Topic icon

बॉलीवूड

2
७० आणि ८० चे दशक गाजवणारा एक महान अभिनेता म्हणजे, दादा कोंडके. "दादा कोंडके" हे नाव माहीत नाही असा कुणी मराठी माणुस नसेल.द्विअर्थी संवाद आणि विनोद ही त्यांच्या चित्रपटांची खासियत होती. यावरून त्यांच्यावर टीकाही झाली. पण दादा कोंडके यांच्या सिनेमांचा एक विशिष्ट प्रेक्षकवर्ग होता. या प्रेक्षकवर्गाने दादा कोंडके यांच्या चित्रपटावर प्रचंड प्रेम केले.
दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटसृष्टीवर अनेक वर्षं राज्य केले. त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ ला मुंबईत झाला. दादा कोंडके यांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट असल्याने त्यांचे बालपण खूपच हलाखीत गेले. नायगावच्या मराठी कामगार वस्तीमध्ये ते लहानाचे मोठे झाले. उदरनिर्वाहासाठी दादांनी अपना बाजार येथे नोकरी देखील केली आहे. ते लहानपणापासून नायगाव परिसरात खूपच प्रसिद्ध होते. त्यांना बँडवाले दादा असेच म्हटले जात असे. 
दादा कोंडके यांनी सेवा दलाच्या बँड पथकामध्ये देखील काम केले आहे. त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात काम केले होते. त्यानंतर ते नाटकांमध्ये काम करू लागले. त्यानंतर त्यांनी दादा कोंडके आणि पार्टी असे पथकही काढले. त्याचवेळी त्यांची वसंत सबनीसांसोबत ओळख झाली. त्या दोघांची त्यावेळी चांगली मैत्री झाली आणि त्यांनी पुढे जाऊन स्वतःची नाटक कंपनी काढली. त्यानंतर विच्छा माझी पुरी करा हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आणले. हे नाटक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या नाटकाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यामुळे दादा कोंडके यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर यायला लागल्या. त्यांनी भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 
दादा कोंडके यांनी उषा चव्हाण यांना ब्रेक दिला होता.‘सोंगाड्या’ या चित्रपटासाठी त्यांना अभिनेत्रीची गरज होती. त्यावेळी सातारा बसस्थानका जवळ दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांची पहिली भेट झाली होती. तेव्हा दादांनी उषा यांची निवड केली आणि त्यांना पहिला ब्रेक मिळाला.सोंगाड्या हा त्यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाने त्यांना मराठी चित्रपटसृष्टीत एक ओळख मिळवून दिली.दादा कोंडकेची ओळख म्हणजे त्याची ती ढगळ चड्डी होती. देखण्या हिरोंच्या जमान्यात एक लांब नाडी बाहेर आलेला चड्डी घालणारा सिनेमाचा हिरो कसा होऊ शकतो? झालाच तर त्याचे सलग ९ सिनेमे सुपरहिट होतात हे सगळ तेव्हा एक सरप्राईजचं होतं. दादा कोंडकेनी फिल्म इंडस्ट्रीचे व्हाईट कॉलर मानसिकतेवाले सगळे नियम धुडकावून आपलं अढळ असं स्थान निर्माण केलं होतं.