2 उत्तरे
2
answers
किडनीचे आजार कसे ओळखायचे?
0
Answer link
किडनीचे आजार ओळखण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे आणि लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
लक्षणे:
- वारंवार लघवीला जाणे: विशेषतः रात्रीच्या वेळी जास्त वेळा लघवीला जावे लागणे.
- लघवीत बदल: लघवीचा रंग बदलणे, लघवीला जास्त फेस येणे किंवा रक्त येणे.
- शरीरावर सूज: चेहरा, पाय आणि घोट्यांवर सूज येणे.
- उच्च रक्तदाब: किडनीच्या आजारामुळे उच्च रक्तदाबाची समस्या वाढू शकते.
- थकवा आणि अशक्तपणा: नेहमी थकल्यासारखे वाटणे आणि अशक्तपणा जाणवणे.
- भूक न लागणे: भूक कमी होणे किंवा अन्नाची इच्छा नसणे.
- त्वचेला खाज येणे: त्वचेवर सतत खाज येणे.
- श्वास घेण्यास त्रास: श्वास घेण्यास त्रास होणे, विशेषतः झोपताना.
- डोकेदुखी: वारंवार डोके दुखणे.
निदान:
- रक्त तपासणी: किडनी फंक्शन टेस्ट (KFT) द्वारे किडनीच्या कार्याचे निदान केले जाते.
- लघवी तपासणी: लघवीमध्ये प्रोटीन आणि इतर घटकांची तपासणी केली जाते.
- सोनोग्राफी (Sonography): किडनीची रचना आणि आकार तपासण्यासाठी सोनोग्राफी केली जाते.
- बायोप्सी (Biopsy): आवश्यक वाटल्यास किडनी टिश्यूची बायोप्सी केली जाते.
जर तुम्हाला वरील लक्षणे दिसत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
0
Answer link
*♏ किडनीचे छुपे आजार ओळखा*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
किडनीचे आजार छुपे असून अनेकदा ते शेवटच्या टप्प्यापर्यंत कळतच नाहीत. https://bit.ly/4cBzuqA त्यामुळे पायाला, चेहऱ्याला सूज येणे, लघवीतून रक्त जाणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. या गोष्टी आज घडल्या आणि उद्या घडल्या नाहीत म्हणून त्या दैनंदिन जीवनाचा भाग नसतात हे लक्षात घ्यायला हवे, असा स्पष्ट इशारा किडनीतज्ज्ञ डॉ. श्रीरंग बिच्छू यांनी दिला आहे. रोटरी क्लब ऑफ मुंबई, पार्लेश्वर आयोजित संवाद डॉक्टरांशी या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पात रक्तदाब व किडनीचे आजार या विषयावर ते बोलत होते.
अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी किडनीचे कार्य, रक्तदाबावर असणारे किडनीचे नियंत्रण, डायलिसिस आणि किडनीरोपण आदी विषयांबद्दल माहिती दिली.

अनेकदा सर्वसामान्यांमध्ये स्वतःच्या शरीराबद्दल, शरीरातील अवयवांच्या कार्याबद्दल अत्यंत कमी माहिती असते. त्यामुळे आजाराची लक्षणे लवकर लक्षात येत नाहीत. ᵐᵃʰᶤᵗᶤ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒᶰउच्च रक्तदाब हे किडनीच्या आजाराचे एक महत्त्वाचे लक्षण असू शकते. रक्तातील अशुद्धता दूर करणे हे किडनीचे महत्त्वाचे कार्य आहे. याचबरोबर रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे, हिमोग्लोबिन निर्मिती, हाडे बळकट राखण्याचे कामही किडनी करते. त्यामुळे वर्षातून एकदा रक्तदाब व लघवी तपासून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ऍनिमिया झाला असेल, तर त्याची कारणेही शोधायला हवी. त्वचा कोरडी पडणे, खाज येणे, जेवण न जाणे या किडनीसंबंधी आजाराच्या काही पायऱ्या आहेत, अशी माहिती यावेळी डॉ. बिच्छू यांनी दिली.
किडनीसंबंधी आजारात क्रॉनिक आणि ऍक्युट असे दोन प्रकार असतात. ऍक्युट किडनी आजार बरा होतो, मात्र क्रॉनिक आजार असेल तर बरा होत नाही. डायबेटिस, उच्च रक्तदाब, संसर्ग, जनुकीय अशा विविध कारणांमुळे या आजाराला क्रॉनिक आजाराचे रूप येते. यासाठी मीठ कमी खाणे, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी औषधे वेळेवर घेणे आवश्यक असते. किडनी स्टोन हा आजार टाळण्यासाठी भरपूर पाणी पिण्याची गरज असते. दिवसभरात अडीच ते तीन लीटर लघवी शरीराबाहेर गेली, तर हा आजार ९५ टक्के प्रमाणात टाळता येऊ शकतो. काही वेळा किडनी स्टोन झालेले असताना वेदना होत नाहीत. त्यामुळेही या आजाराबद्दल कळू शकत नाही.
गेल्या काही काळात डॉक्टरी सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक्स घेण्याचे प्रमाण वाढले आहे. ही अँटिबायोटिक्स किडनीवर विपरित परिणाम करतात. त्यामुळे या औषधांवर नियंत्रण आवश्यक आहे. हे नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून येत्या दोन ते तीन वर्षांत यासंदर्भात उपाययोजना करण्यात येतील, असे डॉ. बिच्छू यांनी सांगितले. किडनीचे आजार झालेल्या व्यक्ती डायलिसिसच्या बळावर चांगले आयुष्य जगू शकतात. हे तंत्रज्ञान सुधारत आहे. Ⓜhttps://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24