अन्न
0
Answer link
किल्ल्यावर किती दिवस पुरेल अन्न?
प्रश्न:
एका किल्ल्यावर 12000 सैनिकांना 60 दिवस पुरेसे अन्न आहे.
30 दिवसांनंतर 300 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे येतात.
अशा परिस्थितीत, किल्ल्यावरील सर्व सैनिकांना किती दिवस पुरेल अन्न?
उकल:
12000 सैनिकांना 60 दिवस पुरेल अन्न असल्यास, 1 सैनिकाला 1 दिवसासाठी लागणारे अन्न = 12000 / (60 * 1) = 200 ग्राम (मानून घेऊया).
30 दिवसांनंतर किल्ल्यावर येणाऱ्या 300 सैनिकांना 1 दिवसासाठी लागणारे अन्न = 300 * 200 = 60000 ग्राम.
30 दिवसांनंतर किल्ल्यावर एकूण सैनिकांची संख्या = 12000 + 300 = 12300.
12300 सैनिकांना 1 दिवसासाठी लागणारे अन्न = 12300 * 200 = 2460000 ग्राम.
60 दिवसांसाठी 12300 सैनिकांना लागणारे अन्न = 2460000 * 60 = 147600000 ग्राम.
30 दिवसांनंतर किल्ल्यावर उपलब्ध असलेले अन्न = 12000 * 60 * 200 = 14400000 ग्राम (60 दिवसांचे अन्न - 30 दिवसांपर्यंत वापरलेले अन्न).
147600000 ग्राम अन्नासाठी पुरेसे दिवस = 147600000 / 2460000 = 60 दिवस.
निष्कर्ष:
30 दिवसांनंतर किल्ल्यावर 300 सैनिक जास्तीचे आल्यास, किल्ल्यावरील सर्व सैनिकांना 60 दिवस पुरेल अन्न आहे.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
2
Answer link
गुजरात गोल्ड आटा पण चांगला आहे पाणी पुरी
बनविण्यासाठी
गव्हाच्या पिठाचा वापर गोलगप्पा बनवण्यासाठी केला जातो. पण गोलगप्पा कुरकुरीत आणि फुगीर होण्यासाठी त्यात थोडासा रवा टाकावा. त्यामुळे गोलगप्पा कुरकुरीत होतात.
पिठाचा गोलगप्पा बनवण्यासाठी एक कप मैद्यामध्ये ३ चमचे रवा घाला. आता त्यात दोन चमचे तेल घालून चांगले मिक्स करा. पीठ चांगले मळून घ्या (लक्षात ठेवा की पीठ जास्त घट्ट किंवा मऊ नाही)
मळलेले पीठ 30 मिनिटे ओल्या कपड्यात गुंडाळून ठेवा. यानंतर हाताला तेल लावून पीठ चांगले मळून घ्या जेणेकरून ते गुळगुळीत होईल.
आता पिठाचे छोटे-छोटे गोळे करून हाताने २-३ मिनिटे दाबून ठेवा. या प्रक्रियेमुळे क्रिस्पी गोल गप्पा बनवण्यास मदत होईल.
आता रोलिंग पिनच्या मदतीने गोल गप्पाचा आकार अंडाकृती किंवा गोल करा.
एक तवा घ्या, त्यात तेल टाका, तेल गरम झाल्यावर त्यात गोल गप्पा घाला. गॅस मध्यम आचेवर ठेवा. सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. त्यांना उलटा करा आणि आणखी 10 सेकंद तळा.
तयार केलेले गोल गप्पा जाळीच्या टोपलीत काढा, पुरीतून जास्तीचे तेल निघून टोपलीच्या तळाशी येईल. तुम्ही त्याखाली प्लेट ठेवा.
गोलगप्पा थंड झाल्यावर, उकडलेले बटाटे, वाटाणे आणि चवदार आंबट गोड पाणी घालून सर्व्ह करा आणि बाजारातील सर्वोत्तम गोलगप्पाचा आनंद घ्या.
0
Answer link
सात्त्विक भोजनात पदार्थ : ताजी फळे, भाज्या,धान्य, सलाड इ., मूग, नाचणी, भाज्यांची सूप्स, ज्यूस, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा,गूळ,मध , सात्त्विक मसाले( तुलसी,वेलची, दालचिनी, धणे, बडीशेप, आले आणि हळद वगैरे..)
आवळा, अंकुरलेले संपूर्ण धान्य, डाळी आणि शेंगा, मध, तूप, भाजीपाला, ताज्या फळांचे रस, लिंबू पाणी, काजू आणि बिया, हर्बल टी, आले, हळद, काळे मिरे, गूळ, अपरिष्कृत साखर, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, पालक, गाजर, भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी कोणतीही वनस्पती, बटाटे, ब्रोकोली, लेट्यूस, मटार, फुलकोबी(फ्लॉवर) ही सात्विक ...
