Topic icon

धर्म

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
तुम्हां आम्हां सर्वांना मनुष्य जन्म मिळाला हे पूर्व संचिताचे फळ आहे. ते सफल करण्यासाठी मला प्रभु परमात्म्याने भूतलावर पाठविले आहे. सर्व जन्माच्या पाठी मनुष्य जन्म पावे पोटी याउपरी किरीटी निर्मिली नाही.
म्हणजे विश्वासाने आपण म्हणू शकतो की, मी सर्व योनीतून फिरफिरुन या देही आलो . आता मात्र मला सर्वांचा स्वभाव माहित आहे.कसे चालावे वागावे बोलावे बसावे संवाद साधावा ही दृष्टी मनुष्याला लाभली . मनुष्य स्वभाव धर्म कसा आहे ? तो एकमेकांसाठी अनुरूप अशी कृती प्रिती शांती शिस्त आणि समाधान अंगी बाळगून विवेक वृत्तीने पुढे जात आहे की, षडविकारात अडकला आहे ... याची मीमांसा करत करत तो हा दिवस वर्तमान समोर आहे.
तो समन्वय ऋणानुबंध जोडत समतोल साधत एकमेकां साह्य करू असा विश्वास व्यक्त करतोय किंवा नाही.. मनुष्याची मनस्थिती कशी आहे व परिस्थिती काय बोलते आहे हे यांची देही याची डोळा मी पाहिला आहै हा जन्ममृत्युचा सोहळा ...
तर आपल्यापुढे विषय आहे... आपण कसे जगावे ? 
आपले मन मोकळे खुलं करून सहजतेने या वर्तमानी सर्वोत्तम प्रेम कामगिरी करत एकनिष्ठ राहण्याची किमया साधली पाहिजे.
आपण आपल्या सक्षमतेने या वर्तमानी एकमेकांना समजून उमजून सतत कार्यरत रहावे .कोणाही जीवाचा ना घडो मत्सर ...
शेवटी जे उपजे ते नाशे परी पुनरपि दिसे ... हे चक्र चालू राहते. हे खरं असेल तर आजचं वास्तव कसे आहे व ते प्रेमानं जगणं सुंदर करण्यासाठी मला याचि जन्मी साधी नारायण नाहीतर हीन पशुहून  ...
मला वाटतं सर्व काही सुरळीत चालू ठेवण्यासाठी आपले कौशल्य समाजसेवेतील चातुर्य संघटन वाढीसाठी जगाला प्रेम अर्पावे हा संदेश मिळाला आहे.. यासाठी अवघाचि संसार सुखाचा करीन...
मला भ्रमित करण्यात जे माझे विकार आहेत ते मलाच पूर्ण निर्मूलन करावयाचे आहेत.
मनुष्य हा समाज प्रिय आहे व तो समूहाने गुण्यागोविंदाने एकत्र राहतोय. हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा जीवभाव सर्वांठायीं असावा याकरिता तो समन्वय समन्यायी पद्धतीने पूर्ण समर्पित आहे.
तो समन्वय ऋणानुबंध जोडत प्रेम प्रेरणा नम्रता सहनशीलता करूणा दया क्षमा शांती शिस्त समाधान अंगी सद्गुणांची दिव्य रास निर्माण करीत जन हेचि जनार्दन एका जनार्दनी भजन करत उघडा डोळे बघा नीट.. हे सत्य अबाधित राखत आहे.
हे सत्कृत्य आचरणातून सिद्ध करण्यासाठी तो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी असा समभाव एकरूपता ही साधत बहोत सुकृताची जोडी तेणें विठ्ठली आवडी.. म्हणत वारी वारी जन्ममरणांते वारी,हारी पडलो आता संकट निवारी ...याची जाणीव ही आहे .
या जाणीवेतून पुढे जात एकत्व सत्य प्रेम यांचे चिरंतन ध्यान करत आहे. ही एक नजर एक तत्व दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी... याची प्रचिती घेतोय. जीवनात सुंदर आविष्कार प्रकटन करतोय . आणि म्हणूनच तो सण उत्सव उपास तापास वर्तवैकल्य करीत पूजा अर्चना अत्यंत विनम्रपणे करीत आहे. हे जनमाणसं अंतर्बाह्य दुध जैसी सफेदी घेत आत बाहेर एकच ,जे आहे ते वास्तव प्रेमानं करीत दोषांचे निवारण करीत पुढे पुढे जात आहे . अखेर हे सर्व सर्वांचे भलं व्हावं यासाठी समर्पित आहे. हीच खरी ओळख खरी मैत्री खरी भक्ती खरी शक्ती आहे हे तो जाणतो व एकवटतो आणि समाजहित समाजकल्याण ही नम्रतेची पूजा पवित्र अंतःकरणाने करत आहे.
आपण आपल्या वाणीतून देहबोलीतून कर्मातून मानविय सद्गुणांनी युक्त अशी जीवनशैली तयार करत आहोत.
आपली सत्संग देशाटन कशी चालू आहे किंवा नाही याबाबत आपली ओळख समाजपटलावर आवश्य रहावी म्हणून सणवार लग्नकार्य उत्सव वाढदिवस जयंत्या पुण्यतिथी साजरी करतोय.तसेच समाजाभिमुख कामातून सेवाभावी ओळख म्हणून रौप्य अमृत हिरक महोत्सवात ही सहभागी होत राहतो .
हे सर्व आनंदी वृत्तीने व्हावे . सुख दुःखात ही जे करणे आवश्यक आहे तसे आचरण रहावे .
आणि म्हणूनच जनजागृतीसाठी परोपकारी विवेकी पालकत्व हवे. संवेदनशीलता ठेवून माणुसकी धर्म वाढवत जाणे उचित आहे.
संस्कृती सुसंगत ठेवून संयमी संवेदनशील समाजमन बांधिलकी जोडत आपण वागत रहावे . आपल्या परंपरा रितीरिवाज कायमदायम समर्थपणे चालवल्या तरच चांगल्याला चांगलं म्हणण्याची प्रथा सुरू राहील.  
माणसाला माणूस प्रिय असावा. यासाठी समर्पित भावनेने सेवा व्हावी आणि जगाला प्रेम अर्पावे. 
प्रेमभाव निर्मल निरंकुश निरागस निर्मोही निर्व्याज निर्लेप रहावा .. हेच जीवन सत्य आहे कारण देवानेच सर्वकाही आपणाला बहाल केले आहे.
आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे... मग काय खावे प्यावे..सगळं जाणतेणं करावं ... व्रतवैकल्ये उपवास कशाचा करायला हवा हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा रस्ता आहे तो चोखंदळ राखावा .. तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार...आणि हे देवकण सुशोभित करणारे कर्म बोलते करावं लागेल... कारण देवाचेच देणं जे शुभ आहे ते प्रेमानं जगणं सुंदर करीत आहे असा विश्वास दृढ धरावा व स्थिरमन शुभ शकुन आहे हेच आपले जीवनमान उंचावते, धन्यवाद जी.
 
उत्तर लिहिले · 16/7/2024
कर्म · 475
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही