2 उत्तरे
2
answers
बोलणारी देवीची मूर्ती कोठे आहे?
0
Answer link
बोलणारी देवीची मूर्ती महाराष्ट्रात खालील ठिकाणी आहे:
- वडगाव निंबाळकर, बारामती तालुका, पुणे जिल्हा: येथे बोलक्या देवीचीstatue आहे, जी नवसाला पावणारी मानली जाते. Google Maps
0
Answer link
*🏪‘येथे’ देवीची मूर्ती बोलते?*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
पाटणा :आपल्याकडे परमार्थातील जे चार मार्ग आहेत त्यापैकी कर्ममार्ग, योगमार्ग आणि ज्ञानमार्गात मूर्तीपूजेची आवश्यकता नसते. https://bit.ly/4i45CEq मात्र, भक्तिमार्गात देव-भक्त संबंधातील प्रेम वाढण्यासाठी मूर्तीपूजा सुरू झाली. काही विशिष्ट पदार्थांपासून बनवलेल्या मूर्तीची विशिष्ट विधींनी प्राणप्रतिष्ठापना केली जाते. अशा मूर्तीच्या माध्यमातून संबंधित देवता सेवा स्वीकारते आणि प्रतिसादही देते असे मानले जाते. नामदेवांची खीर विठ्ठलाने खाल्ली, गोंदवलेकर महाराजांच्या राम मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू आले, टेंब्ये स्वामींशी बोलणारी दत्तात्रेयांची मूर्ती किंवा रामकृष्ण परमहंस यांच्या चरित्रात कालीमाता किंवा एका रामपंथीय साधूकडील बाल रामाची मूर्ती अशा अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. मूळचे ब्रिटिश असलेले वैष्णव संन्यासी कृष्णप्रेम यांच्या नैवेद्याचा हलवाही कृष्णाने खाल्ल्याची नोंद आहे. देशभरात अनेक मंदिरांमधूनही अधूनमधून अशा गूढ गोष्टींची माहिती समोर येत असते. बिहारमध्येही असेच एक जुने मंदिर आहे. तिथे रात्रीच्या निरव शांततेत काही शब्द उमटत असतात. हे शब्द देवीच्या संवादाचे असल्याचेम्हटले जाते.
𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫हे मंदिर राज राजेश्वरी त्रिपुर सुंदरीचे आहे. तंत्रसाधनेतील साधकांची निष्ठा असलेल्या या मंदिरात दहा महाविद्यांशी संबंधित छिन्नमस्ता, बगलामुखी, तारा आदी देवींच्या मूर्तीही आहेत. तसेच बटूक भैरव, कालभैरव आदींच्याही मूर्ती आहेत. मंदिरात कुणी नसते त्यावेळी तेथे काही आवाज ऐकू येतात, असे म्हटले जाते. मध्यरात्रीच्या सुमारास याठिकाणी काही शब्दांचे ध्वनी ऐकू येतात. काही संशोधकांनीही याबाबतची पडताळणी केली होती. आवाज ऐकू येतात हे खरे असल्याचे त्यांनीही म्हटले होते. मात्र, त्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. काही ध्वनी वातावरणात भ्रमण करीत राहतात तेच ऐकू येत असावेत, असे काहींचे म्हणणे आहे. हे मंदिर चारशे वर्षांपूर्वीचे आहे. भवानी मिश्र नावाच्या एका तांत्रिक साधूने मंदिराची स्थापना केली. सध्या त्याचेच वंशज मंदिराचे पुजारी आहेत.https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24
