अन्न

अन्नाचा आदर कसा करावा?

1 उत्तर
1 answers

अन्नाचा आदर कसा करावा?

0


अन्नाचा आदर कसा करावा हे सांगतात या ‘तीन’ कथा! - 


अन्न हे पूर्णब्रह्म असतं. शरीररुपी यंत्राची हालचाल, त्याचे कामकाज आणि नियंत्रण योग्य प्रकारे सतत चालू ठेवण्यासाठी अन्न हे इंधनासारखे काम करते. इतकं अन्नाचं महत्व असताना मात्र आपण राजरोसपणे अन्नाची नासाडी करण्यात अग्रेसर असतो. याच अन्नाचे महत्त्व पटवून देणाऱ्या तीन कथा आजच्या लेखात पाहू.




१. अन्नदानाचे महत्त्व -
एका गावात एक निर्धन मनुष्य राहत होता. परिस्थितीने गरीब असला तरी आपल्‍या घासातील घास इतरांना देण्यास तो कधी मागेपुढे पहात नसे. एकदा एका शेठजीकडे तो जेवायला गेला. तेव्हा शेठजीने त्याला पंचपक्कवानांचे ताट वाढून दिले. ते ताट पाहून त्याने विचार केला यातून अजून तीन जणांचे पोट सहज भरेल. म्हणून तो ते अन्न घेऊन घरी जाऊ लागला. वाटेत त्याला भिकारी दिसला त्याला त्याने त्यातील थोडे अन्न दिले. नंतर घरी पोहचल्यावर एक भिक्षुक त्याच्या दारावर आला. त्यालाही त्याने अन्न दिले. त्यानंतर एक अपंग व्यक्ती त्याच्या दाराशी आला आणि त्याने अन्न मागितले. त्यालाही त्याने उरलेले सगळे अन्न देऊन टाकले. याच्याजवळ स्वतःसाठी काहीच खायला उरले नाही. तरीदेखील त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज ओसंडून वाहत होते. कारण त्याच्यामुळे या तीन जणांची भूक भागली होती. अचानक त्या दारापाशी आलेल्या अपंग व्यक्तीच्या भोवती तेजोमय प्रकाश आला आणि त्यातून देव प्रकटले आणि त्यांनी त्या गरीब अन्नदात्याला, तुला इथून पुढे काहीच कमी पडणार नाही असा आशिर्वाद दिला आणि देव अंतर्धान पावले.
तात्पर्य : देण्यातच खरे सुख लपलेले आहे. कुणाचाही घास हिरावून घेण्यापेक्षा कुणाला तरी एखादा घास देता कसा येईल याचा विचार करणे यातच खरे सुख लपलेले आहे.
२. अन्नाचा आदर -
एकदा राजा विक्रमादित्य त्यांचा सेनापती व मंत्री यांना घेऊन रथात बसून भ्रमंतीला निघाले. भ्रमंतीला निघाल्यावर आजूबाजूला रस्त्यावर त्यांना धान्य विखरुन पडलेले दिसले. राजांनी आपल्या सारथ्याला रथ थांबवायला सांगितले व म्हणाले, “अरे इथे जमीन तर हिऱ्यांनी भरून गेली आहे. मला हिरे गोळा करू द्या.” राजाच्या अशा बोलण्याने मंत्री गोंधळले. ते म्हणाले, "महाराज आपला काही भ्रम झाला आहे. जमिनीवर हिरे नाहीत तर धान्याचे दाणे विखरुन पडले आहेत." राजा विक्रमादित्य रथावरुन खाली उतरले आणि जमिनीवरचे दाणे वेचून त्यांना आपल्या कपाळाला स्पर्श करू लागले आणि म्हणाले, खरा हिरा तर अन्नाचे कणच असतात. या अन्नामुळेच आपले पोट भरते आणि आपण जिवंत राहतो. तेव्हा मंत्र्यांना अन्नाचे महत्व समजले व त्यांनी सगळे अन्न गोळा केले.