नंतर त्यांनी राम राम गंगाराम, बोटं लावीन तिथे गुदगुल्या, पांडू हवालदार, आंधळा मारतो डोळा यांसारखे एकाहून एक हिट चित्रपट दिले. चित्रपटातील त्यांच्या डबल मीनिंग कॉमेडीला प्रेक्षकांची खास पसंती मिळत होती. एक वेळ असा होता दादा कोंडकेंचे ९ चित्रपट जवळपास २५ आठवडे चित्रपटगृहात सुरु होते. या रेकॉर्डची गिनीज बुकमध्येही नोंद करण्यात आली आहे.दादांच्या चित्रपटांची नावं अशी असायची की, सेन्साॉर बोर्डला चित्रपटाला संमती देण्यासाठी अक्षरश: नाकीनऊ यायची. पण तरीही दुहेरी अर्थ असणाऱ्या चित्रपटाच्या टायटलला सेन्सॉर बोर्ड अनेक प्रयत्न करुनही बॅन करु शकलं नाही.मराठी भाषेवरील मजबूत पकड, शब्दांचे सामर्थ्य, हजरजबाबीपणा आणि फ्री स्टाईल अभिनय हि त्यांची खासियत होती. विषय कोणताही असो, तो आपल्याला हवा तसाच वळवायचा आणि बिनदिक्कतपणे समोरच्याला पटवूनही द्यायचा ही त्यांची खास हातोटी. द्वयर्थी विनोदांचा वापर त्यांनी नक्कीच केला, पण त्याचा इतका चपखल वापर करण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकले नाही.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,‘आये’ हा शब्द तर जणू दादांचा कॉपीराईटच.द्वयर्थी विनोद पलीकडे जावून अगदी मेंढरू, कुत्रा बैल असे प्राणी व भाजीपाला, झाडे यावरील नितांत सुंदर रचना सहजतेने उतरल्या.मराठी मातीची नस दादांना अचूक सापडली होती म्हणूनच त्यांचे सर्वच चित्रपट सुपरहीट ठरले.. ग्रामीण जीवन आणि सर्वसामान्य व्यक्तिरेखा हा त्यांच्या चित्रपटाचा बाज. शहरी जीवन, त्यातून आलेला बकालपणा, ग्रामीण जनतेची शिक्षित वर्गाकडून होणारी कुचंबणा हे त्यांच्या चित्रपटाचे विषय असत.मराठीत निर्मिती केलेल्या सर्वच चित्रपटात सबकुछ दादाच असत. अभिनयापासून ते दिग्दर्शनापर्यंत सर्वच कामे ते स्वत: करत. मात्र, त्यांचा मोठेपणा असा की, सर्व कामे स्वत: करूनही त्याचे श्रेय ते एकटे कधीच घेत नसत. तर सोबतच्या मंडळींना त्याचे श्रेय ते देत असत. 
http://bit.ly/3rMpAu6
यशवंतराव चव्हाण, पुलं देशपांडे, बाळासाहेब ठाकरे, प्र. के. अत्रे यांच्यासारखे दिग्गज त्यांच्या अभिनयाचे चाहते होते.
१९७३-७४चा तो काळ. त्या काळात मराठी माणूस चित्रपट सृष्टीत असला तरीही, त्यावर अधिकाराज्य होते ते हिंदी भाषकांचेच. त्यामुळे मराठी माणसाचे बॅनरवाले चित्रपट वगळता इतरांचे चित्रपट थिएटरला लावायला थिएटर मालकांचा नकार असे. त्यात ‘सोंगाड्या’ हा दादांचा पहिलाच चित्रपट. दादांना चित्रपट प्रदर्शित करण्याचा ना अनुभव होता ना त्यांच्याकडे पैसा होता. त्यामुळे ‘कोहिनूर’ चित्रपटगृहाच्या मालकाने दादांचा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला. त्यावेळी ‘तिन देवियां’ हा चित्रपट ‘कोहिनूर’ला लागला होता.दादांचा पहिलाच चित्रपट प्रदर्शनासाठी थिएटर न मिळाल्यामुळे रखडतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. दरम्यान, मुंबईत शिवसेनेचा बोलबाला वाढत होता. दादांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. मराठी माणसाचा चित्रपट प्रदर्शित करायला थिएटरमालक नकार देतो. ही गोष्ट बाळासाहेबांना खटकली. बाळासाहेबांनी आदेश दिला आणि दादांचा चित्रपट झळकला. तेव्हापासून दादांनी अखेरपर्यंत मागे वळून कधीच पाहिले नाही. दिवसेदिवस दादांच्या यशाची कमान चढतीच राहिली. मराठी रसिकांनी दादांवर भरभरून प्रेम केले.