कथा साहित्य
ग्रंथ आणि ग्रंथालय
मुस्लिम धर्म
साहित्य
मुस्लिम लोक श्रीमद्भगवदगीता शिकतात ते ठिकाण कोणते?
2 उत्तरे
2
answers
मुस्लिम लोक श्रीमद्भगवदगीता शिकतात ते ठिकाण कोणते?
4
Answer link
यदा यदा ही धर्मस्य .. .', भगवद् गीतेतील काही श्लोक आणि गायत्री मत्रांचे दररोज पठण ... हे कोणत्या मंदिर वा मराठी शाळेतलं चित्र नाही , तर घुमान जवळ असलेल्या कादियॉं येथील जामिया अहमदिया या धार्मिक शिक्षण संस्थेतील आहे .. . तिथे शिकविली जाते सर्वधर्मांविषयी सहिष्णुता , देशभक्ती आणि सलोखा ... .
पंजाबच्या भूमीत घुमानपासून अठरा किलोमीटर अंतरावर इस्लामचं एक पवित्र रूप पाहायला मिळालं . संत नामदेव महाराजांनी धर्माची सीमा ओलांडली . त्यांचाच वारसा म्हणता येईल , अशा हजरत मिर्झा गुलाम अहमद या अवलियाने सव्वाशे वर्षांपूर्वी मुस्लिमांच्या अहमदिया पंथाची कादियॉं येथे स्थापना केली . त्याची पताका आता देशविदेशात फडकत आहे .

कादियॉंचं वैशिष्ट्य लोक अभिमानाने सांगतात की , जेव्हा भारत - पाकिस्तानची फाळणी झाली , त्या वेळी देशभर दंगली , कत्तली झाल्या ; पण कादियॉं हे असे एक गाव होते , तिथे मुस्लिमांचं रक्षण हिंदू आणि शिखांनी केले आणि मुस्लिमांनी या धर्मातील नागरिकांचं . इथे हाच सलोखा आजही कायम आहे . त्यामुळेच अहमदियाच्या मशिदीजवळच एक मंदिर आणि गुरुद्वारा आहे . या गावात कधीही जात- धर्मावरून वाद झालेले नाहीत .
आपल्या शब्दांतून वा कर्मातून कोणीही दुखवले जाऊ नये , देशाच्या प्रती प्रत्येकाने भक्तिभाव दाखवावा, जगाला प्रेम अर्पावे , असं मानणारा हा अहमदिया पंथ आहे . त्याची शिकवण देण्यासाठी कादियॉंमध्ये जामिया अहमदिया हे विद्यापीठाप्रमाणे शैक्षणिक संकुल उभारण्यात आले आहे . तिथे शिक्षण देण्याची भाषा अरबी आणि उर्दू असली तरी , केवळ इस्लामची शिकवण दिली जात नाही . हिंदू, शीख , बौद्ध आदी धर्मांचीही शिकवण दिली जाते. गीतेचे अध्याय आणि गायत्री मंत्र शिकविला जातो .
विद्यार्थ्यांसाठी सात वर्षांचा अभ्यासक्रम इथे चालविला जातो . आम्ही एका वर्गाला भेट दिली त्या वेळी मुलांनी यदा यदा ही धर्मस्य तसेच ॐ
भूर्भुव : स्व : . .. अर्थात गायत्री मंत्र आणि अन्य श्लोकांचे पठण केले.
" खिदमत ए खुल्क ' म्हणजे प्रत्येकाची सेवा हे ब्रीद असलेल्या अहमदिया पंथाचे मुख्य कार्यालय कादियॉंमध्ये आहे . त्याद्वारे शैक्षणिक संस्थाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम चालविले जातात. नैसर्गिक आपत्तीच्या काळात ते आपला सेवाधर्म बजावतात . सेवा , शांतता आणि प्रेम यांचं अनोख रूप अहमदिया पंथाची शिकवणीतून दिसून येते .
बनारसमध्ये संस्कृत शिक्षण
जामिया अहमदियामध्ये कमरूल हक खान आणि महंमद नसीरूल हक हे दोन तरुण शिक्षक विद्यार्थांना संस्कृत विषय आणि गीता शिकवतात . या दोघांनीही बनारसमधील संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयात संस्कृतचे शिक्षण घेतले आहे . कमरूल हे शास्री म्हणजेच पदवी उत्तीर्ण आणि नसीरूल हक हे आचार्य म्हणजे पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आहेत.
संस्कृतमध्ये चर्चा
नसीरूल हे स्वतःचे नाव नसीर आचार्य सांगतात . त्यांनी संस्कृत भाषेतील शैक्षणिक कामगिरीबद्दल बनारसमधील संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाने सुवर्णपदक देऊन गौरविले आहे . त्यांची भेट आज सकाळी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते , संस्कृतचे प्रकांड पंडित डॉ . सत्यव्रत शास्री यांच्याशी कादियॉंमधील " सराय वसीम ' या अभ्यागत निवासात झाली. दोघांमध्ये संस्कृत भाषा, दुर्मिळ ग्रंथ यावर अर्धा तास चर्चा झाली. विशेष म्हणजे ही चर्चा हिंदी , इंग्रजी नव्हे; तर संस्कृत भाषेत होती
0
Answer link
भारतामध्ये, मुस्लिम लोक श्रीमद्भगवद्गीता शिकतात अशी काही ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत:
- वाराणसी: बनारस हिंदू विद्यापीठासह (Banaras Hindu University) अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये भगवद्गीतेचे अध्ययन केले जाते, ज्यात मुस्लिम विद्यार्थीही सहभागी होतात. BHU Website
- अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (Aligarh Muslim University): या विद्यापीठात धार्मिक अभ्यासाचा एक भाग म्हणून भगवद्गीतेचा अभ्यास केला जातो. AMU Website
- जामिया মিলিয়া ইসলামिया (Jamia Millia Islamia), दिल्ली: या संस्थेत विविध धर्मांचा अभ्यास केला जातो, ज्यात भगवद्गीतेचाही समावेश आहे. JMI Website
या व्यतिरिक्त, अनेक Interfaith Dialogue Centers (आंतरधर्मीय संवाद केंद्रे) आहेत, जिथे विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करतात आणि त्यातून समन्वय साधण्याचा प्रयत्न करतात.