Topic icon

आयुर्वेद

1
आयुर्वेद
संशोधन त्याची आवश्यकता व महत्त्व 

आयुर्वेद हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशाप्रकारे होतो. आयुर्वेदाची सुरवात ब्रह्मापासून झाली असे मानले जाते. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.


आद्य वैद्य श्री धन्वंतरी

कर्नाटकातील सोमनाथपुर येथील धन्वंतरीची प्रतिमा
आयुर्वेदातील सिद्धान्त आणि औषधे आधुनिक विज्ञानाच्या clinical trials या पद्धतीनुसार तपासलेली नसतात. त्यामुळे आयुर्वेदाची विश्वसनीयता वाढवण्यासाठी या प्रत्यक्ष वैद्यकीय चाचण्यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे असे काही लोकांचे मत आहे.[१] आयुर्वेदिक औषधांचा विशेषतः मुलांना उपयोग होतो. आर्युवेदानुसार एका वर्षाची वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर अशा सहा ऋतुंमध्य विभागणी केलेली आहे. त्या त्या ऋतुंमधील होणा-या वातावरणातील वदलांप्रमाणे आपला आहारविहार कसा असावा याचे फार उत्तम वर्णन आयुर्वेदामध्ये केलेले आहे. यालाच ऋतुचर्या असे म्हणतात. [२]

इतिहास 
आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या इसवी सनपूर्व सुमारे १२०० मध्ये रचल्या गेलेल्या वेदामधून घेतले आहेत. अथर्ववेदात आयुर्वेद शास्त्राचे अधिक वर्णन आहे. म्हणून आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद मानतात आणि त्यामुळे आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. तथापि, विशेषतः गौतम बुद्धाच्या आणि त्यानंतरच्या काळात, आयुर्वेदामध्ये अनेक मोलाच्या गोष्टींची भर घालण्यात आली. समुद्रमंथनातून निघालेले भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदातील परंपरेनुसार आद्य वैद्य मानले जातात. आयुर्वेद हे प्राचीनतम शास्त्र असूनही आजच्या युगातही या शास्त्राच्या सिद्धान्तांवर आधारित चिकित्सा उपयुक्त व यशस्वी ठरते.

परंपरा आणि ग्रंथसंपदा 
आयुर्वेदात मूलतः दैवी आणि मानुषी अशा दोन तत्त्वपरंपरा[श १] आहेत. मानुषी परंपरेत चरक संहिता, सुश्रुत संहिता, काश्यप संहिता ह्या तीन संहितांमध्ये तीन वेगवेगळ्या परंपरा वर्णन केलेल्या आहेत. त्यापैकी महर्षि चरक आणि महर्षि सुश्रुत यांनी प्रत्येकी एका परंपरेची स्थापना केली आणि त्यानंतर अनेक वर्षे त्यांच्या शिष्यगणांनी हे ज्ञान आत्मसात करून वाढविले. चरक संहिता आणि सुश्रुत संहिता हे दोन ग्रंथ याच परंपरांचा सारांश आहे आणि म्हणून हे ग्रंथ कोणी एका लेखकाने लिहिलेले नाहीत. तिसरी परंपरा कश्यपांची आहे.

आयुर्वेदातील या विविध परंपरांनी सुमारे बाराशे वर्षांचा काळ व्यापलेला आहे. गौतम बुद्धाच्या काळापासून (सुमारे इसवी सनपूर्व ५५६) ते सम्राट हर्षवर्धनाच्या काळापर्यंत (सुमारे इ.स. ६००) या परंपरांचे कार्य चालत होते. पण तीन शाखांचे औपचारिक सिद्धान्त आणि युक्त्या मूळ बौद्ध साहित्यात दिसून येतात. चरक आणि सुश्रुत संहितांचे बऱ्याच लोकांनी संपादन केले आहे. अनेक शतकांनंतर त्यांच्यामध्ये अगणित आवर्तने झाली आहेत. आयुर्वेदामध्ये शल्यचिकित्सेचीही जी परंपरा आहे तिची सुरुवात सुश्रुताने केली असे मानतात.

इसवी सनाच्या सातव्या शतकात सिंध प्रांतात राहणाऱ्या वाग्भट यांनी सुरुवातीच्या आयुर्वेदिक साहित्यांचे एकत्रीकरण केले. त्याला अष्टांग हृदय असे म्हणतात. चरक, सुश्रुत आणि वाग्भट यांचे काम आयुर्वेदाचा मूळ आधार समजले जाते म्हणून या तिघांना आदराने बृहद त्रयी या नावांनी ओळखले जाते. त्यानंतर आठव्या शतकात वैद्य माधव ऋषि यांनी निदान ग्रंथ हा ग्रंथ लिहिला जो थोड्याच काळात प्रमाण बनला. यातील ७९ प्रकरणांमध्ये विविध विकार, त्यांची लक्षणे, कारणे आणि क्लिष्टता याबद्दल चर्चा केली आहे. यानंतर भावप्रकाश व योगरत्नाकर हेही ग्रंथ निर्माण झाले. नवीन भर पडल्याने हे तीन ग्रंथ आजही प्रमाण मानले जातात. यांना लघु त्रयी म्हणून ओळखले जाते. विविध औषध निर्मितीच्या प्रक्रिया विषद करणारा शारंगधर हाही एक प्रमुख वैद्य. बृहद् त्रयी, लघु त्रयी व शारंगधर या तिन्हीत आयुर्वेद सामावला आहे.[३]

आयुर्वेदात मुख्यतः वनस्पती व त्यांचे वेगवेगळे भाग, कंदमुळे यांच्यापासून तयार झालेली औषधे वापरतात. पहिल्या सहस्रकानंतर रासायनिक औषधेही थोड्या प्रमाणात वापरली जाऊ लागली. इ.स.च्या आठव्या शतकात उग्रादित्य आणि इ.स.च्या चौदाव्या शतकात सरनगध्र यांनी बऱ्याच रासायनिक औषधांचा अभ्यास केला. विंचू, साप, कोळी इ. प्राण्यांच्या विषांचाही प्राणिज औषध म्हणून वापर केला जातो. विषौषधाचा अभ्यास करणारी अगदतंत्र ही आयुर्वेदाची एक शाखा आहे.

