आरोग्य आहार

उन्हाळ्यात अंडे खावे की नको?

2 उत्तरे
2 answers

उन्हाळ्यात अंडे खावे की नको?

0
उन्हाळ्यात अंडे खावे की नको, हा एक सामान्य प्रश्न आहे. याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

अंड्याचे फायदे:

  • प्रथिने: अंड्यांमध्ये उच्च प्रतीची प्रथिने असतात, जी शरीरासाठी आवश्यक आहेत.
  • पोषक तत्वे: अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी, बी १२ आणि अन्य आवश्यक पोषक तत्वे असतात.
  • ऊर्जा: अंडी ऊर्जा देतात आणि दिवसभर सक्रिय राहण्यास मदत करतात.

उन्हाळ्यात अंडे खाण्याचे तोटे:

  • शरीरात उष्णता वाढ: अंड्यांच्या सेवनाने शरीरात उष्णता वाढू शकते, ज्यामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात.
  • पचनास जड: उन्हाळ्यात पचनक्रिया मंदावते, त्यामुळे जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्यास ते पचनास जड वाटू शकते.

काय करावे:

  • moderation: उन्हाळ्यात अंडी moderation मध्ये खाणे चांगले.
  • Hydration: पुरेसे पाणी प्यावे.
  • वेळेनुसार बदल: दिवसाच्या थंड वेळेत खाणे अधिक चांगले.

निष्कर्ष:

उन्हाळ्यात अंडी moderation मध्ये खाणे आरोग्यासाठी हानिकारक नाही. मात्र, आपल्या शरीराची प्रकृती आणि हवामानानुसार योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.

Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 21/4/2025
कर्म · 840
0
*🏪 उन्हाळ्यात अंड खाणे टाळावे का ?*









————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. https://bit.ly/3RonCyB तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच महिन्यात १५ अंडी पोटात जाणे आवश्यक आहेत.


आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
 डॉ. नेहा संल्वंका यांच्यामते, उन्हाळ्यात अंडी खाणे चूकीचे आहे हा एक गैरसमज आहे. अंड उष्ण असले तरीही ते पूर्ण अन्न आहे. अंड्यामध्ये विविध व्हिटॅमिन्स, मिनरल्स मुबलक प्रमाणात आढळतात. कॅल्शियम,आयर्न, फॉस्फरस या आवश्यक घटकांचा त्यात समावेश असतो. उन्हाळ्यात अंड खाल्ल्याने अपचन होते असा काहींचा समज आहे. परंतू त्यामध्ये काहीच तथ्य नाही. अंड्यामुळे उन्हाळ्यातील गरमीचा त्रास कमी होतो. अंड्यामध्ये मुबलक पोषणद्रव्य आढळतात त्यामुळे शरीरातील फ्लुईड घटकांचे प्रमाण राखण्यास मदत होते. अंड्यामुळे थकवा कमी होण्यास, मरगळ दूर होण्यास आणि शरीरातील एनर्जी टिकून राहण्यास मदत होते. एका दिवसात किती अंडी खावीत ?
डॉ. संवल्काच्या सल्ल्यानुसार उन्हाळ्यात दिवसभरात 1-2 अंडी खाणे योग्य आहे. मात्र यापेक्षा अधिक अंडी खाऊ नयेत. बॉडीबिल्डर किंवा मसल्स कमावण्यासाठी प्रयत्न करणार्यांसाठी 4-6 अंडी खाण्याचा सल्ला दिलेला असतो. परंतू उन्हाळ्यात त्यांनीदेखील 2-3 अंडी खावीत.अंडी खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. अतिप्रमाणात अंडी खाल्ल्यास पोटात गडाबड होऊ शकते.Ⓜडॉ. संवल्का यांच्यामते, कोणत्याही स्वरूपात अंड खाणे हितकारीच आहे. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫ऑम्लेट किंवा फ्रेंच टोस्ट सारख्या तळकट पर्यायांपेक्षा उकडलेले अंड हे अधिक हेल्दी आहे. त्यामुळे ऑम्लेटपेक्षा उकडलेले अंड खावे.Ⓜ▪️अंड्यातून नेमकं काय मिळते?:
- अंड्याच्या बलकापासून व्हिटॅमिन्स, क्षार, लोह मिळते. 
- अंड्याच्या बलकातील 'कोलीन' हा घटक बौद्धिक विकासात उपयुक्त ठरतो
- अंड्यातील बलक डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही उपयुक्त
- अंड्यांमधून ऊर्जा, प्रथिने, काबरेहायड्रेट, कोलीन, व्हिटॅमिन ए,डी,बी-६, बी-१२, 
- अंड्यातून फॉस्फेट, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम पोषणमूल्ये मिळतात.
अंड्यामुळे हाडांची मजबुती, निरोगी डोळे, तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते. अंड्यामध्ये सल्फर हा उष्ण घटक असतो. त्यामुळे ज्यांना आम्लपित्ता त्रास आहे त्यांनी मात्र आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच अंडे खावे.



Related Questions

कोणते मासे खाण्यासाठी चांगले आहेत?
आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे?
आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश का करावा?
मूग खाण्याचे फायदे काय?
सकस आहार व त्याचे परिणाम काय आहेत?
कुपोषित बालकांना अंगणवाडीतून किती वर्षांपर्यंत आहार दिला जातो?
आहाराचे प्रमुख घटक कोणते?