अन्न

मिसळपावचा मसाला कसा‌ बनवता येईल?

1 उत्तर
1 answers

मिसळपावचा मसाला कसा‌ बनवता येईल?

0
 





मिसळपाव मसाला 





 





  असा करा मिसळ मसाला होईल स्वादिष्ट आणि चटकदार

रुचकर आणि झणझणीत मिसळ मसाला वापर इतर कोणत्याही भाजीसाठी


 घरच्या घरी करा तर्रीदार मिसळ पावचा बेत



साहित्य : 
15-16 लवंगी मिरची
2 बेडगी मिरची
3 कश्मीरी मिरची
1 कप धणे
2 टीस्पून जिरे
1 टीस्पून सफेद तीळ
1 टीस्पून बडीशोप
1/2 टीस्पून खसखस
1 टीस्पून सुंठ पावडर
1 चक्रफुल
1 दालचिनी एक इंच
12 काळी मिरी
12 लवंग
1 हिरवी वेलची
1 काली वेलची
2 कांदे
1 टीस्पून मीठ
1/2 इंच आलं
7-8 लसूण पाकळ्या

कृती 

मंद आचेवर कढई गरम करा त्यात 15-16 लवंगी मिरची, 2 बेडगी मिरची, 3 कश्मीरी मिरची, 1 कप धणे, 2 टीस्पून जिरे, 1 टीस्पून सफेद तीळ, 1 टीस्पून बडीशोप, 1/2 टीस्पून खसखस, 1 टीस्पून सुंठ पावडर, 1 चक्रफुल, 1 दालचिनी एक इंच, 12 काळी मिरी, 12 लवंग, 1 हिरवी वेलची, 1 काली वेलची हे सगळे कोरडे साहित्य एकत्र करून भाजून घ्या. त्याचा रंग बदलू नये. मसाले बाजूला काढून थंड करून घ्या. मिक्सरला बारीक करून घ्या. त्यात अर्धी वाटी सुकं खोबरं, 2 कांदे उभे चिरून घातलेले. पॅन मध्ये वेगळे गरम केलेले आलं लसूण देखील त्यात टाका आणि वाटून घ्या. मसाला डब्यात काढून ठेवा.



उत्तर लिहिले · 15/12/2022
कर्म · 48465

Related Questions

एका किल्यावर 12000 सैनिकाना 60 दिवस पुरते जर 30 दिवसाने 300 सैनिक किल्यावर जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरेल?
गुजरात गोल्ड आटा पाणी पुरी बनविण्यासाठी चालेल का?
सात्विक भोजनात कोणते पदार्थ असतात?
अन्नाचा आदर कसा करावा?
भाकरी, पोळी, भात ह्याच्यामध्ये कोणते घटक असतात?
वेलदोडे म्हणजे काय?
मी मेस लावली आहे, पण मला पोळी थोडीफार कडू लागते, आणि जेवायला मन नाही करत, ती पोळी कडू लागल्यावर मी जेवण करत नाही, आपण जेव्हा पोळी चावतो तेव्हा ती कडू लागते? मेस वाले त्यात काय टाकत असेल?