Topic icon

विवाह

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
2
समाजातील अस्पृश्यता निवारण करण्यासाठी व आंतरजातीय विवाह, समाजातील जात,धर्म भेदभाव नष्ट करण्यासाठी Inter Caste Marriage करण्यास सुरुवात करण्यात आली.

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते जेणेकरून राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा. आपल्या देशात अजूनही काही भागात जात, धर्म यावरून भेदभाव केला जातो आणि जात आणि धर्माच्या नावाखाली दंगे देखील घडवले जातात. त्यामुळे हा भेदभाव कमी करण्यासाठी व नष्ट करण्यासाठी सरकार विविध योजना सुरु करत असतात त्या योजनांपैकी एक योजना म्हणजे Inter Caste Marriage Scheme Maharashtra

समाजातील जात,धर्म भेदभाव नष्ट करण्यासाठी
 Inter Caste Marriage योजना सुद्धा महाराष्ट्र सरकार राबवत आहे.

या योजनेअंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५००००/- रुपयांची रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्यात येते

आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी एक जण म्हणजेच मुलगा किंवा मुलगी अनुसूचीत जाती प्रवर्गातील व दलित समाजातील असल्यास अशा जोडप्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या माध्यमातून २.५ लाख रुपये प्रोत्साहन स्वरूपात देण्यात येते.

आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील मुलगा किंवा मुलगी जर अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलगा किंवा मुलीसोबत विवाह करतात तर अशा परिस्थितीत त्या जोडप्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
या योजनेअंतर्गत दिली जाणारी ५०% रक्कम केंद्र सरकार आणि ५०% रक्कम राज्य शासनाकडून दिली जाते.


उत्तर लिहिले · 11/5/2023
कर्म · 7460
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
हिंदू विवाहाची वैशिष्ट्ये
विवाह" हे एक पुरुष व स्त्री अश्या दोन व्यक्तीमधील सामाजिक बंधन आहे. हिंदू धर्मीयांत हा संस्कार आहे, तर अन्य धर्मीयांत हा कायदेशीर करार असतो. विवाह हा संतती किवा वंश पुढे नेण्यासाठीचा कायदेशीर व सामाजिक मार्ग आहे. विवाह संस्था ही संस्कृतीस आणि उपसंस्कृतीस अनुलक्षून विविध पद्धतींनी पतिपत्नींमधले जवळकीचे आणि लैंगिक नाते मान्य करते. विवाहामुळे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात. या नात्यास लग्नगाठ म्हणतात. लग्न हे पवित्र बंधन आहे.


भारतीय हिंदू विवाह
लग्नपत्रिका (निमंत्रणपत्रिका)

लग्नपत्रिका हा लिखीत आमंत्रणासाठी दिलेला विनंतीवजा मजकूर असतो. त्यामध्ये उपस्थितीच्या विनंतीसोबतच वधु-वराच्या, त्यांच्या आई-बापाच्या, आप्तेष्ठांच्या नावांंचा उल्लेख असतो; तसेच विवाह कार्यासमयीच्या इतर विधींचा(जसे हळदी, गुग्गुळ, गोंधळ, पूजा, देवकार्य, वालंग, जागर, वीर, वरात, केळवण, अक्षतारोपन, बिदाई), स्थल-कालाचा उल्लेख असतो. हल्ली आहेर-धार-भेटवस्तू-पुष्पगुच्छ-पुस्तके-अलंकार स्वीकारले जाणार नाहीत असाही सूचनावजा मज़कूर लिहिण्याचा प्रघात सुरू झाला आहे.
उत्तर लिहिले · 7/2/2023
कर्म · 48555