घरगुती उपाय

कंबरदुखीवर घरगुती उपाय काय आहे? (मेथीचे अर्धा एक चमचा दाणे कपभर पाण्यात रात्रभर भिजवून ठेऊन सकाळी ते पाणी प्यायल्यास कंबरदुखीवर कमी होते का/थांबते का?)

1 उत्तर
1 answers

कंबरदुखीवर घरगुती उपाय काय आहे? (मेथीचे अर्धा एक चमचा दाणे कपभर पाण्यात रात्रभर भिजवून ठेऊन सकाळी ते पाणी प्यायल्यास कंबरदुखीवर कमी होते का/थांबते का?)

1
मेथीचे पाणी सकाळी उठून प्यायल्याने पचनशक्ती सुधारते व मधुमेह समतोल राखण्यासाठी अजून इतर कारणांसाठी उपयोग होतो कंबर दुखी वर नाही

 : जर तुम्ही महिनाभर मेथीचे पाणी प्यायलात तर तुमचं आरोग्य अनेक प्रकारे सुधारू शकतं. मेथीचे पाणी बनवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात दोन चमचे मेथीचे दाणे टाकून झाकून ठेवा. हे पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी प्या. तुम्ही महिनाभर असे करा. द हेल्थ साइटच्या माहितीनुसार मेथी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रात्रभर पाण्यात भिजवून ) त्याचे पाणी प्यायल्यास ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. मधुमेहामध्येही याचे सेवन फायदेशीर ठरते. मेथीचे पाणी पिण्याचे इतर कोणते फायदे आहेत ते पाहुया.

1. पचन सुधारणे

अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांसाठी मेथीचे पाणी खूप फायदेशीर आहे. मेथीमध्ये असलेले पाचक एंझाइम स्वादुपिंड अधिक अ‌ॅक्टिव करतात, ज्यामुळे पचन सुधारते. यामध्ये भरपूर फायबर असतात ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते.



2. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील


मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल ठीक राहते. मेथीच्या दाण्यांचे पाणी महिनाभर नियमित सेवन केल्यास शरीरात एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढू लागते आणि त्याचे खूप फायदे होतात.


3.सर्दी, खोकला

मेथीच्या दाण्यांमध्ये म्युसिलेज नावाचे तत्व आढळते, ज्यामुळे सर्दी आणि खोकल्यामध्ये आराम मिळतो. तुम्ही एक चमचा मेथीचे दाणे कपभर पाण्यात उकळा आणि पाणी अर्धे राहिल्यावर ते गाळून प्या. तुमचा सर्दी-खोकला निघून जाईल.


4. मधुमेहावर नियंत्रण

मेथीचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्यास साखरेवर नियंत्रण ठेवण्यास खूप मदत होते. मेथी रक्तातील ग्लुकोजची पातळी देखील कमी करते, ज्यामुळे मधुमेहामध्ये खूप फायदा होतो.



5. वजन नियंत्रित राहते

सकाळी मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्यानं दिवसभराची भूक कमी होते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

6. किडनीसाठी फायदेशीर

जर तुम्हाला किडनीचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर महिनाभर मेथीचे पाणी प्या. यातील अँटी-ऑक्सिडंट तत्व किडनीसाठी फायदेशीर आहे.

7. हृदयासाठी फायदेशीर

मेथी हृदयासाठीही खूप चांगली आहे. यात हायपोकोलेस्टेरोलेमिक तत्व असते जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. ज्यामुळे हृदय निरोगी राहते. याच्या सेवनाने रक्ताभिसरणही चांगले राहते.


8. त्वचेसाठी

मेथीचे पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे स्किन अॅलर्जीची समस्या दूर होते आणि नखांवर मुरुम होण्याची समस्याही दूर होते. त्यात अँटीएजिंग गुणधर्म देखील आहेत आणि त्वचेला हायड्रेट ठेवते.

9.केसांसाठी

मेथी दाणे रात्रभर भिजवून सकाळी बारीक करून केसांच्या मुळांमध्ये लावल्यास केस गळणे थांबते आणि चमक येते.

