1 उत्तर
1
answers
सोयर आणि सुतकमध्ये देवपूजा वर्ज्य का असते?
1
Answer link
सोयर म्हणजे सुखाचा प्रसंग आणि सुतक म्हणजे दुःखाचा प्रसंग. देवपूजा करताना मन समर्पित असणे आवश्यक. सुखाच्या क्षणी आपण फक्त त्या वैयक्तिक गोष्टींचाच विचार करतो किंवा डोक्यात त्याच गोष्टींचा विचार चालू असतो. आणि दुःखात सद्धा तेच… आपण दुःख पकडून बसतो.. मन कशात लागत नाही. सुखा आणि दुःखाचा प्रसंगात मन खरेच भानावर नसत. अशा मनाने देव पूजा कशी होणार? म्हणून आपल्या ऋषी मुनींनी सोयर-सुतक सारखी वेळ दिली की १३-१४ दिवस देवपूजा ना केलेली बरी..