आयुर्वेदांच्या प्राचीन ग्रंथांत केवळ आहाराचाच विचार केला नाही तर विविध ऋतूंमध्ये, कालानुरूप, हवापाण्यात बदल होत असताना आपण कसे राहावे, कसे राहू नये, याचा साधकबाधक विचार केलेला आहे. तर या ग्रंथ आणि पोथ्यांमध्ये अगदी सर्वसामान्य विकारांपासून दुर्मीळ विकारांवर मात्रा आहेत. आयुर्वेदाच्या दुर्मीळ पोथ्यांचे संग्रहण अनेकांनी केले आहे, नाशिकचे द‌िनेश वैद्य हे त्यांपैकी एक आहेत.

मार्गदर्शक आणि मूळ तत्त्वे 
पंचमहाभूते 
प्राचीन सांख्यदर्शन या दर्शनशास्त्रावर आयुर्वेद आधारलेला आहे. त्यात सर्व भौतिक जग हे पाच मूळ तत्त्वांपासून तयार झाले आहे असे मानले जाते. यातील प्रत्येक मूळ तत्त्वाचे स्वतःचे काही गुण आहेत. ही मूळ तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत -

आकाश
वायू
अग्नी
आप (पाणी)
पृथ्वी
गुण 
गुण विरुद्ध गुण
गुरू (जड) लघु (हलका)
मंद (हळूहळू) तीक्ष्ण (तीव्र)
हिम, शीत (थंड) उष्ण (गरम)
स्निग्ध (तेलकट, ओशट) रूक्ष (कोरडा)
श्लक्ष्ण (गुळगुळीत) खर (खरखरीत)
सांद्र (घन, दाट) द्रव (पातळ)
मृदू (मऊ, कोमल) कठीण (बळकट, दृढ)
स्थिर (टिकाऊ) चल, सर (गतिमान)
सूक्ष्म (अतिशय बारीक) स्थूल (मोठा)
विशद (स्वच्छ) पिच्छील (बुळबुळीत)
आयुर्वेदाचा लेखक सुश्रुत ह्याने अन्नाचे सहा प्रकार सांगितले आहेत:

भक्ष्यं भोज्यं च पेयं च लेह्मं चोष्यं च पिच्छिलम्।
इति भेदाः षडन्नस्य मधुराद्याश्च षड्रसाः॥

दोष 
सर्व शारीरिक प्रक्रिया तीन दोषांच्या संतुलनातून नियंत्रित केल्या जातात, असे आयुर्वेद मानते.

वात दोष 
वात हा शरीर आणि मनाची हालचाल नियंत्रित करतो. जास्त वातामुळे काळजी, निद्रानाश, बद्धकोष्ठता, इत्यादी त्रास होतात. वात रक्त पुरवठा, श्वासोच्छ्‌वास, मनातील विचार इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. वातामुळे मज्जासंस्था, श्रवण, वाणी कार्यान्वित होतात. वातामुळे उत्साह आणि सर्जनक्षमता वाढतात. वाताचा पित्त आणि कफ यांच्यावरही परिणाम होतो. बऱ्याचवेळा वातदोष हे रोगाचे पहिले कारण असते. वाताला वायू असेही म्हणतात.

कफ दोष 
कफ आपतत्त्वापासून बनतो असे मानले जाते. कफामुळे शरीरातील मूलद्रव्यांना मूर्त स्वरूप मिळते, प्रतिकारशक्ती वाढते. कफ सांध्यामधील स्नेहक(lubricant), जखम भरणे, ताकद, संतुलन, स्मरणशक्ती, हृदय व फुप्फुसे यांना नियंत्रित करतो. कफामुळे आपुलकी, प्रेम, शांतता हाव, मत्सर हे गुण मिळतात. अतिकफामुळे स्थूलता, सुस्ती आणि प्रत्यूर्जता ((ॲलर्जी) allergy) इत्यादी त्रास होतात.

पित्त दोष 
पित्ताची निर्मिती आप आणि अग्नि या तत्त्वांपासून होते असे मानले जाते. पित्त शरीरातील उष्णता, चयापचय, मन आणि शरीर यांचे रूपांतरण, अन्नपचन, संवेदना, सदसदविवेकबुद्धी इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवते. अति पित्तामुळे राग, आलोचना, व्रण, पुरळ, इत्यादी त्रास होतात. संतुलित पित्ताने नेतृत्व गुण विकसित होतात.

निदानपद्धती 
अष्टविध निदान पद्धती 
नाडी
मूत्र
मल
जिंव्हा
शब्द
स्पर्श
दृक्
आकृती
या आठ गोष्टी बघून आयुर्वेदात निदान केले जाते. त्यास अष्टविध निदान पद्धती असे म्हणतात.

उपचारपद्धती 
आयुर्वेदिक उपचार पद्धती प्रामुख्याने शमन आणि शोधन अशी वर्गीकृत केली जाते. वाढलेले दोष स्वस्थानी नियंत्रित करण्याच्या प्रक्रियेस शमन असे म्हणतात. तर वाढलेले दोष स्वस्थानातून खेचून बाहेर काढून शरीराबाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेस शोधन असे म्हणतात. पंचकर्मे ही शोधन प्रक्रियेचा भाग मानली जातात. म्हणूनच पंचाकर्मांना 'शोधन कर्मे' असेदेखील म्हटले जाते.