0
Answer link
अन्नाचा आदर कसा करावा हे सांगतात या ‘तीन’ कथा! -
अन्न हे पूर्णब्रह्म असतं. शरीररुपी यंत्राची हालचाल, त्याचे कामकाज आणि नियंत्रण योग्य प्रकारे सतत चालू ठेवण्यासाठी अन्न हे इंधनासारखे काम करते. इतकं अन्नाचं महत्व असताना मात्र आपण राजरोसपणे अन्नाची नासाडी करण्यात अग्रेसर असतो. याच अन्नाचे महत्त्व पटवून देणाऱ्या तीन कथा आजच्या लेखात पाहू.
१. अन्नदानाचे महत्त्व -
एका गावात एक निर्धन मनुष्य राहत होता. परिस्थितीने गरीब असला तरी आपल्या घासातील घास इतरांना देण्यास तो कधी मागेपुढे पहात नसे. एकदा एका शेठजीकडे तो जेवायला गेला. तेव्हा शेठजीने त्याला पंचपक्कवानांचे ताट वाढून दिले. ते ताट पाहून त्याने विचार केला यातून अजून तीन जणांचे पोट सहज भरेल. म्हणून तो ते अन्न घेऊन घरी जाऊ लागला. वाटेत त्याला भिकारी दिसला त्याला त्याने त्यातील थोडे अन्न दिले. नंतर घरी पोहचल्यावर एक भिक्षुक त्याच्या दारावर आला. त्यालाही त्याने अन्न दिले. त्यानंतर एक अपंग व्यक्ती त्याच्या दाराशी आला आणि त्याने अन्न मागितले. त्यालाही त्याने उरलेले सगळे अन्न देऊन टाकले. याच्याजवळ स्वतःसाठी काहीच खायला उरले नाही. तरीदेखील त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज ओसंडून वाहत होते. कारण त्याच्यामुळे या तीन जणांची भूक भागली होती. अचानक त्या दारापाशी आलेल्या अपंग व्यक्तीच्या भोवती तेजोमय प्रकाश आला आणि त्यातून देव प्रकटले आणि त्यांनी त्या गरीब अन्नदात्याला, तुला इथून पुढे काहीच कमी पडणार नाही असा आशिर्वाद दिला आणि देव अंतर्धान पावले.
तात्पर्य : देण्यातच खरे सुख लपलेले आहे. कुणाचाही घास हिरावून घेण्यापेक्षा कुणाला तरी एखादा घास देता कसा येईल याचा विचार करणे यातच खरे सुख लपलेले आहे.
२. अन्नाचा आदर -
एकदा राजा विक्रमादित्य त्यांचा सेनापती व मंत्री यांना घेऊन रथात बसून भ्रमंतीला निघाले. भ्रमंतीला निघाल्यावर आजूबाजूला रस्त्यावर त्यांना धान्य विखरुन पडलेले दिसले. राजांनी आपल्या सारथ्याला रथ थांबवायला सांगितले व म्हणाले, “अरे इथे जमीन तर हिऱ्यांनी भरून गेली आहे. मला हिरे गोळा करू द्या.” राजाच्या अशा बोलण्याने मंत्री गोंधळले. ते म्हणाले, "महाराज आपला काही भ्रम झाला आहे. जमिनीवर हिरे नाहीत तर धान्याचे दाणे विखरुन पडले आहेत." राजा विक्रमादित्य रथावरुन खाली उतरले आणि जमिनीवरचे दाणे वेचून त्यांना आपल्या कपाळाला स्पर्श करू लागले आणि म्हणाले, खरा हिरा तर अन्नाचे कणच असतात. या अन्नामुळेच आपले पोट भरते आणि आपण जिवंत राहतो. तेव्हा मंत्र्यांना अन्नाचे महत्व समजले व त्यांनी सगळे अन्न गोळा केले.
तात्पर्य : अन्नाला अन्नदेवता म्हटले जाते म्हणून अन्नाचा सदैव सन्मान केला पाहिजे. जगात हिऱ्यापेक्षा अधिक मौल्यवान काही असेल तर ते केवळ अन्नच आहे. कारण अन्न असेल तरच आपण ऐश्वर्य आणि समृद्धीचा आस्वाद घेऊ शकू. त्यामुळे अन्नाच्या प्रत्येक कणाचा आदर करणे हेच आपले कर्तव्य आहे.
३. अन्नाला नावे ठेवू नका.