बाळासाहेबांच्या आदेशाने ‘सोंगाड्या’ ‘कोहिनूर’ला झळकला त्या दिवसापासून दादा, शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाते घट्ट झाले. इतके की, बाळासाहेब जेव्हा नाराज असत तेव्हा त्यांच्या खोलीत एकाच माणसाला प्रवेश असे, ते म्हणजे दादा कोंडके. बाळासाहेबांनीही दादांची मैत्री अखेरपर्यंत सांभाळली. इतकी की दादांचे निधन झाल्यावर बऱ्याच वर्षांनी शिवतिर्थावर अखेरचे भाषण करतानाही बाळासाहेबांनी दादा कोंडके यांची आठवण काढली होती.आपल्या चित्रपटांतून भाषणांतून दादांनी अनेक नेत्यांची खिल्ली उडवली. अगदी यशवंतराव चव्हाणांपासून ते शंकरराव चव्हाण, शरद पवार यांच्यापर्यंत.दादा अनेकदा शिवसेना उमेदवारांच्या प्रचारालाही जात. दादा तेथे आपल्या भाषणात डबल मिनींग बोलायचे. अगदी डबल मिनींग बोलून राजकीय नेत्यांचीही खिल्ली उडवायचे. अशा भाषणांनी दादांचे शत्रूही अनेक झाले होते. त्यामुळे दादांवर कोणीतरी हल्ला करेन असा विचार त्यांचे काही मित्र व्यक्त करायचे. तेव्हा दादांना घरापर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसैनिकांचा एक ताफाच दादांच्या दिमतीला असायचा.
दादांनी मराठीत एकूण १६ चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्यमोहोत्सवी ठरले. या विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. त्यांनी हिंदीत सुद्धा ४ चित्रपटांची निर्मिती केली. 
दादा कोंडके यांचे लग्न झालेले होते. तसेच त्यांना तेजस्विनी नावाची मुलगी देखील होती. पण जनमानसांत ते अविवाहित म्हणूनच वावरत असत.दादांनी ‘एकटा जीव’ नावाचे पुस्तक लिहिले.(लेखिका अनिता पाध्ये) या पुस्तकात उषा चव्हाण यांच्यासह अनेक कालावंतांबद्दल बरेच काही बरेवाईट लिहिले गेले. खुद्द दादांना हे पुस्तक प्रकाशित करायचे नव्हते परंतु त्यांच्या मृत्यूनंतर हे पुस्तक प्रकाशित झाले. यानंतर या पुस्तकावर प्रचंड वाद झाला अखेर पुस्तकावर लगेचच बंदी घातली गेली.
मराठीतील या महान अभिनेत्याचे १४ मार्च १९९८ साली निधन झाले."एकटा जिव" या आत्मचरित्राच्या शेवटच्या पानावरील दादांचे शब्द प्रत्येक कलाकार आणि जीवंत व्यक्तीने वाचावे असे आहे.".आज एवढा पैसा, प्रॉपर्टी मिळवून काय उपयोग आहे ? कुणासाठी मी हे सर्व कमावलं आहे ? माझं दुःख, एकटेपण मी सहसा कुणाला जाणवू देत नाही. त्यामुळे मी एकटा मजेत जगतो अशी बऱ्याच जणांची समजूत आहे. एकटेपणाच्या बदल्यात देवाने मला पैसा, प्रसिद्धी, यश भरपूर दिलं. सर्वांनाच आयुष्यात मनासारख्या गोष्टी मिळत नाहीत अशी मी स्वतःचीच समजूत घालत असतो.
पुढल्या जन्मी देवाने मला पैसा, यश, प्रसिद्धी, काहीही दिलं नाही तरी चालेल, पण एकटेपण देऊ नये. माझी म्हणता येतील अशी माणसं द्यावीत हीच माझी इच्छा आहे."
अनिल पाटील,पेठवडगाव
9890875498http://bit.ly/3rMpAu6