पंचकर्मे 
पंचकर्मे ही शोधन कर्मे आहेत. ती संख्येने पाच आहेत म्हणून त्यास पंचकर्मे असे म्हटले जाते.

वमन
विरेचन
बस्ती
नस्य
रक्तमोक्षण
ही पाच कर्मे पंचकर्मे म्हणून ओळखली जातात.

ही एक आयुर्वेद उपचार पद्धती आहे.
याचे विश्लेxण पुढील प्रमाणे :-

१ - वमन 
शरीरातील वाढलेले दोष मुखावाटे बाहेर काढण्याच्या प्रक्रियेस वमन असे म्हणतात. वमन ही कफ दोषासाठी प्रधान चिकित्सा मानली जाते.

२ - विरेचन 
शरीरातील वाढलेले दोष अधोमार्गाने बाहेर काढण्याच्या प्रक्रियेस विरेचन असे म्हणतात. विरेचन ही पित्त दोषासाठी प्रधान चिकित्सा मानली जाते.

३ - बस्ती 
शरीरातील दोषांचे निर्हरण करण्यासाठी गुदद्वारामार्गे औषधी देण्याच्या प्रक्रियेस बस्ती असे म्हटले जाते. बस्ती ही वात दोषाची प्रमुख चिकित्सा मानले जाते.

४ - नस्य 
मानेच्या वरील प्रदेशातील दोषांचे निर्हरण करण्यासाठी नाकाद्वारे औषध देण्याच्या प्रक्रियेस नस्य असे म्हणतात.

५ - रक्तमोक्षण 
अशुद्ध रक्त शरीरातून बाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेस रक्तमोक्षण असे म्हणतात

औषधपद्धती 
आसव 
औषधे दीर्घकाळपर्यंत टिकून राहावीत यासाठी आसव-अरिष्टे तयार केली जातात. ही रोगांनुसार विविध प्रकारच्या वनस्पतींपासून बनवितात. आसव अरिष्ट करण्यासाठी प्रथम एक मातीचे स्वच्छ मडके घेऊन त्यात आवश्यक त्या औषधी वनस्पती, पाणी व इतर सहाय्यक वनस्पतींचा रस या गोष्टी भरल्या जातात. त्यामध्ये आवश्यक प्रमाणात गूळ, साखर, मध व अन्य सुगंधी पदार्थ टाकतात. त्यानंतर त्यात धायटीची फुले किंवा यीस्ट मिसळून झाकण लावून त्याला पंधरा ते पंचवीस दिवस समशीतोष्ण (साधारण तापमानाला) खोलीमध्ये स्थिर ठेवतात. यानंतर त्यामध्ये संधान (मद्यनिर्मितीची) प्रक्रिया सुरू होते. संधान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याला गाळून जो द्रवपदार्थ प्राप्त होतो त्याला ‘आसव’ असे म्हणतात.

आसव हे शरीर व भूक वाढविणारे, निद्रानाश, वेदना व तोंडाचा बेचवपणा दूर करणारे व मनाला प्रसन्न करणारे असे असते; तर अरिष्ट हे शरीर कृश किंवा रोड होणे, मूळव्याध, पचनाचे जुने विकार इत्यादी प्रकारच्या रोगांमध्ये लाभदायक असून अन्नाची चव वाढविणारे, कफापासून उत्पन्न होणारे रोग कमी करणारे असते. वाळा, अफू, कोरफड, चंदन इत्यादी औषधांपासून आसव; तर अशोक, गुळवेल, अश्वगंधा, द्राक्ष इत्यादींपासून अरिष्ट बनविले जाते. आसव-अरिष्टे जितकी जुनी तितकी अधिक गुणकारी असतात.

अरिष्ट 
आसव अरिष्ट करण्यासाठी प्रथम एक मातीचे स्वच्छ मडके घेऊन त्यात आवश्यक त्या औषधी वनस्पती, पाणी व इतर सहाय्यक वनस्पतींचा रस या गोष्टी भरल्या जातात. त्यामध्ये आवश्यक प्रमाणात गूळ, साखर, मध व अन्य सुगंधी पदार्थ टाकतात. त्यानंतर त्यात धायटीची फुले किंवा यीस्ट मिसळून झाकण लावून त्याला पंधरा ते पंचवीस दिवस समशीतोष्ण (साधारण तापमानाला) खोलीमध्ये स्थिर ठेवतात. यानंतर त्यामध्ये संधान (मद्यनिर्मितीची) प्रक्रिया सुरू होते. संधान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याला गाळून जो द्रवपदार्थ प्राप्त होतो त्याला ‘आसव’ असे म्हणतात. औषधी वनस्पतींचे भरड चूर्ण करून त्यापासून काढा बनवून त्यानंतर वरीलप्रमाणे संधान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला गाळून जो मद्ययुक्त द्रव पदार्थ तयार होतो, त्यास अरिष्ट असे म्हणतात. आसव बनविताना अग्नीची प्रक्रिया केली जात नाही, तर अरिष्ट बनविताना अग्नीची प्रक्रिया केली जाते.


आसव हे शरीर व भूक वाढविणारे, निद्रानाश, वेदना व तोंडाचा बेचवपणा दूर करणारे व मनाला प्रसन्न करणारे असे असते; तर अरिष्ट हे शरीर कृश किंवा रोड होणे, मूळव्याध, पचनाचे जुने विकार इत्यादी प्रकारच्या रोगांमध्ये लाभदायक असून अन्नाची चव वाढविणारे, कफापासून उत्पन्न होणारे रोग कमी करणारे असते. वाळा, अफू, कोरफड, चंदन इत्यादी औषधांपासून आसव; तर अशोक, गुळवेल, अश्वगंधा, द्राक्ष इत्यादींपासून अरिष्ट बनविले जाते. आसव-अरिष्टे जितकी जुनी तितकी अधिक गुणकारी असतात.

