रूढी परंपरा
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
3
Answer link
नर्मदा परिक्रमा का करतात
यात्रेकरू नदीची परिक्रमा किंवा प्रदक्षिणा करून पवित्र तीर्थयात्रा करतात यावरून नर्मदा नदीचे पवित्र म्हणून महत्त्व सिद्ध होते. नर्मदा परिक्रमा, ज्याला म्हणतात, ती एक यात्रेकरूने करू शकणारी एक पूज्य कृती मानली जाते .
नर्मदा परिक्रमा चे महत्व काय?
या नदीच्या किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने मानवाला पुण्य मिळते अशी श्रद्धा हिंदू धर्मात प्रचलित आहे. ही नदी कुमारिका स्वरूपात आहे अशी धारणा आहे. मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती अशी धारणा आहे. मार्कंडेय ऋषींनी नद्या न ओलांडता ४५ वर्षात ही परिक्रमा पूर्ण केली.
1
Answer link
सोयर म्हणजे सुखाचा प्रसंग आणि सुतक म्हणजे दुःखाचा प्रसंग. देवपूजा करताना मन समर्पित असणे आवश्यक. सुखाच्या क्षणी आपण फक्त त्या वैयक्तिक गोष्टींचाच विचार करतो किंवा डोक्यात त्याच गोष्टींचा विचार चालू असतो. आणि दुःखात सद्धा तेच… आपण दुःख पकडून बसतो.. मन कशात लागत नाही. सुखा आणि दुःखाचा प्रसंगात मन खरेच भानावर नसत. अशा मनाने देव पूजा कशी होणार? म्हणून आपल्या ऋषी मुनींनी सोयर-सुतक सारखी वेळ दिली की १३-१४ दिवस देवपूजा ना केलेली बरी..
4
Answer link
या मागे फार प्रभावी असे शास्त्र आहे ………१) करदोडा हा रेशमीचं पाहिजे २) तो काळ्या रंगाचाच पाहिजे ३) त्याचे कंबरे भोवती घर्षण होईल आणि तो गोलाकार फिरू शकेल इतपतच तो बांधला गेला पाहिजे .आता यामागील कारण ….. त्वचेवर रेशीम घासले गेले की स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी (स्थिर विद्युत भार ) तयार होते आणि त्यामुळे काही ऊर्जा उष्णतेच्या रूपात प्रकट होते ज्यामुळे ओटीपोट,पुरुषातील पुनरुत्पादन करणारी यंत्रणा यांना अधिक वेगवान आणि पुरेसा रक्त पुरवठा होतो,आणि जो पुढे जाऊन पुरुषांना उपयुक्त ठरतो !! (आता ठरत होता असे म्हणावे लागेल ) करदोड्याचा काळा रंग उष्णता जास्त वेळ रोखून ठेवतो म्हणून काळे रेशीमच यासाठी वापरले जाते (जात होते ) !! आपल्याकडे एखाद्या शास्त्रीयदृष्ट्या सत्य घटनेला सुद्धा धार्मिक आवरणात गुंडाळून देण्याची जी चुकीची पद्धत पडलेली आहे त्यामुळेच आपल्या खूपशा परंपरा नष्ट होत चाललेल्या आहेत !!
2
Answer link
माझ्या मावस बहिणीचे लग्न ठरले होते,तर सर्व नातेवाईक जमलो होतो केळवण करण्यासाठी, माझा लहान भाऊ सर्व पहात होता,सारखं केळवण,केळवण ऐकलं होतं,तर जेवण वगैरे झाल्यावर अगदी निरागस पणे त्याने विचारलं, केळवण सम्पलं का..? पण मला केळी कुठेच नाही दिसली..!!!
गमतीचा भाग झाला तो..
तर, लग्न,मुंज करायचे ठरल्यानंतर मुलगी/मुलगा ,मुंजा आणि त्यांचे आई-वडील,आजी-आजोबा वगैरे घरातील माणसांना जवळचे नातेवाईक, ओळखीचे लोक आपल्या घरी रीतसर आमंत्रण देऊन जेवायला बोलावतात त्याला केळवण म्हणतात.