2
चित्रपटांचे प्रकार-

१८९५ मध्ये ल्युमेअरबंधूंनी फ्रान्समध्ये मूक-चलचित्रनिर्मिती सुरू केली, तेव्हा घडणारी घटना कॅमेऱ्याने मुद्रित करून हुबेहूबपणे दाखविणे एवढाच हेतू होता. परंतु या तंत्रज्ञानाचा विकास होताना त्यात नाट्य आणि कथनकलेच्या शक्यता दिसू लागल्या. व्यवसाय-धंदा म्हणूनही याकडे पाहिले जाऊ लागले. संस्थात्मक स्टुडिओपद्धतीने निर्मिती होऊ लागली. पुढे ध्वनीची जोड मिळाली. त्यातील आर्थिक गुंतवणूक वाढत गेली. त्यामुळे कोणत्या प्रकारचे चित्रपट केले म्हणजे कोणत्या प्रकारचा, किती प्रेक्षकवर्ग मिळतो, आर्थिक परतावा मिळतो, या सर्वांचा विचार प्रबळ होत गेला. जे आशयसूत्र मांडावयाचे आहे त्याला कोणत्या प्रकारची रचना, तंत्र योग्य ठरेल, याचाही अभिव्यक्तीच्या अंगाने विचार होऊ लागला. महत्त्वाच्या घटनांची मुद्रण-नोंदणी, दृक्-श्राव्य माहितीसंकलन या हेतूंबरोबरच वैविध्यपूर्ण विषयांवरचे, वेगवेगळ्या धाटणीचे ललित चित्रपट प्रचंड संख्येने निर्माण होऊ लागले. चित्रपटांचे रंजनमूल्य, कलामूल्य, समाजमान्यता आणि लोकप्रियता वाढली. त्यामुळे कोणत्या प्रकारचे चित्रपट बघायचे हे ठरविण्यासाठी प्रेक्षकांनाही वर्गीकरणाची गरज वाटू लागली. जनसंवादाचे माध्यम म्हणूनही स्थान मिळाल्यामुळे चित्रपटांचा औपचारिक अभ्यास होऊ लागला. अभ्यासात कोणती संकल्पना कोणत्या चित्रपटासाठी प्रस्तुत ठरते हे समजण्यासाठी वर्गीकरण लागते. ललित कथापट म्हणून चित्रपट तयार झालेला असेल, तर ऐतिहासिक सत्याच्या निकषावर त्याकडे बघणे चुकीचे ठरते, तसेच ‘सत्य’ गोष्ट म्हणून सादर केलेल्या कथेत वास्तवाचा पुरावा बघणे अगत्याचे ठरते. कलात्मक निर्मितीबरोबर चित्रपट हा तंत्राधिष्ठित आर्थिक व्यवहार-व्यवसायही असल्याने, त्याची भौगोलिक विभागांतील वितरणव्यवस्था लावण्यासाठीही वर्गीकरण गरजेचे असते. हे वर्गीकरण मुख्यतः तंत्रज्ञानावर आधारित आणि आशय-रचना-मांडणी (treatment) असे निकष वापरून केले जाते.

तंत्राधारित वर्गीकरणाचे निकष वापरून पुढील प्रकार सांगता येतात :

१. मूक किंवा दृक्-श्राव्य चित्रपट (ध्वनिवापराचे उपप्रकार – मोनो, स्टीरिओ, डॉल्बी, सराउंड साउंड इत्यादी).

२. कृष्णधवल किंवा रंगीत (यातही रंगतंत्र, रंगांचे पोत यांवर आधारित प्रकार – टेक्निकलर, ईस्टमनकलर इत्यादी).

३. चित्रचौकटीच्या आकारावर आधारित प्रकार – ३५/७५ मिमी., सिनेमास्कोप, आयमॅक्स इत्यादी.

४. चित्रणपद्धती – अभिनेत्यांचे जिवंत चित्रण, सचेतनीकरण (ॲनिमेशन) किंवा दोहोंचे मिश्रण.

५. चित्रीकरण आणि प्रक्षेपणपद्धतींवर आधारित – द्विमिती, त्रिमिती इत्यादी.

६. चित्रपटांची लांबी – पूर्ण लांबीचा कथापट (८० मिनिटांपेक्षा जास्त ) किंवा लघुपट, लघुकथापटांचा गुच्छ इत्यादी.

७. अपेक्षित प्रेक्षकाधारित प्रकार – बालकांसाठी, कुमारांसाठी, सर्वांसाठी, प्रौढांसाठी इत्यादी.

चित्रपटनिर्मितीच्या हेतूवर आधारित मुख्य दोन प्रकार : १. माहितीपट (nonfiction) – नोंदपट किंवा दस्तऐवजीकरण करणारे चित्रपट, शैक्षणिक चित्रपट, प्रचारपट इत्यादी. २. कल्पित (fiction) किंवा ललित चित्रपट – (कलात्मक, व्यावसायिक-करमणूकप्रधान किंवा मध्यममार्गी इत्यादी.)

