2 उत्तरे
2
answers
लाल हिरवी काळी द्राक्षे कितपत चांगली आहेत?
0
Answer link
लाल, हिरवी आणि काळी द्राक्षे आरोग्यासाठी चांगली असतात आणि त्यांचे स्वतःचे फायदे आहेत.
1. लाल द्राक्षे:
- लाल द्राक्षांमध्येResveratrol नावाचे अँटिऑक्सिडेंट असते, जे हृदयरोगापासून बचाव करते.
- त्वचेसाठी आणि कर्करोगासाठी देखील ते फायदेशीर आहे.
2. हिरवी द्राक्षे:
- हिरव्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन 'के' आणि 'सी' भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
- वजन कमी करण्यासाठी हे उत्तम आहे.
3. काळी द्राक्षे:
- काळी द्राक्षे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात.
- यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स मेंदूसाठी चांगले असतात.
त्यामुळे, तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार तुम्ही कोणतीही द्राक्षे खाऊ शकता.
0
Answer link
*🍇 द्राक्षे : लाल, हिरवी की काळी?आरोग्यासाठी कोणती चांगली?*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
द्राक्षे केवळ स्वादिष्टच नाहीत तर अनेक आरोग्य फायद्यांनी भरलेली आहेत. https://bit.ly/4crrvfN द्राक्षे खायला जितकी स्वादिष्ट लागतात, तितकीच आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. काळी हिरवी आणि लाल द्राक्षे खातो. ह्या तिघांपैकी कोणती द्राक्षे अधिक पोषणतत्त्वांनी भरलेली आहेत? हे पाहु.
हिरवी आणि काळी द्राक्षे अधिक गोड असतात. दोन्ही प्रकारात व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन K, पोटॅशियम आणि फायबर्स आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. काळी द्राक्षे शरीरातील जळजळ कमी करण्यास, रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि वृद्धत्व कमी करण्यास मदत करतात.

याच वेळी, हिरवी द्राक्षे मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहेत, हाडे मजबूत करतात, रक्तदाब नियंत्रित करतात आणि पचनशक्ती वाढवतात. लाल द्राक्षे आंबट आणि गोड चवीची असून, ती चवीला अप्रतिम असतात. याशिवाय, लाल द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन A आणि C मुबलक प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारशक्तीला बळकटी देतात.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫रोज लाल द्राक्षे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
🍇आता प्रश्न असा आहे की, कोणती द्राक्षे खावीत?
तुम्ही हिरवी, काळी किंवा लाल द्राक्षे निवडू शकता. जर तुम्हाला गोड आणि आंबट चव हवी असेल, तर हिरवी किंवा लाल द्राक्षे खा. गोड चव हवी असल्यास, काळी द्राक्षे खा. तज्ज्ञांच्या मते, काळी आणि लाल द्राक्षे अधिक आरोग्यदायी असतात, तर हिरव्या द्राक्षांमध्ये त्यांच्यापेक्षा थोडी कमी पोषणतत्त्वे असतात.द्राक्ष्यांचे सेवन हाडे मजबूत करण्यासाठीही गुणकारी ठरते. डोळ्यांच्या आरोग्यासाठीही द्राक्षे लाभदायक ठरतात. त्वचेला तजेलदारपणा लाभावा, यासाठीही द्राक्षे उपयुक्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात.https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24