अन्न प्येय आहार

पावसाळ्यात किती लिटर पाणी प्यावे?

2 उत्तरे
2 answers

पावसाळ्यात किती लिटर पाणी प्यावे?

13
पाणी जितके जास्त प्याल तितके शरीरास आरोग्यदायक ठरते...
पाणी हे दर दोन दोन तासाने प्यावे... पाणी प्यायल्याने शरीरातील ओलावा टिकून राहतो आणि शुष्क पणा कमी होतो...
पाण्याची कमतरता शरीरास लागु देऊ नये... नाहीतर अनेक आजार उद्भवतात...
असो..

पावसाळ्यात व हिवाळयात मनुष्य कमी पाणी पितो...
म्हणूनच पाण्याची नैसर्गिक भर शरीरास मिळण्यासाठी सिझन वाइज फळे उपलब्ध होतात... ती रसाळ फळे खावी...

शारीरिक कष्टाची कामे करत असलेल्या व्यक्तींना दिवसाला दोन ते अडीच लिटर पाण्याची गरज असते... उन्हाळ्यात शरीराला स्वतःहून पाणी हवे असते, मात्र, अन्य ऋतूमध्ये पाणी आठवणीने प्यावे लागते... श्रमिक, गर्भवती स्त्रिया, स्तनपान देणाऱ्या माता यांनी पाणी अधिक प्यावे. वाढत्या वयानुसार शरीरातील पाणी कमी होते...

उत्तर लिहिले · 11/6/2018
कर्म · 458560
0

पावसाळ्यात किती पाणी प्यावे हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की तुमची शारीरिक हालचाल, आरोग्य आणि हवामान. तरीही, साधारणपणे, पावसाळ्यात दररोज 2 ते 3 लीटर पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते.

पावसाळ्यात पाणी पिण्याचे फायदे:

  • शरीराला हायड्रेटेड ठेवते.
  • रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
  • पचनक्रिया सुधारते.
  • त्वचा निरोगी राहते.

पावसाळ्यात पाणी कमी पिण्याची कारणे:

  • तहान कमी लागणे.
  • हवामान थंड असणे.
  • घाम कमी येणे.

पावसाळ्यात पाणी पिण्याचे काही नियम:

  • तहान लागल्यावर पाणी प्या.
  • शिळे पाणी पिऊ नका.
  • उकळलेले पाणी प्या.
  • जास्त पाणी पिऊ नका.

टीप: जर तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 440

Related Questions

एकच प्याला हे नाटक कोणत्या नाट्यलेखकाचे आहे?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
माझ्या मित्रांसोबत ड्रिंकमध्ये खूप पैसे खर्च होतात, मला चांगले विचार डेव्हलप करायचे आहेत, पैसे कसे वाचवायचे?
कडुलिंबाच्या पानांचा रस पिल्याने काय फायदा होतो व तो किती प्रमाणात आणि किती दिवस प्यायला पाहिजे?
मी चहा जास्त पितो, मला चहा सोडायचा आहे, पण सुटत नाही?
कोऱ्या चहात लिंबू टाकून पिल्यास चांगले की वाईट?
ड्रिंक्स घेतल्यानंतर व्यवस्थित कसे राहता येईल?