अन्न प्येय आयुर्वेद आरोग्य आहार

कडुलिंबाच्या पानाचा रस पिल्याने काय फायदा होतो व तो किती प्रमाणात व किती दिवस प्यायला पाहिजे?

1 उत्तर
1 answers

कडुलिंबाच्या पानाचा रस पिल्याने काय फायदा होतो व तो किती प्रमाणात व किती दिवस प्यायला पाहिजे?

6
काड्या दांत घासण्यास उपयोगी, लाकूड इमारतीसाठी.

आयुर्वेदानुसार - जंतुनाशक, सापाच्या विषावर, गर्मीवर, रक्तदोषहारक, विषमज्वरावर, कृमिनाशक, दाहावर, महारोगावर, बाळंतरोगावर, अफूच्या उतारासाठी, जखमेवर, मुळव्याध, मधुमेह, इ. अनेक रोगांवर

यापासून बनणाऱ्या औषधी - पंचनिंबचूर्ण, अनेक औषधांमधील एक प्रमुख घटक.

कडुलिंब या झाडाची पाने खोबरेल तेलात काळी होईपर्यंत उकळायची आणि ते तेल नियमितपणे लावल्याने केसांची वाढ जोमाने होते. केसांच्या अनेक समस्या दूर होतात.

पोटात जंत झाले तर पानांचा रस काढून एक चमचा रसात थोडा (अगदी चिंचोक्याएवढाच) गूळ घालून तीन दिवस प्याल्यास जंत बाहेर पडतात.

अंगाला खाज सुटत असेल तर पानाचा रस सर्व अंगाला किंवा आंघोळीच्या गरम पाण्यात दहा -बारा कडुलिंबाची पान ठेचून घालावी.

ताप आल्यास सकाळ-संध्याकाळ कडुलिंबाच्या सालीच्या काढा घेतात.

कडुलिंबाची पान जखमेवर कुटून लावल्यास जखम लवकर बरी होते. निबोण्यांचे तेलही औंषधी आहे.

रक्त दूषित झाल्यावर त्वचेवर डाग पडतात, तेव्हा हे तेल लावतात. औषधी गुणधर्म आहेत. या झाडाचे साल, मूळ, पान, बिया सर्वच औषधीं आहेत.

सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे कडुनिंब हे अत्युत्तम जंतुनाशक आहे. ह्याच्या पानांची पूड शेतात पसरल्यास खत म्हणून उपयॊगी तर पडतेच पण त्यापेक्षाही रोपांना किडीपासून दूर ठेवते.

उत्तर लिहिले · 14/7/2018
कर्म · 3775

Related Questions

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री?
जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?
आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छता बाबत थोडक्यात माहिती लिहा?
आरोग्य हे एक देणगी?
💉जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो?
खोकल्यामुळे छातीत का दुखते?
सकाळी पाणी केव्हा प्यावे?