कंबर दुखीवर घरगुती उपाय
कंबरदुखीवर घरगुती उपाय



एका मोठ्या चमच्यामध्ये नारळाचे तेल घ्या. यात लसूणाच्या सोललेल्या ५ ते ६ पाकळ्या टाकून भाजून घ्या. जेव्हा तेल थंड होईल तेव्हा या तेलाने कंबरेसोबत पूर्ण शरीराची मालिश करून घ्यावी आणि मग अंघोळ करावी. लसून हे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते. यामुळे तुम्हाला वेदनेपासून लवकर आराम मिळेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की मालीश करण्याआधी किमान ३० मिनिटांनीच अंघोळ करावी. जेणेकरून या वेळेत तुमचे शरीर हे मिश्रण शोषून घेईल.

(

कपड्याने द्या शेक



जेव्हा कंबर खूप दुखत असेल आणि कोणी मसाज करणारा सुद्धा नसेल तेव्हा गरम पाण्यात मीठ मिसळा आणि त्यात एक स्वच्छ कपडा टाकून भिजवा आणि मग तो कपडा पिळून त्यातून निघणाऱ्या वाफेने कंबरेला शेक द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या अंगावर प्युअर कॉटनचे कपडे असतील. सोबत या गोष्टीची सुद्धा काळजी घ्या की शेक कधीच थेट त्वचेवर देत नाही तुमच्या त्वचेवर कॉटन कपड्याचा एक थर असावा.

(
कामातून ब्रेक घ्या



जर तुम्ही तासनतास एकाच ठिकाणी बसून काम करत असाल तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. कामातून तुम्ही दर तासाने एक ब्रेक घ्या आणि ५-१० मिनिटे फेरी मारा. तुमच्या शरीराची हालचाल ठराविक काही काळाने व्हायला हवी. असे केल्यास कंबरेवर दाब पडत नाही आणि कंबरेला आराम मिळत राहतो. तुम्ही घरी असाल की ऑफिसला ही गोष्ट करायला अजिबात विसरू नका. ही गोष्ट तुम्ही करत नसाल तर कंबरदुखीचा त्रास तुम्हाला विळखा नक्कीच घालणार. त्यापासुन स्वत:चा बचाव करायचा असेल तर आवर्जून कामातून ब्रेक घेत राहा.

स्त्रियांच्या शरीरात वयाची ३० वर्षे ओलांडल्यानंतर आणि पुरुषांच्या शरीरात वयाची ४५ वर्षे ओलांडल्यानंतर कॅल्शियमची कमतरता भासू लागते. म्हणून गरजेचे आहे की तुम्ही तुमच्या शरीरात शक्य तितका कॅल्शियमचा वापर करावा. कॅल्शियम तुमची कंबरदुखी दूर ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, पण हेच कॅल्शियम जर कमी झाले तर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास सुद्धा सहन करावा लागेल. म्हणून शक्य तितका कॅल्शियम युक्त आहार घ्यावा. ते शक्य नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम सप्लीमेंट्स घ्यावीत. तर असे काही उपाय करून तुम्ही सहज आपल्या कंबरदुखीवर नियंत्रण मिळवू शकता. ही गोष्टी आपल्या ओळखीच्या लोकांपर्यंत आणि मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि त्यांना देखील कंबरदुखीपासून दूर राहण्याचा सल्ला द्या.

उत्तर लिहिले · 25/5/2022
कर्म · 48555

Related Questions

ऍसिडिटी वर घरगुती उपाय?
छातीत जळजळ होत असेल तर हे सोपे घरगुती उपाय?
गोठलेला कफ दूर करण्यासाठी घरगुती उपाय कोणता आहे?
मला हाताला गजकरणाचे चट्टे उटले आहेत, तर यावर कोणता घरगुती उपाय आहे का?
कंबरदुखीवर घरगुती उपाय कोणता करता येईल?
कोणत्या अवकाशयानाने पहिल्यांदा मानवाला चंद्रावर सोडले उत्तर दाखवा?
शौचास गेले असता तसेच इतर वेळी गुदद्वाराशी जळजळ होण्यावर घरगुती उपाय काय आहे? (हा त्रास कधीच होता कामा नये)