Topic icon

प्येय

0

'एकच प्याला' हे नाटक राम गणेश गडकरी यांनी लिहिले आहे.

राम गणेश गडकरी हे एक प्रसिद्ध मराठी नाटककार, कवी आणि लेखक होते.

या नाटकामध्ये त्यांनी दारू पिण्याच्या व्यसनाचे दुष्परिणाम दाखवले आहेत.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 220
4
सर्व प्रथम तुम्ही मित्रांना सांगा की
मी ड्रिंक पिले सोडले आहे
जर मित्र बसायला बोलवत असतील तर जाऊ नका
काहीतरी कारण सांगा
शक्यतो ड्रिंक घेणाऱ्या मित्रां पासून दूर राहा

विचार change करायचेत तर चांगले मित्र जोडा

आणि पैसे save करायचेत तर मग जर तुम्ही कामाला किव्वा जॉब ला जात असाल तर एक बँक अकाउंट काढून दर आठवड्याला किव्वा महिन्याला पैसे regulerly बँकेत जमा करा
काही खर्च असेल तर तेवढेच पैसे वेगळे शिल्लक ठेवा
👍
उत्तर लिहिले · 15/7/2018
कर्म · 2170
6
काड्या दांत घासण्यास उपयोगी, लाकूड इमारतीसाठी.

आयुर्वेदानुसार - जंतुनाशक, सापाच्या विषावर, गर्मीवर, रक्तदोषहारक, विषमज्वरावर, कृमिनाशक, दाहावर, महारोगावर, बाळंतरोगावर, अफूच्या उतारासाठी, जखमेवर, मुळव्याध, मधुमेह, इ. अनेक रोगांवर

यापासून बनणाऱ्या औषधी - पंचनिंबचूर्ण, अनेक औषधांमधील एक प्रमुख घटक.

कडुलिंब या झाडाची पाने खोबरेल तेलात काळी होईपर्यंत उकळायची आणि ते तेल नियमितपणे लावल्याने केसांची वाढ जोमाने होते. केसांच्या अनेक समस्या दूर होतात.

पोटात जंत झाले तर पानांचा रस काढून एक चमचा रसात थोडा (अगदी चिंचोक्याएवढाच) गूळ घालून तीन दिवस प्याल्यास जंत बाहेर पडतात.

अंगाला खाज सुटत असेल तर पानाचा रस सर्व अंगाला किंवा आंघोळीच्या गरम पाण्यात दहा -बारा कडुलिंबाची पान ठेचून घालावी.

ताप आल्यास सकाळ-संध्याकाळ कडुलिंबाच्या सालीच्या काढा घेतात.

कडुलिंबाची पान जखमेवर कुटून लावल्यास जखम लवकर बरी होते. निबोण्यांचे तेलही औंषधी आहे.

रक्त दूषित झाल्यावर त्वचेवर डाग पडतात, तेव्हा हे तेल लावतात. औषधी गुणधर्म आहेत. या झाडाचे साल, मूळ, पान, बिया सर्वच औषधीं आहेत.

सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे कडुनिंब हे अत्युत्तम जंतुनाशक आहे. ह्याच्या पानांची पूड शेतात पसरल्यास खत म्हणून उपयॊगी तर पडतेच पण त्यापेक्षाही रोपांना किडीपासून दूर ठेवते.

उत्तर लिहिले · 14/7/2018
कर्म · 3775
11
पहिल्या दिवसा पासून चहा मध्ये दूध वापरने बंद करा  नंतर ७ दिवसांनी साखर घालणे बंद करा फक्त कोरा चहा प्यायला बरा वाटत नाही १५ ते २० दिवसात आपोआपच चहा पिण्याची सवय कमी होईल नंतर गरम पाणी प्यावे तुमची चहा प्यायची इच्छा संपून जाईल
उत्तर लिहिले · 12/6/2018
कर्म · 460
13
पाणी जितके जास्त प्याल तितके शरीरास आरोग्यदायक ठरते...
पाणी हे दर दोन दोन तासाने प्यावे... पाणी प्यायल्याने शरीरातील ओलावा टिकून राहतो आणि शुष्क पणा कमी होतो...
पाण्याची कमतरता शरीरास लागु देऊ नये... नाहीतर अनेक आजार उद्भवतात...
असो..

पावसाळ्यात व हिवाळयात मनुष्य कमी पाणी पितो...
म्हणूनच पाण्याची नैसर्गिक भर शरीरास मिळण्यासाठी सिझन वाइज फळे उपलब्ध होतात... ती रसाळ फळे खावी...

शारीरिक कष्टाची कामे करत असलेल्या व्यक्तींना दिवसाला दोन ते अडीच लिटर पाण्याची गरज असते... उन्हाळ्यात शरीराला स्वतःहून पाणी हवे असते, मात्र, अन्य ऋतूमध्ये पाणी आठवणीने प्यावे लागते... श्रमिक, गर्भवती स्त्रिया, स्तनपान देणाऱ्या माता यांनी पाणी अधिक प्यावे. वाढत्या वयानुसार शरीरातील पाणी कमी होते...

उत्तर लिहिले · 11/6/2018
कर्म · 458560
8
काळी चहा मध्ये लिंबू टाकून प्यायल्यास कोणतेही दुष्परिणाम होत नाही...
लिंबू हे शरीरासाठी आरोग्यदायी आहे...
फूड पॉइझन, पोटात बिघाड, पोटाच्या अनेक समस्येवर लिंबू एकमात्र चांगले परिणाम देते...
आणि चहा पिणे हे फारसे चांगले नाही... तरीही त्यात अद्रक(आले), वेलची, लवंग यांसरखे एन्टीबायो घटक टाकल्यास चहाचा दुष्परिणाम शरीरावर होत नाही... लिंबू देखील चहा मध्ये टाकुन प्यायल्यास चांगले परिणाम जाणवतील...
परंतु अधिक प्रमाणात सेवन करू नये...
साइट्रिक आम्ल(एसिड) हे लिंबू मध्ये असते...
म्हणून कोणतेही जिन्नस आहारात समावेश करताना मर्यादित असू दे...
उत्तर लिहिले · 8/6/2018
कर्म · 458560