औषधे आणि आरोग्य व्यसन आरोग्य

माझे तोंड पूर्ण उघडत नाही आहे. मी गुटखा वगैरे काहीही खात नाही. तोंड जबरदस्तीने उघडायचा प्रयत्न केला तर कानाखाली एकीकडून खूप ञास होत आहे. नेमकं काय आहे हे यावर उपाय?

3 उत्तरे
3 answers

माझे तोंड पूर्ण उघडत नाही आहे. मी गुटखा वगैरे काहीही खात नाही. तोंड जबरदस्तीने उघडायचा प्रयत्न केला तर कानाखाली एकीकडून खूप ञास होत आहे. नेमकं काय आहे हे यावर उपाय?

4
खरं तर असे आरोग्यासंबंधी प्रश्न मांडताना,
आपलं वय आणि हा त्रास कधीपासून होतो
ते लिहिणं आवश्यक असते ? तसेच अशी
दुखणी व्यवसायासंबंधी सुद्धा असू शकतात.
जसे जे लोक रासायनिक कारखान्यात काम
करतात, जसे फॉस्परसच्या सानिध्यात काम
करणार्‍या व्यक्तिंना ' फॉसिजॉ ' या व्याधीचा
त्रास होऊ शकतो, ज्यामधे जबड्याची हाडे
ठिसूळ होऊन, जबडा दूखी ही त्याची लक्षणे
असू शकतात. तसेच जर लहाणपणी वा
कुणाला कधी ' मिरगी ' चा त्रास असल्यास
दातखीळ बसून बेशुद्धीत, कुणीतरी घरगुती
उपचार करताना, बळजबरीने दातखिळ काढताना
काही तरी साधनाने बलप्रयोगाने जबडा उचकटण्याच्या प्रयत्नाने ही भविष्यात जबड्याच्या सांध्यांचा, सांधेदुखीसारखा त्रास उद्भवू शकतो.
याला ' टेम्पोरोमंडिब्युलर ' सांधे आणि त्याच्या आजूबाजूला होणाऱ्या वेदना, एकतर जबड्याच्या एका किंवा दोन्ही बाजूंना, याला जबडा दुखणे म्हणून संबोधले जाते. हे तीव्र किंवा दीर्घकालीन असू शकते.
शिवाय जबडा दुखण्याशी सहसा खालील लक्षणांचा समावेश असतो: अगदी साधारण अक्कलदाढ येतानाही जबडे कमालीचे दुखतात.
दिर्घकालीन डोकेदुखी मुळेही दुखतात.
काहींचे जबडे जन्मजात कोमल, नाजूक असतात.
चावतांना किंवा तोंड उघडतांना वेदना.
कानदुखीमुळेही किंवा कानाच्या आसपास किंवा कानशीलात (जबड्यात) वेदना होतात.
जबड्यांच्या हालचाली वेगवेगळे आवाज करतात
जसे की क्लिकिंग, पॉपिंग किंवा ग्राइंडिंग वगैरे
अन्न चावताना किंवा कठिण पदार्थ चावताना.
तोंड उघडताना जबडा लॉक होणे.
यामुळे क्वचितच चेहऱ्याच्या वेदना होऊ शकतात.
हृदयाशी संबंधित परिस्थितीच्या बाबतीत, छातीत व जबड्यात वेदना, मान, पाठ, हात किंवा पित्त वाढणे.
सर्वसामान्यपणे जबडा दुखण्याची खालील कारण असतात: जबड्याची ईजा, संसर्ग, दाढदुखी
सायनस संबंधित समस्या वा हिरड्यांची व्याधी.
ईत्यादी कारणे असू शकतात. दिरंगाई न करता
तज्ञ डॉक्टरांकडून योग्य त्या तपासण्या व उपचार
करणे.
उत्तर लिहिले · 26/12/2020
कर्म · 960
1
तुम्ही हे असे झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण या अशा आजारांमुळे मोठे आजार ओढवतात‌ माझी हिच इच्छा आहे की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला लवकर घ्या‌ .
उत्तर लिहिले · 25/12/2020
कर्म · 2910
0
बाजारात खुप ऍलोपॅथिक, आयुर्वेदिक,होमिओपॅथिक असे औषधे आहेत.योग्य निपुण डॉक्टरांच मार्गदर्शन घ्या.आणि त्याच्या निगराणीत उपचार घ्या.
उत्तर लिहिले · 25/12/2020
कर्म · 4420

Related Questions

पयावरणीय परीणाम आणि इलेक्ट्रॉनिकसवरील आरोग्यावर होणार परीणाम कमी करणे आहे?
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री?
जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?
आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छता बाबत थोडक्यात माहिती लिहा?
आरोग्य हे एक देणगी?
💉जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो?
खोकल्यामुळे छातीत का दुखते?