कथा साहित्य
जेव्हा मी जात चोरली होती त्या कथेचे कथानक कसे स्पष्ट कराल?
1 उत्तर
1
answers
जेव्हा मी जात चोरली होती त्या कथेचे कथानक कसे स्पष्ट कराल?
2
Answer link
मानवी दुःखांचे कारण जातीयव्यवस्था हेच असते, याचे भान ही कथा देते.
या कथेतील नायक स्वतःची जात लपवतो. मनुवदाचा पगडा असलेले रामशरण, माताप्रसाद, रणछोड, देवजी ही पात्रे राहणीमानावरून नायकाला उच्चवर्णीय समजतात. त्याला राहिला रणछोड एक खोली देतो. नायक जात लपवण्यासाठी तोलून - मापून बोले, एकाकांत रमणे, स्वनिंदा करणे यांना प्राधान्य देतो.
त्याचवेळी मुंबईच्या काशिनाथ सकपाळला जाती अस्पृश्यतेमुळे कामगारांशी सामना करावा लागतो.तो उग्र, रागीट पवित्रा निर्माण करून समूहाला आवाहन करतो. मारहाणीच्या भीतीपोटी हातात सुरा घेऊन खून करण्याची भाषा नायकाजवळ बोलून दाखवतो.
उच्च - नीचतेमुळे स्फोटक, दहशतीच्या अमानुष वातावरणात कथा नात्यरूप धारण करतो. जातिभेद-द्वेष-अस्मिता, स्पृश्य-अस्पृश्यता, रामशरणची गुरुभक्ती व दानवीपणा, काशिनाथ व नाईकाचा नोकरी सोडण्याचा निर्णय, खरी जात समजल्यामुळे नायकाला झालेली मारहाण आदी घटना घडली वाचकाला अस्वस्थ आणि अंतमूर्ख करते, विचारप्रणव बनवते.
या कथेतील सर्व पात्रे सुडाच्या, संतापाच्या, दुःखाच्या, दैन्याच्या टोकाला जाऊन पोहचली आहेत की त्यांचा कधीही कडेलोट होऊ शकतो.