्ट्या सत्य घटनेला सुद्धा धार्मिक आवरणात गुंडाळून देण्याची जी चुकीची पद्धत पडलेली आहे त्यामुळेच आपल्या खूपशा परंपरा नष्ट होत चाललेल्या आहेत !!