3 उत्तरे
3
answers
मी चहा जास्त पितो मला सोडायचा आहे चहा, पण सुटत नाही ?
11
Answer link
पहिल्या दिवसा पासून चहा मध्ये दूध वापरने बंद करा नंतर ७ दिवसांनी साखर घालणे बंद करा फक्त कोरा चहा प्यायला बरा वाटत नाही १५ ते २० दिवसात आपोआपच चहा पिण्याची सवय कमी होईल नंतर गरम पाणी प्यावे तुमची चहा प्यायची इच्छा संपून जाईल
7
Answer link
स्वअनुभवावरुन सांगू इच्छितो की चहा सोडणे तसे फार अवघड नाही मी देखील महाविद्यालयात शिकत असताना रात्री उशिरापर्यंत जागरण करून अभ्यास करणे सोपस्कार व्हावे म्हणून चहा प्यायला सुरुवात केली काही दिवसांनी जेव्हा चहा सोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा दिनचर्येवर परिणाम होत असल्याचे जाणवले.
जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यानुसार-
१)चहा हे एक प्रकारचे उत्तेजक पेय आहे सुरुवातीला चहा सोडणे अवघड वाटत असले तरी अशक्य मुळीच नाही.
२)चहाची तल्लफ होत असल्यास थोडी साखर टाकून कपभर गरम दूध घ्यावे.
३)दिवसातून दोन तीन वेळा गरम दूध अथवा पाणी घ्यावे.
४)चहाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम समजावून घेणे आवश्यक आहे तसेच मनाची समजूत घालावी...

4
Answer link
तुम्हाला चहाचे व्यसन असेल तर तुम्ही चहा लगेच सोडू शकणे कठीण असले तरी अशक्य नाही.तुमची चहा पिण्याची वेळ सकाळीच होत असावी.तुम्ही पूरँण कपभर चहा घेत असाल तर पाऊण कप चहा घ्या.पहिल्या चहानंतर सद्ध्या तुम्ही जेवढ्या वेळानंतर चहा घेताय ती वेळ वाढवा.असे करत करत तुम्ही घेत असलेल्या चहाचे प्रमाण कमी करत जा.तसेच एक तासाने चहा घेत असाल तर तो दर दोन तासांनी घ्या.याप्रमाणे हळूहळू तुमचा चहा कमी होऊ शकतो.