कल्पित किंवा ललित चित्रपटांत आशयसूत्र, कथेतील पर्यावरण, वातावरणनिर्मिती, अभिवृत्ती (मूड), प्रेक्षकांवर विशिष्ट मनोकायिक परिणाम करण्याची अपेक्षा ठेवून केलेली रचना यांवर आधारित उपप्रकार असतात. त्यांना ‘प्रकार’ न म्हणता ‘genre’ (फ्रेंच शब्द) म्हणजे ‘विधा’ ही संज्ञा वापरली जाते. विधा ही चित्रपटाची ‘मुख्य ओळख’ असते. त्यात इतर बाबी येतात; पण त्यांना दुय्यम स्थान असते. चित्रपट-अभ्यासासाठी वापरली जाणारी ‘विधा’ ही संकल्पना साहित्याच्या अभ्यासातून आलेली आहे.

ललित चित्रपटांच्या काही मुख्य विधा :

१. देमार (ॲक्शन) – शक्ती-शौर्यप्रदर्शन, घटनांचा वेग, संकलनाद्वारे वेग, चांगल्या-वाइटाचा संघर्ष.

२. साहसपट (ॲडव्हेंचर) – पर्वत, समुद्र, जंगल, वाळवंट इत्यादींवरच्या साहसी मोहिमा.

३. विनोदपट (कॉमेडी) – प्रसंगाधिष्ठित, शारीर हालचालींवर आधारित, विसंगत व्यक्तिमत्त्वांच्या एकत्र येण्याने सातत्याने होणारी हास्यनिर्मिती.

४. गुन्हेगारीपट-टोळीपट (क्राइम-गँगस्टर) – गुन्हा घडणे आणि गुन्हेगाराचा शोध हे आशयसूत्र धरून गुन्हा सिद्ध होणे, गुन्हेगारांना शिक्षा होणे, त्यांचा नायनाट करणे, बदला घेणे इत्यादी उपप्रकार हाताळले जातात.

५. नाट्यपट (ड्रामा) – ही सगळ्यांत जास्त वापरली जाणारी विधा आहे. संविधानकाला धरून मांडणी करताना जीवनव्यवहारांना धरून येणारी सविस्तर व्यक्तिचित्रणे, त्यांचे नातेसंबंध-आंतरक्रिया, घडणाऱ्या बऱ्यावाईट घटना यांना किंवा चरित्रकथनाला महत्त्व दिलेले असते. वातावरण बरेचसे वास्तवदर्शी असते. विशेष परिणामासाठी (स्पेशल इफेक्ट) तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित असतो.

६. ऐतिहासिक/भव्य चित्रपट (एपिक) – यामध्ये ऐतिहासिक, पौराणिक घटना किंवा व्यक्तिरेखा कथेच्या केंद्रस्थानी असतात. स्थलकालाचा विस्तार मोठा असतो. निर्मिती भव्य स्वरूपाची आणि चित्रपटांची लांबीही बहुतांश वेळा मोठी असते.

७. युद्धपट – ऐतिहासिक युद्ध, काल्पनिक देशांमधील युद्ध किंवा युद्धाची योग्यायोग्यता हे आशयसूत्र केंद्रस्थानी असते. कथाविस्तारात युद्धाचे सविस्तर चित्रण वापरलेले असते.

८. भयपट – यामध्ये आशयसूत्र कोणतेही असले, तरी प्रेक्षकांवर भीतीचा मनोकायिक परिणाम घडविण्यासाठी विशिष्ट कथनशैली, वातावरणनिर्मिती आणि चित्रपटीय तंत्रे वापरलेली असतात.

९. संगीतिका – बहुतांश वेळा मुख्य पात्रांपैकी काही पात्रे गायन, वादन, नृत्य यांत पारंगत असतात. त्यांच्या जीवनातील नाट्य रोचकपणे दर्शविण्यासाठी, कथा-विस्तारासाठी गायन, वादन, नृत्य यांना महत्त्वाचे आणि मुबलक स्थान दिलेले असते.

१०. पाश्चात्त्य-हॉलिवुडमधील विधा – जगभर पसरलेली, अजूनही जिवंत असलेली खूप जुनी विधा. यामध्ये धूळभरली अन्यायग्रस्त गावे, भव्य आसमंत, चांगल्या-वाइटाचा संघर्ष (मूळ विधेत काउबॉइज-अमेरिकन इंडियन्स यांच्यातला संघर्ष), नव्या भूभागाचा-साधनसंपत्तीचा शोध इत्यादी आशय असतो.