काढा 
ज्या पदार्थांचा काढा करावयाचा असेल ते घटकपदार्थ घेतात व त्यावर पदार्थांच्या वजनाच्या १६ पट पाणी घालून ते पाणी एक अष्टमांश(१/८) राहीपर्यंत मंदाग्नीवर उकळवताtत, हे पाणी गाळून घेतल्यावर बनलेल्या द्रवपदार्थाला त्या घटकपदार्थातील मुख्य घटकाचा काढा म्हणतात..

घन 
यात औषधाची पूड करून मग त्यात पातळ पदार्थ जसे पाणी, तूप इत्यादी मिसळून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवतात. यालाच घनवटी/वटी (गोळ्या ) असे म्हणतात.

चूर्ण 
चूर्ण :- म्हणजे त्या वनस्पतीला / तिच्या सालीला/फळाला वाळवून नंतर त्याला कुटून बारीक करणे. (चूर्ण करणे)
हे चूर्ण पाणी, तूप, मध किंवा गुळासोबत औषध म्हणून घेतात.

चाटण/लेह 
पुष्कळ औषधी उगाळून किंवा कुटून चाटण्यासाठी जे गोड रसायन बनवितात ते; लेह; चाटण्याचे औषध

प्राश 
प्राशन करण्यासाठी बनविलेले गोड व घन आयुर्वेदिक रसायन. च्यवनऋषींने बनवले ते च्यवनप्राश. असेच कवचप्राश, कफप्राश, केशरी बदाम प्राश, त्रिफळाप्राश, त्रिफला पंचकोल प्राश, बदामप्राश, शिलाजितप्राश, सुवर्णप्राश, वगैरे

तैल 
अमृत 
मुलांची सर्वांगीण वाढ व्हावी, यासाथीचे गोड सरबत. उदा० बालामृत : यात मुलेठी, अतीस, काकडाश्रृंगी, नागर मोथा, अनंतमूल ,विडंग, हरड़ ,ओवा, चूर्णोदक, साखर, गंधक, सल्फर, तुवरक तेल, कापूृर इत्यादि घटक द्रव्ये असतात. असेच अमृत तुलसी, अमृतारिष्ट, वगैरे.

तैल 
तैल :- यात काही वनस्पती मोहरी, एरंड, तीळ आदि तेलात मिसळून त्याला उकळून मग त्याचा वापर मालिश करणे, हळुवार चोळणे याकरिता करतात.

आयुर्वेदातील काही प्रसिद्ध तेले 
महाभृंगराज तेल
नारायण तेल
चंदनबला लाशादि तेल
हरमेदादि तेल
काशीसादि तेल
जात्यादि तेल
गुडुच्यादि तेल
महालाक्षादि तेल
पंचगुण तेल
षडबिंदु तेल
महाविषगर्भ तेल
महामरीचादि तेल
तुवरक (चालमोगरा/तुबरक) तेल
घृत संपादन करा
घृत :- म्हणजे तूप होय.
यात गाईच्या तुपात अथवा अन्य तुपात इतर औषधी मिसळतात. हे मिश्रण उकळून एकजीव केल्यावर त्याचा वापर करतात.

शिवाय 
१. भोज्य – डाळ भात इत्यादी २. भक्ष्य – पोळी भाजी, भाकरी इत्यादी ३. चर्व्य – चिवडा, फुटाणे इत्यादी (चावणे ही क्रिया अधिक) ४. लेह्य – चटणी, छुंदा (उन्हात वाळवलेला मोरंबा) इत्यादी चाटायचे पदार्थ ५. चोष्य – आंबा, ऊस यासारखे चोखून खायचे पदार्थ ६. पेय -सरबत, चहा-काॅफी-कोको, पन्हे, ताक यासारखे प्यायचे पदार्थ

संशोधन 
आयुर्वेदामध्ये संशोधनाची गरज असून जगात अनेक ठिकाणी यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत.[४]आयुर्वेदात संशोधन करण्याचे अनेक मार्ग आहेत. क्लिनिकल ट्रायल हा त्यापैकी एक महत्त्वाचा मार्ग आहे.आयुर्वेदिक सिद्धान्त तपासून पहाणे हेही एक प्रकारचे संशोधनच आहे.


उत्तर लिहिले · 4/1/2022
कर्म · 121725
2
आपण त्याचा रस देखील पिऊ शकता. जरी आपल्यास मधुमेह आजार नसेल, तरीही त्याचे सेवन आपल्याला भविष्यात या धोक्यापासून वाचवेल. कडूलिंबाची पाने संधिवात, सांधेदुखीच्या समस्या दूर ठेवते. संधिवात आणि सांधेदुखीपासून आराम मिळविण्यासाठी आपण कडुलिंबाच्या तेलाने मालिश देखील करू शकता किंवा त्याच्या पानांचा लेप देखील लावू शकता.९ फेब्रु, २०२१कडुलिंबाची असते; परंतु आयुर्वेदात चव कडू असते; कडुलिंबाच्या झाडाची साल, देठ, लाकूड आणि सिंक अनेक आजारांचा उपचार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. अँटीबॅक्टेरिया आणि अँटीफंगल गुणधर्म असलेले कडुलिंब मुरुम, केस गळणे, खाज सुटणे, एक्जिमा यासारख्या समस्यांसाठी खूप प्रभावी आहेत. जर दररोज रिकाम्या पोटी ५-६ कडुलिंबाच्या पानाचे सेवन केले तर एकही आजार तुम्हाला होणार नाही. जाणून घेऊ कडुनिंबाच्या पानाचे फायदे..

