2 उत्तरे
2
answers
रोजच्या जेवणात किती कॅलरीज असतात हे सांगणारे ॲप कोणते?
0
Answer link
रोजच्या जेवणात किती कॅलरीज (Calories) असतात हे सांगणारे काही ॲप्स (Apps) खालील प्रमाणे:
- हेल्थीफायमी (Healthifyme): हे ॲप भारतीय जेवणातील कॅलरीज आणि पोषक तत्वांची माहिती देते. यात तुम्ही किती पाणी प्यायलात याची नोंद ठेवू शकता आणि वजन कमी करण्यासाठी तसेच फिटनेससाठी हे ॲप उपयुक्त आहे.
- माय फिटनेस पॅल (MyFitnessPal): हे ॲप जगभरातील पदार्थांमधील कॅलरीजची माहिती देते. यात तुम्ही जेवणाचे रेकॉर्ड (Record) ठेवू शकता आणि ते तुमच्या फिटनेस ध्येयांनुसार ॲडजस्ट (Adjust) करू शकता.
- लूज इट! (Lose It!): वजन कमी करण्यासाठी हे ॲप खूपच प्रसिद्ध आहे. यात तुम्ही तुमच्या जेवणाचे फोटो अपलोड (Upload) करू शकता आणि ॲप तुम्हाला कॅलरीजची माहिती देईल.
- नूट्रॅTrack ॲप (Nutracheck): ह्या ॲप मध्ये तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणातील कॅलरीज आणि पोषक तत्वांचा मागोवा घेऊ शकता.
हे ॲप्स तुम्हाला तुमच्या रोजच्या जेवणातील कॅलरीजची माहिती देऊन, चांगले आरोग्य राखण्यास मदत करतील.
0
Answer link
*🉑 तुमच्या जेवणात किती कॅलरीज आहेत हे सांगणारे अॅप विकसित*
————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
लठ्ठपणाशी झगडत असलेले तसेच मधुमेह किंवा हृदयविकाराने पीडित लोक नेहमीच खाद्यपदार्थांमधील कॅलरीजबाबत सतर्क असतात. http://bit.ly/3n4NVKc आता अशा लोकांना भोजनात किती कॅलरीज आहेत हे जाणून घेणे सोपे ठरणार आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर) ची हैदराबादमधील प्रयोगशाळा ‘राष्ट्रीय पोषण संस्थान’ (एनआयएन) ने यासाठी एक मोबाईल अॅप विकसित केले आहे.
‘एनआयएन’ने पोषण स्तरातील सुधारणेसाठी ‘न्यूट्रिफाय इंडिया नाऊ’ नावाचे हे अॅप लाँच केले आहे. ते विकसित करणार्या संशोधकांनी म्हटले आहे की हे अॅप पोषणासंबंधी गरजांबाबत जागृती निर्माण करण्याचे कार्य करील. भारतीय आहार आणि त्यामधील पोषक मूल्यांबाबत हे अॅप विस्तृत माहिती देऊ शकते. ऊर्जा संतुलनाबाबतचा लेखाजोखाही हे अॅप देऊ शकते. भारतीय लोकसंख्येच्या विशिष्ट डेटाबेसच्या आधारे हे अॅप विकसित करण्यात आले आहे. ते भारतीय खाद्यपदार्थांमधील कॅलरीज, प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, खनिजे आणि रेसिपीसहीत पोषक तत्त्वांचीही माहिती देऊ शकते. भारतीय वापरकर्त्यांना नजरेसमोर ठेवून ते विकसित करण्यात आले आहे. ते सतरा भारतीय भाषांमध्ये खाद्यपदार्थांची नावे उपलब्ध करते.
👇हे अॅप प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे
___________