हळद चांगली कि भेसळयुक्त कशी ओळखावी?

हळद शुद्ध आहे की भेसळयुक्त हे ओळखण्यासाठी काही सोप्या पद्धती:
-
पाण्याची चाचणी:
एका ग्लास पाण्यात एक चमचा हळद टाका.
जर हळद लगेच रंग सोडू लागली आणि पाण्याचा रंग गडद पिवळा झाला, तर त्यात भेसळ असू शकते. शुद्ध हळद हळू हळू रंग सोडते.
-
बुडण्याची चाचणी:
Glass मध्ये हळद टाकल्यावर, शुद्ध हळद खाली तळाशी जमा होते, तर भेसळयुक्त हळद पाण्यावर तरंगते.
-
रंगाची चाचणी:
आपल्या हातावर थोडी हळद चोळा. जर तुमच्या हातावर लालसर रंग लागला, तर त्यात भेसळ असण्याची शक्यता आहे. शुद्ध हळद सहसा नैसर्गिक पिवळा रंग देते.
-
चव आणि वास:
शुद्ध हळदीला नैसर्गिक सुगंध असतो आणि चव थोडी कडू असते. भेसळयुक्त हळदीला मातीचा वास येऊ शकतो.
-
ऍसिड टेस्ट:
Test tube मध्ये 1ml हळद आणि 2ml concentrated hydrochloric acid मिसळा. जर mixture चा रंग purple (जांभळा) झाला तर हळद शुद्ध आहे.
टीप:
हळद खरेदी करताना, शक्यतोवर नामांकित ब्रांडची किंवा organic हळद खरेदी करा.