औषधे आणि आरोग्य
घरगुती उपाय
दात
दाढ
आरोग्य
माझी कोणतीही दात दाढ किडली नाहीये तरी एका बाजूला दात खूप दुखत आहेत, काय करावे?
1 उत्तर
1
answers
माझी कोणतीही दात दाढ किडली नाहीये तरी एका बाजूला दात खूप दुखत आहेत, काय करावे?
3
Answer link
तुमची दाढ किडलेली नाही हे तुम्हाला कसे कळाले? अशा वेळेस डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे. बाहेरून दाढ किडली आहे की नाही हे आपल्याला कळत नाही. जेव्हा दाताच्या डॉक्टर कडे तुम्ही जाल तेव्हा तो तुम्हाला बरोबर सांगेल की तुमची दाढ का दुखते आहे.
तरीही घरगुतीद उपाय करायचा असेल तर हा सोपा उपाय:
तूळसीची ५ ते १० पाने स्वच्छ धुऊन वाटीमध्ये किंवा छोट्या ऊखळीमध्ये घेवून कुटुन त्याचा रस निर्माण करावा आणि त्यात कापुराच्या 3 ते 5 वड्या मिसळून घ्यावे. कापसाचे छोटे छोटे ३ ते ४ बोळे या मिश्रणात भिजवून दुखणार्या दाढेत ठेवावेत त्यामुळे दाढ दुखी कमी होण्यास मदत होते.