विशिष्ट विधांमधे सातत्याने निर्मिती होताना पात्रांचे, घटनांचे, वृत्तिप्रवृत्तींचे साचेही तयार होत जातात. (उदा., जुन्या हिंदी चित्रपटांतील डाकू, मराठी तमाशापटातील गावचा पाटील इ.)

बहुतांश चित्रपट हे दोन किंवा अधिक विधांचे मिश्रण असतात. विधा ही तशी सुस्पष्ट, साचेबंद संकल्पना नाही. मोठ्या संख्येने निर्माण होणाऱ्या चित्रपटांच्या वर्गीकरणासाठी योजलेले ते एक साधन आहे.

समीक्षक – अभिजित देशपांडे


उत्तर लिहिले · 8/1/2021
कर्म · 14895
1




📣 ब्रेकिंग न्यूज, आता WhatsApp वर मिळणार न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!  

🆓 अगदी विनामूल्य..  

💁 त्यासाठी तुम्हाला 'फिल्मी ढाबा - डिजिटल न्यूजपेपर' जॉईन करावे लागेल.  

🤝 ‘फिल्मी ढाबा ' जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👇


https://surveyheart.com/form/5fcc0aac98633a2342814097



उत्तर लिहिले · 6/12/2020
कर्म · 40
4
बॉलिवूडची सध्याची लोकप्रिय अभिनेत्री कोण, असा प्रश्न एका सर्वेक्षणात विचारला गेला आरि आतापर्यंत कॅटरिनाचे नाव ऐकायची सवय झालेल्या कानांना हे नाव ऐकून धक्काच बसला.हे नाव आहे दीपिका😍पादुकोण. 
उत्तर लिहिले · 21/11/2020
कर्म · 5145
2
माधुरी दीक्षित (मे १५, इ.स. १९६७ - हयात) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्री आहे. माधुरीने इ.स. १९८० च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि इ.स. १९९० च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून आपले स्थान पक्के केले. व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेल्या बऱ्याच चित्रपटांत तिने काम केले. त्यांत तिच्या अभिनयाची व नृत्यकौशल्याची खूप वाहवा झाली. इ.स. २००८ मध्ये भारत सरकारतर्फे तिला भारताचा चौथा महत्त्वाचा नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षित
जन्म
१५ मे, १९६७ (वय: ५३)
मुंबई
राष्ट्रीयत्व
भारतीय
कार्यक्षेत्र
अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ
इ.स. १९८४ -
भाषा
हिंदी भाषा, इंग्लिश भाषा , मराठी भाषा
पती
श्रीराम नेने
अपत्ये
रयान, अरीण
उत्तर लिहिले · 25/11/2020
कर्म · 2910
7
मराठीतील हेमामालिनी रंजना ⭕
________________________
माहिती  सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________
अभिनेत्री रंजना ही प्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांची कन्या. 23 जुलै रंजना देशमुख उर्फ रंजनाचा जन्मदिन.
http://anilpatilmahitiseva.blogspot.com/2020/07/blog-post_182.html
अतिशय सुंदर, देखनी, गोरी, ऊंच बांधा, गोल चेहरा, खानदानी सौंदर्य , आणि गालवर असणारा मोहक असा तीळ, आणि या सौंदर्या बरोबर, जबरदस्त अश्या अभिनयाची जोड़ अशी ही मर्दानी अभिनेत्री होती. रंजना म्हणजे मराठी सिनेसृष्टिल पडलेल एक देखने स्वप्न होत.
आज जे पस्तीस-चाळीस वर्षाचे आहेत त्यांना रंजना व तिचे चित्रपट नक्कीच आठवत राहतील.
मराठीचित्रपट सृष्टिचा ७०,८० चा काल हा म्हणजे सोनेरी काल होता, खुप कल्पकता, विद्वान, जागरूक, असलेले लेखक,दिग्दर्शक, आणि कलाकार, आणि संगीतकार होते,  त्या कलाकार मधे हीरो कोणी ही असो पन हिरॅाइन रंजना असायचीच.  कारण नृत्य, मुद्राअभिनय, देहबोली, अश्या अनेक असलेल्या गुणाच्या जोरावर तिने त्या वेळ मराठी चित्रपट सृष्टिवर अधिराज्य गाजवले,अशा या गोड अभिनेत्रीचां जन्म गोवर्धन देशमुख व वत्सला देशमुख यांच्या पोटी 23 जुलै १९५५ साली मुंबई येथे झाला, आई वत्सला देशमुख त्या काली मराठी चित्रपटातील एक उत्तम अभिनेत्री, आणि वडील गोवर्धन देशमुख हे गुजराती रंगभूमि वरील  बाल गंधर्व म्हणून प्रसिद्ध होते, आणि हिन्दीतिल सुप्रसिद्ध अभिनेत्रि संध्या ही तिची रंजनाची सख्खी मावशी, म्हणजेच तिची मावशी ही प्रख्यात अभिनेता, दिग्दर्शक व्ही शांताराम यांची पत्नी चित्रपती व्ही.शांताराम हे तिचे काका होत.
________________________
माहिती  सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________