एकदा श्यामच्या आईने रताळ्याच्या पानांची भाजी केली होती. श्याम, त्याचे वडील, भाऊ असे सगळे जेवायला बसले होते. श्यामच्या आईने सगळ्यांना केलेली भाजी वाढली. श्यामला ती भाजी प्रचंड आवडायची. पण त्या दिवशी तो भाजी आवडीने खाताना दिसलाच नाही. म्हणून आईने श्यामला विचारले, "का रे श्याम, आज तू भाजी खात नाहीयेस? आवडली नाही का तुला? एरवी तर निम्मी भाजी तूच फस्त करतोस." त्यावर श्याम म्हणाला, “असे काही नाही." आणि सगळे मान खाली घालून जेवू लागले. सगळ्यांची जेवणं झाल्यावर आईसुद्धा जेवायला बसली. तिने भाजीचा घास घेतला तर तो तिला अळणी लागला. ती श्यामला म्हणाली, "अरे श्याम भाजीत मीठच नाही मुळी. तुम्ही सुद्धा कोणीच काही न बोलता मुकाट्याने जेवलात." त्यावर श्याम म्हणाला, "कधीतरी चुकून स्वयंपाकात कमी जास्त होणारच. त्यात एवढे सांगण्यासारखे आणि भाजीला नावे ठेवण्यासारखे देखील काहीच नव्हते. म्हणून आम्ही कोणीच काही बोललो नाहीत."
तात्पर्य : आपण नेहमीच जेवण जेवताना हे नाही, ते नाही अशा तक्रारी करत जेवतो. नावडीचे जेवण असेल तर जेवत सुद्धा नाही. हा अन्नाचा अपमान असतो. त्यामुळे नेहमी जे ताटात असेल, जसे असेल तसे पूर्णब्रह्म मानून खायला हवे.
आजकाल कित्येक जण अन्नावाचून आपले प्राण गमवताना दिसतात. तर अशा लोकांच्या पंक्तीत आपण नाही याचे देवाकडे आभार मानायला हवेत. पण यावरच थांबून उपयोगाचे नाही. तर या तिन्ही कथांच्या माध्यमातून अन्नाचे महत्व समजून घ्यायला हवे आणि अन्नाची नासाडी देखील थांबवायला हवी.
0
Answer link
भाकरी,पोळी, भात, या अन्नामध्ये कोणते घटक
आपल्या आहारात पोळी / चपाती हा एक प्रमुख पदार्थ आहे. कित्येकांचे दिवसातील एक जेवण हे फक्त चपाती - भाजी असते. तर काहींच्या दोन्ही वेळच्या आहारात चपातीचा समावेश असतो. मात्र तुम्ही वजन घटवण्याच्या मिशन असाल तर तुमच्या आहारातील पोळी शरीराला किती कॅलेरीज पुरवते हे ठाऊक असणे आवश्यक आहे.
सर्वसामान्यपणे , आहारातील पोळी ही कणकेची (गव्हाची) असते. परंतू इतरही काही पोषक घटकांपासून रोटी किंवा भाकरी केली जाते. मग पहा त्यात किती आहेत कॅलरीज
1 गव्हाची चपाती – 57 कॅलरिज
घाम न आल्यास व्यायामाचा फायदा होत नाही का ?
वजन कमी करण्यासाठी रोज आहारात फायबर्स किती प्रमाणात असावे ?
रोज एकसारखे अन्नपदार्थ खाल्याने वजन कमी होण्यास फायदा होतो का ?
1 बाजरीची भाकरी– 97 कॅलरिज
1 नाचणीची भाकरी– 88 कॅलरिज
1 मक्क्याची रोटी – 153 कॅलरिज
1 थालिपीठ – 100कॅलरिज
1 तंदुरी रोटी – 116 कॅलरिज
1 फुलका – 57 कॅलरिज
1 रुमाली रोटी – 78 कॅलरिज
1 ज्वारीची भाकरी– 30 कॅलरिज
या विविध पोळ्यांमधील कॅलरिज पाहून त्यांची निवड करू नका. कारण कॅलरिजच्या सोबतीने त्यातील पोषकता देखील तितकीच आवश्यक आहे. इतर पोळ्यांच्या तुलनेत गव्हाच्या चपातीमध्ये कमीत कमी कॅलरिज असतात. परंतू नाचणीच्या भाकरीत अधिक पोषकता असल्याने त्यात कॅलरिजदेखील अधिक असतात. म्हणून विविध प्रकारच्या पोळ्या आहारात ठेवा. सामान्यपणे एका वेळेस एक व्यक्ती 2-3 पोळ्यांचा आहारात समावेश करते. मात्र वजन घटवणार्यांनी त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावे कारण पोळ्यांचा आहारात अधिक समावेश करून कॅलरीज वाढवण्यापेक्षा एखादी पोळी कमी करून त्याऐवजी फळं किंवा भाजीचा आहारात समावेश करावा.
१/३ भातात ८० कॅलरीज् असतात. केवळ १ ग्रॅम प्रोटीन, ०.८ ग्रॅम फॅट आणि १८ ग्रॅम कार्ब्स असतात
भातात फॉस्फोरस आणि मॅग्नेशिअमचं प्रमाण चपातीपेक्षा थोडं कमी असत. फॉस्फोरस तांबड्या पेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. मॅग्नेशिअम रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवतं.
एक तृतीयांश वाटी भातामध्ये जवळपास 80 कॅलरीज असतात. भातामध्ये 18 ग्रॅम कार्ब्स, 1 ग्रॅम प्रोटिन, 0.1 ग्रॅम फॅट असतं.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही