2 उत्तरे
2
answers
करगोटा का वापरतात?
2
Answer link
काही उत्तरे मी वाचली जी फारच भयंकर शास्त्रज्ञ लोकानी लिहीली आहेत.
करगोटा बांधण्या मागील कारण दुस-या ज्ञानी पुरुषानी दिलेले (कदाचित) खरे असेल परंतु समाज शास्त्र यातील एकही उत्तर मान्य करत नाही.
समाज शास्त्रा नुसार करगोटा हा हिंदु माणसे बांधतात असे म्हणणे साफ चूक आहे. अनेक देशात, अनेक संस्कृतीत करगोटा बांधतात. त्याचे कारण एकदम साधे आहे.
आजपासून साधारणत: शभर वर्षापूर्वी जास्तीत जास्त पुरुष हे लंगोटी लावायचे. शिवलेली चड्डी ही आपल्या आयुष्यात आली इंग्रजामुळे. आज जी होजीयरी इलेस्टिक ची चड्डी वापरतो ती आली केवळ पस्तीस वर्षा पूर्वी.
प्रत्येक संस्कृतीतील पुरुष हा लंगोट लावण्यासाठी काहीतरी पाहीजे म्हणून कम्बरेला दोरा बांधतात. त्याला धार्मिक मुलामा देण साहजिकच होत.
अनेकदा स्त्रीया ही करगोटा बांधतात. कारण त्यांच्या मासीक पाळीमध्ये त्याना कापड लावता येत नसे. जवळ जवळ सम्पूर्ण जगातील स्त्रीया असा दोरा बांधतात. केवळ सत्तर वर्षापूर्वी नऊवार साडी च्या ठिकाणी पाचवार 'गोल' साडी आली तेव्हा परकर नावाचा कपडा अधिक आल्यामुळे साडी बरोबर कपडा ही खोचण्याची सोय झाली. गोल साडी बरोबरच शिवलेली चड्डी देखिल आली त्यामुळे स्त्रियांचे करगोटा लावण्याचे प्रमाण घटले आहे.
स्त्रियांच्या करगोट्याची वाच्यता कुठे होत नसे. मुलाला करगोटा आला (किवा मुलीस) याचा अर्थ तो किवा ती वयात आली आहे असा अर्थ अनेक जुन्या कथा कादम्ब-यात आढळतो.
0
Answer link
करगोटा (Kargota) कंबरेला बांधायचा एक दोरा असतो. तो साधारणपणे लहान मुले आणि काही पुरुष वापरतात. करगोटा वापरण्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- सुरक्षा: लहान मुलांना तो बांधल्याने ते सुरक्षित राहतात, कारण तो कमरेला घट्ट बांधलेला असतो आणि त्यामुळे धोक्याची शक्यता कमी होते.
- ओळख: पूर्वीच्या काळी, लहान मुले हरवल्यास त्यांची ओळख पटावी म्हणून करगोटा बांधला जायचा.
- आरोग्य: काही लोकांच्या मते, करगोटा बांधल्याने पोटाचे आरोग्य सुधारते आणि पचनक्रिया चांगली राहते.
- संस्कृती आणि परंपरा: करगोटा भारतीय संस्कृतीत एक पारंपरिक वस्त्र आहे. काही विशिष्ट समुदायांमध्ये तो शुभ मानला जातो.
Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहे.