2 उत्तरे
2
answers
सुशांत सिंग राजपुतने आत्महत्या का केली असेल?
8
Answer link
४ दिवस अगोदर त्याच्या ex मॅनेजर नी आत्महत्या केली होती.... त्याच्याशी काही संपर्क असेल...
2
Answer link
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने अचानक एक्झिट घेतल्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्याचे आत्महत्येचे कारण अद्याप पुर्णतः स्पष्ट झाले नाही. या घटनेबद्दल माहिती घेत असताना नवीन माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सुशांतने दुपारी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतसिंग राजपूतने शनिवारी आपल्या काही जवळच्या मित्रांना घरी जेवणासाठी आमंत्रित केले होते. रात्री पार्टीला उशीर झाल्यामुळे सर्वजण उशिरा झोपले होते. सुशांतसिंग हा देखील त्याच्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. दुपार होऊन देखील सुशांत झोपेतून जागा झाला नाही म्हणून काही मित्रांनी त्याचे बेडरूमचे दार ठोठावले मात्र आतून दार बंद होते. बराच वेळ झाल्याने आतून काही प्रतिक्रिया येत नसल्यामुळे अखेर दार तोडून मित्रांनी आत प्रवेश केला. यावेळी सुशांतसिंगने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला.
६ महिन्यांपासून नैराश्यावर उपचार सुरू
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत हा गेल्या काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त झाला होता. त्याच्यावर स्पेशल डॉक्टरांकडे उपचार सुरू होता. घरातून त्याच्या वैद्यकीय उपचाराची कागद पत्र आढळून आली आहे. यावरून सुशांतला नैराश्याने ग्रासले होते, व त्याच्यावर मागील सहा महिन्यांपासून उपचार सुरू होते, अशी माहिती सध्या समोर आली आहे.
मॅनेजर आणि सुशांतच्या आत्महत्याचा संबंध नाही
मालाड मालवणी येथे ८ जून रोजी दिशा सालीयन हिने राहत्या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्या आणि सुशांत सिंगच्या आत्महत्याचा तूर्तास काही संबंध नसल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे म्हणणे आहे. दिशा ही सुशांतसिंग यांची व्यवस्थापक नव्हती, ती एका ज्या एजन्सीमध्ये नोकरी करीत होती त्या एजन्सीकडे अनेक बॉलिवूड कलाकारांचे कामे होती त्यापैकी एक सुशांतसिंग राजपूतचे काम त्या एजन्सीकडे होते. त्यामुळे दिशाचा सुशांतसिंगशी थेट संपर्क नव्हता असे सांगण्यात येत आहे.