कडुलिंबाची पाने
कडुलिंबाची पाने खाण्याचे फायदे...



१) रोग प्रतिकारशक्ती वाढते रोगप्रतिकारशक्ती राखणे फार महत्वाचे आहे. महागडे औषध, सप्लीमेंट्स याऐवजी रिकाम्या पोटी आपण कडुलिंबाची पाने खाल्ली तर केवळ रोगप्रतिकारक शक्तीच मजबूत होत नाही तर त्याला चांगला प्रतिसादही मिळतो. तसेच हे शरीरास विषाणू, बॅक्टेरिया, फंगस विरुद्ध लढण्यास मदत करेल.
कडुलिंबाचा प्रभाव थंड असतो म्हणून उन्हाळ्यात त्याचे सेवन खूप फायदेशीर आहे. आपण हिवाळ्यामध्ये देखील त्याचा उपयोग करू शकतो; पण थोड्या प्रमाणात वापरू शकता.

x

अधिक जानका२) अँटीबॅक्टेरियाच्या समृद्ध

अँटीबॅक्टेरियल,

कडूलिंबाच्या पानांमध्ये अँटीफंगल, एंटीइंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराला बऱ्याच रोगांपासून संरक्षण मिळते.

३) रक्त स्वच्छ होते

कडुलिंबामध्ये रक्तातील शुद्धीकरण करणारे गुणधर्म आहेत जे रक्तातील सर्व अशुद्धता काढून टाकण्यात मदत करते. तसेच, सकाळी कडुलिंबाची पाने चघळण्यामुळे रक्त जाड होण्याची समस्या उद्भवत नाही. नियमित सेवन केल्यास तुमचे शरीर टॉक्सिन फ्री राहते.४) कर्करोग प्रतिबंध

त्यात अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यापूर्वीच नष्ट करतात. संशोधनानुसार, कडुलिंबाचे बियाणे, पाने, फुले व अर्क गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण करतात.

ग्रीवेच्या आणि प्रोस्टेट कॅन्सर५) मधुमेहाचा धोका कमी होतो

आपण मधुमेहाचे रुग्ण असल्यास आपण रोज कडूलिंबाची पाने चावावी. यामुळे रक्तातील साखर पातळी नियंत्रित राहते. आपण त्याचा रस देखील पिऊ शकता. जरी आपल्यास मधुमेह आजार नसेल, तरीही त्याचे सेवन आपल्याला भविष्यात या धोक्यापासून वाचवेल.६) संधिवातसाठी योग्य उपचार

कडूलिंबाची पाने संधिवात, सांधेदुखीच्या समस्या दूर ठेवते. संधिवात आणि सांधेदुखीपासून आराम मिळविण्यासाठी आपण कडुलिंबाच्या तेलाने मालिश देखील करू शकता किंवा त्याच्या पानांचा लेप देखील लावू शकता.

७) पोटातील जंतू दूर होतात रिकाम्या पोटी कडुलिंब खाल्याने किंवा चहा प्यायल्याने पोटातील जंतू नष्ट होतात. आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कडुलिंबाच्या गोळ्या देखील घेऊ शकता.८) त्वचा उजळते

कडुलिंबाची पाने चघळण्यामुळे रक्त साफ होते आणि त्यामुळे त्वचेमध्ये असलेले टॉक्सिंस देखील बाहेर पडतात. यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि मुरुम, एक्जिमा, त्वचेची इन्फेक्शन समस्या देखील दूर होते. आपण कडुलिंबाचे फेस पॅक देखील बनवू शकता.
उत्तर लिहिले · 4/12/2021
कर्म · 121725
2

 :आजार बरा करण्यासाठी वनस्पती वापरणे हे इतर औषध घेण्यापेक्षा सुरक्षित आहे. परंतु जर त्यांचा उपयोग बर्‍याच काळासाठी केला गेला तर ते शरीरास हानी पोहोचवू शकतात.

हर्बल, नॅचरल औषधं खरंच सुरक्षित असतात? साईड इफेक्ट टाळण्यासाठी जाणून 'या' ३ गोष्टी
आपण आधीपासूनच कोणत्याही रोगासाठी औषधे घेत असाल तर त्याचा वापर टाळा.
तुम्हीसुद्धा आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी हर्बल, औषधं किवा जडी बुटींचे (Herbal Medicine or Herbs) सेवन करता का? जर तुम्ही अशी उत्पादन वापरत असाल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा. हर्बल वनस्पती म्हणून औषधी वनस्पती वापरल्या जातात. म्हणूनच लोक रोग बरा करण्यासाठी बर्‍याचदा त्यांचा वापर करतात. बर्‍याच लोकांना असे वाटते की आजार बरा करण्यासाठी वनस्पती वापरणे हे इतर औषध घेण्यापेक्षा सुरक्षित आहे. परंतु जर त्यांचा उपयोग बर्‍याच काळासाठी केला गेला तर ते शरीरास हानी पोहोचवू शकतात.


हर्ब्स, जडीबुटी ही औषधं असतात का? 

खरं पाहता जडीबुटी या औषधांमध्ये येत नाही. हर्ब्स, आयुर्वेदिक वनस्पतींचे फायदे माहित असल्यानंयाचे सेवन सुरू केले जाते. पण या औषधांच्या सेवनाआधी नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. कारण त्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यासही गंभीर हानी होऊ शकते. सामान्य औषधांप्रमाणेच त्यांचे जास्त सेवन करणे देखील हानिकारक असू शकते. म्हणूनच आपण औषधी वनस्पती वापरताना देखील सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हर्बल उपचार हा एक आहार पूरक प्रकार आहे, त्यांचा औषधांमध्ये समावेश नाही. 