रंजनाचां जन्म आणि शिक्षण परेल येथे झाले . घरामधे वातावरन पूर्ण अभिनय, नृत्य, कथा, पटकथा, दिग्दर्शन, रंगभूमि अशे असल्या मुळे तिच्या ही मनात अभिनय ची उर्मी निर्माण झाली, घरातून अभिनयचे बाल कडू, मिळाले होते पन आपली ओळख स्वत:त निर्माण करायची या एकमेव कारणामुळे तिने इतर फ़िल्म मधे छोटे मोठे रोल केले, पन तिचा दमदार अभिनय पाहुनच शांताराम यानी तिला संध्या हेरोइन असलेल्या चंदनाची चोळी माझ्या अंग अग जाळी या फ़िल्म मधे छोटासा वसंत शिंदे बरोबर रोल दिला.  तिचा तो लहान रोल सुद्धा भाव खाऊन गेला, आणि शांताराम यानी 1975  मधे लगेच पुढच्या फ़िल्म ,झुंज मधे रविन्द्र महाजन यांची हेरोइन म्हणून मुख्य रोल दिला, त्या फ़िल्म मधे एवढे मोठे कलाकार असून ही रंजना ने आपली अभिनयाची छाप पाडली, . विशेष म्हणजे त्या फ़िल्म मधे तिच्या आई ने वत्सला देशमुख यानीच तिच्या आई ची भूमिका सकारली होती, या झुंज मधील एक आदर्श शिक्षिका तिने चांगली च रंगवली आणि तिची मराठी फिल्म सृष्टीने दखल घेतली त्यां नंतर मात्र तिने मागे वळून पहिले नाही, एका पेक्ष्याएक चित्रपट तिने केले. रविंद्र महाजनी बरोबर तिची चांगलीच जोडी जमली.
*🔹 मराठीतील धर्मेन्द्र-हेमामालिनी 🔹*
रविंद्र महाजनी व रंजना या जोडीला त्या काळात मराठीतील धर्मेन्द्र-हेमामालिनी म्हणत असत. असला नवरा नको ग बाई, मुंबईचा फौजदार, एक डाव भुताचा, जख्मी वाघिन, भुजंग, केला इशारा जाता जाता, गुपचुप गुपचुप, गोंधलात गोंधळ, बिन कामाचा नवरा, खिचड़ी, सुशीला, चानि, भालू, बहुरूपी, सासु वर चढ़ जावई, सावित्री, लक्ष्मी, लक्ष्मीची पावले, इथे मराठी च्या नगरी, सगे सोयरे, बायको असावी अशी, देवघर, अरे संसार संसार, हल्दी कुंकु, दैवत, मर्दानी, कश्यला उद्याची बात, हीच काय चुकल, अाली लहर केला क़हर, कुलस्वामीनि अंबाबाई, हे दान कुंकवाचे, ग्यानबाचि मेख, दुनिया करी सलाम, तमासगीर, पाटलीन,हे चित्रपट तिने आपल्या कार्यकिर्दित खुप लोकप्रिय झाले.
रविन्द्र महाजनी, अशोक सराफ, कुलदीप पवार, राजा गोसावी, वसंत शिंदे, नीळु फुले, श्रीराम लागू, सुहास खंडके, नाना पाटेकर, यांचेबरोबर अभिनय केला.वैयक्तिक जीवनाततिची खरी जोड़ी जमली ति अशोक सराफ बरोबर, अशोक सराफ बरोबर तिने गोंधळात गोंधळ, सासु वरचढ जावई हे विनोदी चित्रपट केले.
एखादी गोष्ट जर आपल्याला येत नसेल तर त्यासाठी कितीही मेहनत करण्याची तिची तयारी असायची. एखादी गोष्ट करताना जर ती डावी- उजवी झाली तर तिला आवडायचं नाही. ही गोष्ट मला जमत नाही म्हणजे काय असा सतत प्रश्न ती विचारायची. काहीही झालं तरी मी ती गोष्ट करणारच असा दुर्दम्य आशावाद तिचा असायचा. तिच्या याच स्वभावामुळे तिने आयुष्यात अनेक नवनवीन गोष्टी केल्या. 20 वर्षाच्या काळात अशोक सराफ आणि रंजना यानी खुप एकत्र चित्रपट केले ,ते एक मेकाच्या खुप जवळ आले आणि त्या दोघाच्ंयात प्रेमाचा हळुवार गंध कधी फूलला ते दोघाना ही समजले नाही. पण नियतीला ते मान्य नव्हते.
रंजना १९८७ मध्ये झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बंगलोरला जात होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यांचे दोन्ही पाय लुळे पडले. त्यांचा डावा हातही निकामी झाला. हा अपघात घडला, त्यावेळी मराठी इंडस्ट्रीतील काही कलाकार देखील त्यांच्यासोबत गाडीत होते. पण त्यांना काहीही झाले नाही. हा अपघात घडला त्यावेळी रंजना या केवळ ३२ वर्षांच्या होत्या. रंजना या अपघातानंतर अनेक वर्षं व्हीलचेअरवरच होत्या.
अपघातानंतर त्या अभिनयक्षेत्रापासून दूरच राहिल्या. पण त्यांच्या मृत्यूच्या काही वर्षं आधी त्यांनी फक्त एकदाच या नाटकात काम केले होते. या नाटकातील त्यांची भूमिका ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. व्हील चेअरवर असलेल्या स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो असे त्या नाटकाचे कथानक होते. हे नाटक हे रंजना यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित होते असे म्हटले जाते. या नाटकाला प्रेक्षकांनी तितकासा प्रतिसाद दिला नव्हता.
त्यांनी त्यांच्या आयुष्याची शेवटची १३ वर्षं ही व्हीलचेअरवर काढली. २००० मध्ये परेल येथील त्यांच्या घरी वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांचे हृदय विकाराने निधन झाले.
http://anilpatilmahitiseva.blogspot.com/2020/07/blog-post_182.html