कार्य ठरलेल्या घरात हजार कामे असतात,अशा वेळी स्वयंपाक वगैरे चा वेळ वाचतो.
तसेच पूर्वी लग्न झाले की मुलगी एकदा सासरी गेली की सम्पर्काची-दळणवळणाची साधने कमी असल्याने भेटीगाठी फार कमी होत, तसेच मुंज झाल्यावर मुलगा गुरुगृही जाई. तर ह्या केळवणाच्या निमित्ताने निवांत भेटणे,कोडकौतुक वगैरे करता येणे हा उद्देश असावा असे माझे मत आहे
केळवण हा काही धार्मिक विधी नाही,त्या मुळे बोलावलेल्या पाहुण्यांचे योग्य आदरातिथ्य करणे, ऐपतीप्रमाणे ओटी भरणे,भेटवस्तू देणे, इतकंच करतात
एकंदरीत 2 कुटुंबातील संबंध प्रेमाचे रहावेत ह्या उद्देशाने समाजप्रिय माणसाने सुरू केलेली प्रथा,इतकाच साधा उद्देश असावा
3
Answer link
हिंदू धर्मात शुभकार्याप्रसंगी आंब्याच्या पानाला खूप महत्त्व असते. त्यावेळी सजावटीसाठी आंब्याची पाने घराच्या दरवाज्याला लावतात. यामागे धार्मिक कारण असल्याचे सांगितले जाते.
हिंदू धर्मात वृक्षांचा खूप सन्मान केला जातो. काही वृक्षांची पूजा ही केले जाते. तर काही वृक्षांना अन्नदेवतेचाही दर्जा दिला जातो. त्यात आंब्यांच्या पाने देखील पूजेदरम्यान वापरली जातात. फक्त दरवाज्यावरच आंब्याची पाने लावत नसून पूजेदरम्यान कलशाच्या बाजूने पाने लावली जातात. एवढच नाही तर, लग्नाच्या वेळी मंडप देखील आंब्याच्या पानाने सजवतात. नवजात बालकाच्या पाळण्याला ही आंब्याच्या पानाने सजवतात. काही धार्मिक कार्यात पानाचे वापर मोठ्या प्रमाणात करतात.सर्व शुभकार्यात आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. प्रवेशव्दाराजवळ लावलेल्या पानामुळे सर्व शुभकार्य कोणत्याही विघ्नेशिवाय पार पडते. या पानामध्ये काय खास महत्त्व आहे की, सर्व शुभकार्यात आंब्यांची पाने गरजेची असतात.धार्मिक मान्यतेनुसार, आंबा हा हनुमान यांचे आवडते फळ आहे. त्यामुळे जिथेही आंबा आणि आंब्याची पान असतात तिथे हनुमानची कृपा असते असे मानले जाते. आंब्याच्या झाडाचे लाकूड हे हवन सामुग्रीमध्येही वापरतात. या लाकडाचा वापर हवन करताना केल्यास वातावरणाता सकारत्मकता वाढते. जेव्हाही बाहेरून येणारी हवा जेव्हाही पानांना स्पर्श करते तेव्हा सकारत्मकता घरात प्रवेश करते असे म्हटले जाते.
2
Answer link
मी स्वतः कधी गेले नाही आहे, कारण मी तितकी श्रद्धावान व्यक्ती नाही आहे. पण मला वाटते की जर आपली देवावर श्रद्धा असेल तर अगदी जरूर जावे. त्या हनुमंताने सीतेची एवढी मदत केली तेव्हा त्याला त्याच्या दर्शनाला स्त्रियांनी गर्दी केली तर काही हरकत असेल का? हे सगळे मनुष्याने बनवलेले नियम आहेत तेव्हा मनुष्य ते नियम बदलूही शकला पाहिजे.