हर्ब्सचे साईड इफेक्टस

औषधी वनस्पती नैसर्गिक असू शकतात, परंतु याचा अर्थ असा नाही की ते शरीराला कोणत्याही प्रकारचे नुकसान करणार नाहीत. जास्त प्रमाणात आणि चुकीच्या पद्धतीने औषधी वनस्पतींचे सेवन केल्याने शरीरास हानी पोहोचू शकते. म्हणूनच, इतर औषधांप्रमाणेच, औषधी वनस्पती देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाल्ल्या पाहिजेत. नैसर्गिक गोष्टींच्या दीर्घकाळापर्यंत सेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. अशा अनेक औषधी वनस्पती आहेत, जास्त प्रमाणात सेवन केल्याने फायद्याऐवजी शरीराचे नुकसान होते. 


कावा (KAVA)

कावा एक औषधी वनस्पती आहे. याचा उपयोग चिंता, निद्रानाश, रजोनिवृत्तीची लक्षणे आणि इतर आजार बरे करण्यासाठी केला जातो. तणाव आणि चिंता मध्ये याचा उपयोग करणे फायदेशीर मानले जाते. बर्‍याच लोक त्यांचा त्रास दूर करण्यासाठीही याचा वापर करत आहेत. परंतु त्याचा दीर्घकाळ वापर केल्याने यकृताचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच, जर आपण हे औषधी वनस्पती वापरत असाल तर ताबडतोब थांबा आणि त्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अश्वगंधा

आजकाल रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लोक निर्धास्तपणे अश्वगंधाचे सेवन करीत आहेत. याचा उपयोग शारीरिक दुर्बलता दूर करण्यासाठी केला जातो. यासह, सर्दी, खोकल्यासाठी त्याचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. परंतु याचे जास्त सेवन केल्यास जुलाब होऊ शकतात. यासह, अधिक प्रमाणात डोस घेतल्याने उलट्या आणि मळमळ यासारखे दुष्परिणाम देखील होऊ शकतात.

त्रिफळा

पोटात गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते तेव्हा बहुतेक वेळा लोक त्रिफळा घेणे सुरू करतात. बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी बरेच लोक दररोज हे घेतात. आपण बराच काळ याचा वापर करत राहिल्यास आपल्या बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते. परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरास इतर आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात. त्रिफळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अतिसार होऊ शकतो. तसंच हे रक्तदाब रुग्णांना हानी पोहोचवू शकते. बराच काळ घेतल्यास रक्तदाबात चढ उतार होऊ शकतात. इतकंच नाही यामुळे निद्रानाश देखील होऊ शकते.


या लोकांनी जडीबुटीचा उपयोग करू नये

मुलांना औषधी वनस्पती म्हणजेच हर्बल अतिरिक्त आहार देणे टाळा.

आपण आधीपासूनच कोणत्याही रोगासाठी औषधे घेत असाल तर त्याचा वापर टाळा.

आपण शस्त्रक्रिया करणार असाल किंवा केली असेल तरीही त्यांचा वापर करु नका.

आपण गर्भवती असल्यास डॉक्टरांच्या सल्लाशिवाय कोणत्याही जडीबुटींचे सेवन करू नका. 




उत्तर लिहिले · 19/11/2021
कर्म · 121725
2

जगभरात जवळपास तीस करोड रुग्णांना असणारा दमा हा सर्वात जास्त प्रचलित असा असंसर्गजन्य रोग आहे. हा रोग आता लहान मुलांत ही आढळू लागला आहे. आयुर्वेदात दमाच्या मूळ कारणावर लक्ष देत तो बरा करण्याची सर्वांगीण उपचार पद्धती उपलब्ध आहे.

आयुर्वेदानुसार जीवन शैलीत विशिष्ट बदल करीत आयुर्वेदिक उपचार केल्यास दमा आटोक्यात आणला जाऊ शकतो. पण याच्या उपायांचा ऊहापोह करण्यापूर्वी आपण दम्याच्या आजारात फुफ्फुसांची अशी स्थिती कां होते हे जाणून घेऊ या.

दम्याची लक्षणे | 
दम्याची काही लक्षणे खालील प्रमाणे आहे

वारंवार येणारा खोकला
अस्वस्थता वाटणे
श्वास घेताना त्रास होणे
श्वास घेताना आवाज येणे
दम लगाने
छातीमध्ये वाटणारी पकड
बारगड्यांमध्ये दुखणे
भोजनात अरुची  
पायी चालताना दम लागणे
आवाजामध्ये खरखराहट
श्वास सोडताना ज्यास्त कष्ट होणे 
दम्याची कारणे | 
आयुर्वेदानुसार वात आणि कफ दोषात समतोल बिघडल्याने दमा बळावतो. या दोषांना वाढविणारे अन्नपदार्थ आणि कार्यपध्दतीमुळे दमा शरीरात वाढू लागतो, काही दम्याची कारणे खाली दिलेली आहेत जसे :

धूळ, धूर आणि वाहती हवा यांच्या संपर्कात आल्यास
थंड जागी राहिल्यामुळे किंवा थंड पाणी पिल्याने
वात किंवा कफाचा समतोल बिघडविणारे थंडगार वारे, पेय किंवा अन्नामुळे
अभिसरणाच्या मार्गात अडथळा आणणाऱ्या घटकांचे सेवन केल्यास किंवा संपर्कात आल्यास
चयापचयातील अवशेष
कोरडेपणा
श्वसन प्रणालीची कमजोरी
अति उपवास आणि निष्कासन उपचारांचा अवलंब
पोटातील वायूची वरच्या दिशेने वाटचाल
मांस आणि मासे यांचे सेवन
दही किंवा न उकळलेल्या दुधाचे अति सेवन
दम्यासाठी आहार | 
येथे दम्यासाठी आहारात काही विशिष्ट बदल आणि योग्य त्या आयुर्वेदिक उपचारांची शिफारस केली आहे.

