विवाह कुटुंब रूढी परंपरा आहार

केळवण म्हणजे काय? त्यात नेमकं काय करतात व का?

1 उत्तर
1 answers

केळवण म्हणजे काय? त्यात नेमकं काय करतात व का?

2
माझ्या मावस बहिणीचे लग्न ठरले होते,तर सर्व नातेवाईक जमलो होतो केळवण करण्यासाठी, माझा लहान भाऊ सर्व पहात होता,सारखं केळवण,केळवण ऐकलं होतं,तर जेवण वगैरे झाल्यावर अगदी निरागस पणे त्याने विचारलं, केळवण सम्पलं का..? पण मला केळी कुठेच नाही दिसली..!!!

गमतीचा भाग झाला तो..

तर, लग्न,मुंज करायचे ठरल्यानंतर मुलगी/मुलगा ,मुंजा आणि त्यांचे आई-वडील,आजी-आजोबा वगैरे घरातील माणसांना जवळचे नातेवाईक, ओळखीचे लोक आपल्या घरी रीतसर आमंत्रण देऊन जेवायला बोलावतात त्याला केळवण म्हणतात.

कार्य ठरलेल्या घरात हजार कामे असतात,अशा वेळी स्वयंपाक वगैरे चा वेळ वाचतो.

तसेच पूर्वी लग्न झाले की मुलगी एकदा सासरी गेली की सम्पर्काची-दळणवळणाची साधने कमी असल्याने भेटीगाठी फार कमी होत, तसेच मुंज झाल्यावर मुलगा गुरुगृही जाई. तर ह्या केळवणाच्या निमित्ताने निवांत भेटणे,कोडकौतुक वगैरे करता येणे हा उद्देश असावा असे माझे मत आहे

केळवण हा काही धार्मिक विधी नाही,त्या मुळे बोलावलेल्या पाहुण्यांचे योग्य आदरातिथ्य करणे, ऐपतीप्रमाणे ओटी भरणे,भेटवस्तू देणे, इतकंच करतात

एकंदरीत 2 कुटुंबातील संबंध प्रेमाचे रहावेत ह्या उद्देशाने समाजप्रिय माणसाने सुरू केलेली प्रथा,इतकाच साधा उद्देश असावा













उत्तर लिहिले · 30/11/2021
कर्म · 121725

Related Questions

कुटुंब गुणधर्म कुटुंब गुणधर्म?
ग्रामीण कुटुंबाचे वैशिष्ट्य स्पष्ट करा?
कुटुंब कुटुंब संस्थेचे बदलते स्वरूप स्पष्ट करा?
कुटुंबात मनमोकळा संवाद न झाल्यास त्याचे परिणाम काय होतात ते स्पष्ट करा?
गणपतीच्या कुटुंबाची माहिती?
लोकसंख्या नियंत्रण कुटुंब कल्याण घोषवाक्य?
कुटुंबात मनमोकळा संवाद न झाल्यास त्याचे काय परिणाम होतात?