आरोग्य व उपाय आरोग्य

मूळव्याधावर कोणते उपाय करावेत?

2 उत्तरे
2 answers

मूळव्याधावर कोणते उपाय करावेत?

1
 मुळव्यादावर उपाय 
हल्लीच्या फास्ट आणि व्यस्त जीवनशैली तसेच आहाराच्या चुकीच्या सवयी यांमुळे मूळव्याधीची समस्या वाढताना दिसत आहे. मात्र या आजारावर फारसे मोकळेपणाने बोलले जात नाही. वेळेवर उपचार केल्यास मूळव्याध बरा होऊ शकतो.


हे आहेत मूळव्याधीवर घरगुती उपचार


जिरे - मूळव्याधीवर उत्तम म्हणजे जिरे. भाजलेल्या जिऱ्याची पूड एक ग्लास पाण्यात टाकून हे पाणी प्यायल्यास मूळव्याधीच्या त्रासापासून आराम मिळतो.


गुलाब - मूळव्याधीचा त्रास असल्यास त्यावर गुलाब गुणकारी आहे. १०-१२ गावठी गुलाबाच्या पाकळ्या ५० मिली पाण्यात टाकून ठेवाव्या. सकाळी रिकाम्यापोटी हे पाणी प्यायल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो. 


दूर्वा - पुजेमध्ये विशेष स्थान असलेल्या दूर्वाही मूळव्याधीचा त्रास कमी करण्यास उपयुक्त ठरतात. २ चमचे दुर्वा कुटून त्या कपभर गायीच्या दुधात उकळून हे मिश्रण गाळून घेतल्यास फायदा होतो.


डाळिंब - मूळव्याधीवर उपचार म्हणून डाळिंबाच्या सालींचाही वापर होतो. डाळिंबाच्या सुकवलेल्या साली अर्धातास पाण्यात भिजत ठेवा. त्या पाण्यात एक चमचा जिरे, पाऊण कप ताक आणि मीठ घाला. हे मिश्रण प्यायल्यास मूळव्याधीचा त्रास दूर होतो. 


(डाळिंबाची साल महिला साठी हि उपयुक्त आहे.
महिलांना मासिक पाळीत किंवा कधी ही रक्तस्रावाच त्रास होतो तेव्हा डाळिंबाची साल एक चमचा किसून एक कप पाण्यात उकळून अर्धा कप करून पाणी प्यावे म्हणजे रक्तस्राव थांबतो.)

मुळा - मुळ्याच्या रसात मीठ घालून प्यायल्यास मूळव्याधीचा त्रास बरा होतो. 

सुरण -सुरण तुपावर परतून किंवा जेवणात सुरण जसं तुम्हाला पाहिजे तसं खाऊ शकता पण तिखट कमी खावे.


उत्तर लिहिले · 10/12/2022
कर्म · 51830
0
मूळव्याधावर आराम मिळवण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
  • सफाई: गुद्द्वार (anus) आणि आसपासचा भाग सौम्य, सुगंध नसलेल्या साबणाने आणि पाण्याने नियमितपणे धुवा.
  • बर्फ लावा: दिवसातून काही वेळा 10-15 मिनिटे बर्फ लावल्याने सूज आणि वेदना कमी होऊ शकतात.
  • सिट्झ बाथ: दिवसातून 2-3 वेळा 10-15 मिनिटे कोमट पाण्यात बसा. यामुळे आराम मिळतो.
  • ओव्हर-द-काउंटर क्रीम (Over-the-counter creams): मूळव्याधासाठी असलेल्या क्रीम आणि सपोसिटरीज (suppositories) वापरा. यामुळे खाज आणि वेदना कमी होतात.
  • जास्त फायबर (Fiber) असलेले अन्न खा: फळे, भाज्या आणि धान्य आहारात घ्या. यामुळे शौचाला त्रास होत नाही.
  • पुरेसे पाणी प्या: दररोज 8-10 ग्लास पाणी प्या. यामुळे शौच soft होते.
  • शौचाला जास्त वेळ बसू नका: जास्त वेळ बसल्याने रक्तवाहिन्यांवर दाब येतो.
  • वजन कमी करा: जास्त वजन असल्यास मूळव्याधाचा धोका वाढतो.
जर आराम नाही मिळाला, तर डॉक्टरांना भेटा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या.
टीप: हा सल्ला केवळ माहितीसाठी आहे. वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 220

Related Questions

सर्दीमुळे डोळ्यांवरती आणि भुवया दुखत असतील तर काय करावे?
गण्डयोग निवारण करण्यासाठी काय उपाय करावा?
वजन कमी करण्यासाठी कोणते उपाय करता येतील?
मासे खाताना घशात काटा अडकल्यास कोणता उपाय करावा?
डॉट्स उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरतात?
माझे वय 16 आहे. मला काही जास्त काम केले की डोक्याला मुंग्या येतात, चालताना तोल जातो, काही काम करायचं मन होत नाही आणि तोंडाची चव कडू झाली आहे, यावर काय करावे?
व्हिटॅमिन डी घेण्यासाठी तीन ऋतूमध्ये वेगवेगळी योग्य वेळ असेल, तर ती वेळ कोणती?