दम्यावर घरगुती उपाय : दमेकरी काय काय खाऊ शकतात?

जुनाट तांदूळ / भात
लाल तांदूळ
कुळीथ
गहू, बार्ली
बकरीचे दूध
मध
भोपळे, पडवळ
लिंबू वर्गीय फळे
चवळी, राजगिरा
मनुका, विलायची
चपाती मध्ये सम प्रमाणात गहू आणि जव टाकून त्यात थोडा ओवा घालावा. भाताचे पाणी बाहेर काढून त्यात ४ से ५ लवंग टाकून शिजवावे. याचा उपयोग सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत करावा. बाहेर थंडी असल्यास भात खाऊ नये.

आहारात हे टाळा | 
मेंढीचे दूध
मेंढीच्या दूधापासून तयार केलेले तूप
दूषित पाणी
मांस, मासे
कंद
मोहरी
सुके, तळलेले आणि मसालेदार अन्नपदार्थ
पचायला जड अन्न
दही आणि न उकळलेल्या दूधाचे अति सेवन
आईस्क्रीम आणि थंड पदार्थ
वरील गोष्टी आहारात टाळाव्यात. अस्थम्याच्या रोग्याने भरपेट भोजन करू नये. रात्री ७.३० नंतर खाऊ नये. रात्रि भोजनानंतर २ तासात झोपून घ्यावे. सकाळी ध्यान प्राणायाम करावे.

दम्यावरील आयुर्वेदिक उपचार | 
धूपणाच्या क्रियेने जी उष्णता शरीरात तयार होते, त्याने शरीरातील कफ पातळ होतो. पाठीवर आणि छातीवर तिळाच्या तेलाचे उष्ण धूपण केल्यास दम्याची लक्षणे कमी होतात.

विशेष आयुर्वेदिक उपचारांमुळे श्वसन प्रणालीच्या सूक्ष्म नाड्यातील कफ मोकळा होण्यास मदत होते. यामुळे नाड्या नरम होतात आणि वात दोषाचे सहज चलन शक्य होते.

तसेच इतर उपचारांचा पर्याय उपलब्ध आहे. आहे त्या स्थितीत आराम मिळण्यासाठी आणि श्वसन प्रणालीत चालना मिळण्यासाठी डॉक्टर काही औषधे घेण्याचा सल्ला देतात.

सजगतेने नीट काळजी घेतल्यास दमा आटोक्यात आणणे शक्य आहे. प्रभावी परिणामांसाठी प्रमाणित आयुर्वेदिक डॉक्टरकडून व्यक्तिगत नाडी परीक्षा करवून घेणे योग्य ठरते.

दम्यासाठी काही श्री श्री आयुर्वेदिक औषधांची नावे खाली दिली आहेत. कृपया या औषधांचे सेवन प्रशिक्षित आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.

तुळशी - ५ ते ६ पाने खावीत नाहीतर तुलसी टेबलेट घ्यावी. (तुळशी च्या पानामध्ये पारा असल्याने दातांना त्रास होऊ शकतो म्हणून गोळ्या घ्याव्यात)
कुष्मांड रसायन
लवंगादि वटी - (कफ बाहेर काढण्यास मदत)
चवनप्राश


दम्यासाठी घरेलु उपचार | 
प्रतिदिन - १५ ग्राम मोहरीचे तेल आणि १५ ग्राम देशी गूळ - मिसळून या मिश्रणाचे दिवसातून दोन वेळा सेवन करावे. गरम पानी प्यावे.  
छोटा पीपल १/२ ग्राम, सौंठ १/२ ग्राम, १ चमचा आल्याचा रस और १ चमचा मध - या चारींचे मिश्रण करून दिवसातून २ वेळा चाटण्याने आराम मिळतो.  
रात्री श्वास घेताना जास्त त्रास होत असेल तर - गरम पानी घेऊन, दोन्ही पाय गुढघ्यापर्यंत १० से १५ मिनट बुडवून ठेवावे. हे केल्याने श्वास कष्ट दूर होतात. डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. 




उत्तर लिहिले · 30/10/2021
कर्म · 121725
1
बेलाची पाने औषधी असून खोकल्यावर व नेत्रविकारावर उपयुक्त आहेत. फुलांपासून अत्तर बनवितात. कच्चे फळ पाचक व भूक वाढविणारे असल्याने अतिसारावर ते गुणकारी असते. कच्च्या फळाच्या सालीपासून काढलेला रंग कापड रंगविण्यासाठी वापरतात.
 
 


बेल किंवा बेल वृक्षाला फार महत्व आहे. प्रत्येक शुभकार्याच्या प्रसंगी पूजनात बेल पत्रांचा उपयोग केला जातो. वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊनच ही परंपरा सुरू करण्यात आली आहे. बेलपत्र शिवलिंगावर वाहतांना बोटांच्या आणि तळहाताच्या पृष्टभागावर, विषाणूंना मारक तत्व आणि सुगंध पसरला जातो. वेळोवेळी अंगाला स्पर्श करण्यामुळे शरीरावर आक्रमण करणारे विषाणू मरण पावतात. शेकडो रोगांना नष्ट करण्याची क्षमता असणाऱ्या ह्या दिव्य वृक्षाची प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून, त्याला पुजेतही स्थान देऊन त्याचे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून केला गेला.