तात्पर्य : अन्नाला अन्नदेवता म्हटले जाते म्हणून अन्नाचा सदैव सन्मान केला पाहिजे. जगात हिऱ्यापेक्षा अधिक मौल्यवान काही असेल तर ते केवळ अन्नच आहे. कारण अन्न असेल तरच आपण ऐश्वर्य आणि समृद्धीचा आस्वाद घेऊ शकू. त्यामुळे अन्नाच्या प्रत्येक कणाचा आदर करणे हेच आपले कर्तव्य आहे.
३. अन्नाला नावे ठेवू नका.
एकदा श्यामच्या आईने रताळ्याच्या पानांची भाजी केली होती. श्याम, त्याचे वडील, भाऊ असे सगळे जेवायला बसले होते. श्यामच्या आईने सगळ्यांना केलेली भाजी वाढली. श्यामला ती भाजी प्रचंड आवडायची. पण त्या दिवशी तो भाजी आवडीने खाताना दिसलाच नाही. म्हणून आईने श्यामला विचारले, "का रे श्याम, आज तू भाजी खात नाहीयेस? आवडली नाही का तुला? एरवी तर निम्मी भाजी तूच फस्त करतोस." त्यावर श्याम म्हणाला, “असे काही नाही." आणि सगळे मान खाली घालून जेवू लागले. सगळ्यांची जेवणं झाल्यावर आईसुद्धा जेवायला बसली. तिने भाजीचा घास घेतला तर तो तिला अळणी लागला. ती श्यामला म्हणाली, "अरे श्याम भाजीत मीठच नाही मुळी. तुम्ही सुद्धा कोणीच काही न बोलता मुकाट्याने जेवलात." त्यावर श्याम म्हणाला, "कधीतरी चुकून स्वयंपाकात कमी जास्त होणारच. त्यात एवढे सांगण्यासारखे आणि भाजीला नावे ठेवण्यासारखे देखील काहीच नव्हते. म्हणून आम्ही कोणीच काही बोललो नाहीत."
तात्पर्य : आपण नेहमीच जेवण जेवताना हे नाही, ते नाही अशा तक्रारी करत जेवतो. नावडीचे जेवण असेल तर जेवत सुद्धा नाही. हा अन्नाचा अपमान असतो. त्यामुळे नेहमी जे ताटात असेल, जसे असेल तसे पूर्णब्रह्म मानून खायला हवे.
आजकाल कित्येक जण अन्नावाचून आपले प्राण गमवताना दिसतात. तर अशा लोकांच्या पंक्तीत आपण नाही याचे देवाकडे आभार मानायला हवेत. पण यावरच थांबून उपयोगाचे नाही. तर या तिन्ही कथांच्या माध्यमातून अन्नाचे महत्व समजून घ्यायला हवे आणि अन्नाची नासाडी देखील थांबवायला हवी. 
उत्तर लिहिले · 23/12/2022
कर्म · 48555

Related Questions

एका किल्यावर 12000 सैनिकाना 60 दिवस पुरते जर 30 दिवसाने 300 सैनिक किल्यावर जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरेल?
गुजरात गोल्ड आटा पाणी पुरी बनविण्यासाठी चालेल का?
सात्विक भोजनात कोणते पदार्थ असतात?
भाकरी, पोळी, भात ह्याच्यामध्ये कोणते घटक असतात?
मिसळपावचा मसाला कसा‌ बनवता येईल?
वेलदोडे म्हणजे काय?
मी मेस लावली आहे, पण मला पोळी थोडीफार कडू लागते, आणि जेवायला मन नाही करत, ती पोळी कडू लागल्यावर मी जेवण करत नाही, आपण जेव्हा पोळी चावतो तेव्हा ती कडू लागते? मेस वाले त्यात काय टाकत असेल?