घरगुती उपाय आरोग्य व उपाय आरोग्य

कंबरदुखीवर घरगुती उपाय कोणता करता येईल?

3 उत्तरे
3 answers

कंबरदुखीवर घरगुती उपाय कोणता करता येईल?

0
एका मोठ्या चमच्यामध्ये नारळाचे तेल घ्या. यात लसूणाच्या सोललेल्या ५ ते ६ पाकळ्या टाकून भाजून घ्या. जेव्हा तेल थंड होईल तेव्हा या तेलाने कंबरेसोबत पूर्ण शरीराची मालिश करून घ्यावी आणि मग अंघोळ करावी. लसून हे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते. यामुळे तुम्हाला वेदनेपासून लवकर आराम मिळेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की मालीश करण्याआधी किमान ३० मिनिटांनीच अंघोळ करावी. जेणेकरून या वेळेत तुमचे शरीर हे मिश्रण शोषून घेईल.




कपड्याने द्या शेक



जेव्हा कंबर खूप दुखत असेल आणि कोणी मसाज करणारा सुद्धा नसेल तेव्हा गरम पाण्यात मीठ मिसळा आणि त्यात एक स्वच्छ कपडा टाकून भिजवा आणि मग तो कपडा पिळून त्यातून निघणाऱ्या वाफेने कंबरेला शेक द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या अंगावर प्युअर कॉटनचे कपडे असतील. सोबत या गोष्टीची सुद्धा काळजी घ्या की शेक कधीच थेट त्वचेवर देत नाही तुमच्या त्वचेवर कॉटन कपड्याचा एक थर असावा.



जर तुम्ही तासनतास एकाच ठिकाणी बसून काम करत असाल तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. कामातून तुम्ही दर तासाने एक ब्रेक घ्या आणि ५-१० मिनिटे फेरी मारा. तुमच्या शरीराची हालचाल ठराविक काही काळाने व्हायला हवी. असे केल्यास कंबरेवर दाब पडत नाही आणि कंबरेला आराम मिळत राहतो. तुम्ही घरी असाल की ऑफिसला ही गोष्ट करायला अजिबात विसरू नका. ही गोष्ट तुम्ही करत नसाल तर कंबरदुखीचा त्रास तुम्हाला विळखा नक्कीच घालणार. त्यापासुन स्वत:चा बचाव करायचा असेल तर आवर्जून कामातून ब्रेक घेत राहा.






स्त्रियांच्या शरीरात वयाची ३० वर्षे ओलांडल्यानंतर आणि पुरुषांच्या शरीरात वयाची ४५ वर्षे ओलांडल्यानंतर कॅल्शियमची कमतरता भासू लागते. म्हणून गरजेचे आहे की तुम्ही तुमच्या शरीरात शक्य तितका कॅल्शियमचा वापर करावा. कॅल्शियम तुमची कंबरदुखी दूर ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, पण हेच कॅल्शियम जर कमी झाले तर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास सुद्धा सहन करावा लागेल. म्हणून शक्य तितका कॅल्शियम युक्त आहार घ्यावा. ते शक्य नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम सप्लीमेंट्स घ्यावीत. तर असे काही उपाय करून तुम्ही सहज आपल्या कंबरदुखीवर नियंत्रण मिळवू शकता. 

*************************************
हे मी स्वतः ही करते . माझं काम एका जागेवर बसून असल्यामुळे मला ही कंबरेला त्रास होतो  मला आधी काही वाटत नव्हते काम करताना जसं वयाच्या चाळिशी नंतर मला आता कंबरदुखीचा  खुप त्रास होतो आहे तर मी हे तेल बनवून ठेवते आणि स्वतः च माझ्या हातानेच मालीश करते आणि नंतर गरम पाणी करून त्यात मीठ टाकून शेक घेते किंवा आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून घेते. त्याने मला भरपूर प्रमाणात आराम मिळतो बरं वाटतं  माझं ही कॅल्शियम कमी आहे  माझं हिमोग्लोबिन कमी झाले आहे त्यामुळे मला बसुन काम करण्याचा त्रास होतो
म्हणून मी हे रोज करते.


    

उत्तर लिहिले · 12/8/2022
कर्म · 48425
0
एका मोठ्या चमच्यामध्ये नारळाचे तेल घ्या. यात लसूणाच्या सोललेल्या ५ ते ६ पाकळ्या टाकून भाजून घ्या. जेव्हा तेल थंड होईल तेव्हा या तेलाने कंबरेसोबत पूर्ण शरीराची मालिश करून घ्यावी आणि मग अंघोळ करावी. लसून हे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते.
उत्तर लिहिले · 16/8/2022
कर्म · 20
0
कंबर शिकणे 
उत्तर लिहिले · 8/10/2022
कर्म · 0

Related Questions

मासे खाताना घशात काटा अडकल्यास उपाय कोणता करावा?
मुळव्याधावर कोणते उपाय करावेत?
डॉट्स उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरतात?
Vitamin D घेण्यासाठी तीन ऋतुंमध्ये वेगवेगळी योग्य वेळ असेल तर ती वेळ कोणती?
Fibromigelia हा त्रास पूर्णपणे बरा होतो का?
गुडघेदुखी थांबण्यासाठी कोणत्या गोळ्या मिळतात?
क्षयरोग रोग म्हणजे काय?