बेल हा पानझडी वृक्ष रूटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ईगल मार्मेलॉस आहे. लिंबू व संत्रे या वनस्पतीही रूटेसी कुलातील आहेत. बेल हा वृक्ष मूळचा उत्तर भारतातील असून नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान, बांगला देश, कंबोडिया, थायलंड इत्यादी देशांत निसर्गत: आढळतो. भारत, श्रीलंका, जावा, फिलिपीन्स व फिजी या देशांत बेलाची लागवड करतात. ईगल प्रजातीत बेलाची ईगल मार्मेलॉस ही एकमेव जाती आहे. भारतात तो रुक्ष ठिकाणी, जेथे अन्य वृक्ष वाढत नाहीत अशा जागी, कमी पावसाच्या प्रदेशात वाढलेला दिसतो.

बेल (ईगल मार्मेलॉस) : (१) पाने, (२) फूल, (३) फळ (शेजारी छेद घेतलेले फळ) बेल वृक्ष ८–१४ मी. उंच वाढत असून त्यावर काटे असतात. खोडाचा घेर १–१·५ मी. असून राखाडी रंगाचा असतो. साल मऊ असून तिचे खवले निघतात. पाने संयुक्त, हिरवी, त्रिपर्णी व एकाआड एक असून पानांच्या बगलेत सरळ व मोठे काटे असतात. पानांवर तेलाचे ठिपके दिसतात. मार्च–एप्रिल महिन्यांत पाने गळून पडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी पुन्हा पालवी येते. फुले लहान, हिरवट-पांढरी व सुगंधी असून ती गुच्छात येतात. मृदुफळ जाड सालीचे, गोलसर, पिवळे व कठीण असून पावसाळ्यात येते. फळ पिकायला साधारणपणे ११ महिने लागतात. त्यात घट्ट, गोड, सुवासिक, नारिंगी व श्लेष्मल गर असतो. गरामध्ये लोकरीसारखी लव असलेल्या चपट्या बिया असतात. फळाचे कवच एवढे कठीण असते.

बेलाचे औषधी गुणधर्म 

बेलाची पाने औषधी असून खोकल्यावर व नेत्रविकारावर उपयुक्त आहेत. फुलांपासून अत्तर बनवितात. कच्चे फळ पाचक व भूक वाढविणारे असल्याने अतिसारावर ते गुणकारी असते. कच्च्या फळाच्या सालीपासून काढलेला रंग कापड रंगविण्यासाठी वापरतात. बेलाच्या पिकलेल्या फळातील गर सुगंधी, शीतल व सारक असतो. त्यात मार्मेलोसीन हा घटक असून तो सारक व मूत्रल आहे. फळांपासून सरबत करतात. मलावरोध व बद्धकोष्ठता यावर हे सरबत उपयोगी आहे. बेलाच्या झाडाचा डिंक उपयुक्त असतो. फळे कठीण आणि जाड असल्यामुळे झाडाला लागलेली फळे अंगावर पडून एखाद्याला इजा होण्याचा धोका असतो.

 


फळीतील मगज सुगंधी, शीतकर (थंडावा देणारा) व सारफ असतो; त्याचे सरबत जुनाट मलावरोध व अग्निमांद्य यावर देतात. अपक्व फह स्तंभक (आकुंचन पावणारे), पाचक, दीपक, (भूक वाढविणारे) असल्याने अतिसार व आमांशात गुणकारी असते. बेलफळाचा मुरंबा त्यादृष्टीने उपयुक्त असतो. कोवळ्या फळांचे लोणचे घालतात. उत्तर बिहारातील पगडा विभागातील बेलफळे पातळ सालीची असून त्यांचा मगज स्वादिष्ट असतो. पंजाबात फळांच्या मगजामध्ये दूध, साखर व कधी चिंचही घालून सरबत करतात. धातूपुष्टतेस गाईच्या दुधात बेलाच्या सालीचा रस जिऱ्याची पूड टाकून घेतात.  

धातू पडत असल्यास पुष्कळशी पाने पाण्यात वाटून त्यात जिरे, खडीसाखर टाकून घेतात. बहिरेपणावर गोमूत्रात बेलफळ वाटून घेतात कढवितात व कानात घालतात. फळांच्या कवचापासून पिवळे रंगद्रव्य मिळते. कच्च्या फळांचे कवच त्रिफळा चूर्णाबरोबर कफलिको छपाईत उपयुक्त असते. कवचापासून `मार्मेले' हे बाष्पनशील तेल काढतात. कोवळ्या फळांत मगजाबरोबर श्लेष्मल द्रव्य असते. त्याचा उपयोग डिंकासारखा होतो. पाण्यात बनविलेल्या रंगांत हे द्रव्य मिसळून चकाकी आणता येते. इमारतीच्या चुन्यात मगज मिसळून तो चिकट व चिवट करतात आणि विहीरीकरिता वापरतात. खोडापासून उत्तम डिंक मिळतो. फांद्या व पाने गुरांना खाऊ घालतात. फुलांपासून सुगंधी द्रव्य मिळते.

फळांमध्ये `मार्मेलोसीन' हे क्रियाशील घटकद्रव्य असून ते सारक व मूत्रल (लघवी साफ करणारे) असते; त्यामुळे थोडा निद्रानाश होतो व घाम कमी येतो; अधिक प्रमाणात घेतल्यास हृदयक्रिया मंदावते. बेलफळात ४-६ टक्के साखर; मगजात ९ टक्के व सालीत २० टक्के टॅनीन असते. बियातून ११.९ टक्के कडूतेल मिळते, ते रेचक असते. मुळाची साल व कधी खोडावरचीही साल पाळीच्या तापात देतात, तिच्या `अंबेलिफेरॉन' हे द्रवय असते. मुहाची साल मत्स्य विष आहे. पानांत बाष्पनशील तेल असते. फळातील मगज काढून टाकून कवचाचा उपयोग डबीप्रमाणे करतात. कोवळी लहान फळे रूद्राक्षाबरोबर माळांमध्ये घालतात.



 


उत्तर लिहिले · 27/10/2021
कर्म · 121725