घरगुती उपाय आरोग्य

मला हाताला गजकरणाचे चट्टे उटले आहेत, तर यावर कोणता घरगुती उपाय आहे का?

2 उत्तरे
2 answers

मला हाताला गजकरणाचे चट्टे उटले आहेत, तर यावर कोणता घरगुती उपाय आहे का?

2
हाताला गजकर्णाचे चट्टे उठले आहेत तर यावर उपाय टि ट्रि ऑईल वापरा खाली दिलेली माहिती वाचा.

गजकर्ण झाल्याने असाल हैराण तर 'या' घरगुती उपायाचा करा वापर!



बदलत्या वातावरणात अनेकदा रिंगवर्म म्हणजेच गजकर्ण होण्याची समस्या होते. असं जास्त त्या लोकांमध्ये बघायला मिळतं, ज्यांची त्वचा अधिक संवेदनशील असते काही लोकांना हिवाळ्यात अशाप्रकारची समस्या जास्त होते आणि अनेक लोकांमध्ये त्वचेसंबंधी समस्या होण्याला वुलन कपड्यांची अ‍ॅलर्जी हे असू शकतं. जर तुम्हाला नेहमी वातावरण बदलल्यावर अशी समस्या होत असेल तर यावर तुम्ही सहजपणे उपाय करू शकता.


गजकर्णपासून सुटका मिळवण्यासाठी सर्वात चांगला घरगुती उपाय हा टी ट्री ऑइल आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, हे तेल त्वचेसाठी इतकं फायदेशीर आहे की, आता मोठ्या प्रमाणात स्किन केअर प्रॉडक्ट्समध्ये टी ट्री ऑइलचा उपयोग वाढला आहे. टी ट्री ऑइलने केवळ त्वचेचं सौंदर्यच वाढेल असं नाही तर याने गजकर्ण सारख्या त्वचेच्या समस्याही दूर होण्यास मदत होईल.





कसा कराल वापर?

जर तुम्हाला गजकर्णाची समस्या असेल तर कॉटनच्या मदतीने त्यावर टी ट्री ऑइल लावा. असं दोन ते तीन वेळा करा. सुरुवातीला हलकी जळजळ होऊ शकते. पण नंतर काही वेळाने जळजळ शांत होईल आणि खाजही कमी होईल. अशाप्रकारे ४ ते ५ दिवस टी ट्री ऑइलचा वापर कराल तर काही लवकरच तुमची त्वचेसंबंधी समस्या दूर होईल.


संवेदनशील त्वचेवर

जर तुमची त्वचा फार जास्त संवेदनशील असले तर तुमच्यासाठी गरजेचं आहे की, तुम्ही टी ट्री ऑइलचा थेट त्वचेवर वापर करू नका. त्याआधी टी ट्री ऑइलमध्ये समान प्रमाणात खोबऱ्याचं तेल मिश्रित करा. याने साइड इफेक्ट होणार नाही. तसेच संवेदनशील त्वचेवर याने ड्रायनेस आणि इतरही समस्या होणार नाहीत. 

(टिप : वरील लेखातील टिप्स या केवळ माहिती म्हणून देण्यात आल्या आहेत. हे उपाय करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते. अशात तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच या गोष्टी फॉलो कराव्यात.)








उत्तर लिहिले · 20/9/2022
कर्म · 48465
0
नक्की वाचा.....
गजकरणावर कायमचा उपाय..संजीवनी क्रिम. नक्की वापरून बघा. गजकरण पूर्ण बरे होईल आणि पुन्हा उद्भवणार सुद्धा नाही.
उत्तर लिहिले · 25/3/2024
कर्म · 40

Related Questions

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री?
जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?
आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छता बाबत थोडक्यात माहिती लिहा?
आरोग्य हे एक देणगी?
💉जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो?
खोकल्यामुळे छातीत का दुखते?
सकाळी पाणी केव्हा प्यावे?