6
भाऊ तुला एका हिरो ची एकटिंग शिकायचे असेल तर तुम्हाला सांगू इच्छितो की त्या व्यक्तीचा हावभाव कसा आहे त्याच वॉलकिंग स्टाईल कस आहे डायलॉग कसा बोलतो तुम्ही नवरस च सराव करा ते खालीलप्रमाणे :-

मराठी साहित्यातील नवरस पुढील प्रमाने

१) शृंगार - (शृंग - कामवासना ) स्त्रीपुरुषांना एकमेका़ंबद्दल वाटणार्या प्रेमातून , आकर्षणातून या रसाचा उगम होतो.

उदा:- या कातरवेळी पाहिजेस तू जवळी.

यासारखे चरण ऐकताना जी वैषयिक भावना जानवतात त्याला शृंगाररस म्हणतात.

२) वीर - उत्साही हा या रसाचा स्थायीभाव , पराक्रम , शौर्य , धीरोदात्त, प्रसंग यांच्या वर्णना़तून हा रस निर्मान होतो.

उदा:- जिंकू किंवा मरु, भारतभूच्या शत्रूसंगे युध्द आमुचे सुरु.

यासारखी समरगीते व पोवाडे ह्यांत हा वीररस पाहावयास मिळतो.

३) करूण- शोक किंवा दुःख , वियोग , संकट यांतून हा रस निर्माण होतो.

उदा:- हे कोण बोलले बोला ? राजहसं माझा निजला.

यांसारख्या हदयद्रावक , इष्टहानी व अनिष्टापत्तीमुळे मनाला ,दुःख देणारा व सहदयाच्या मनात अनुकंपा , कणव , शोक उत्पन्न करणारा रस म्हणजे करुणरस होतो.

४) हास्य- विसंगती , असंबध्द भाषण, व्यंगदर्शन , विडंबन, चेष्टा , यांच्या वर्णातुन हा रस निर्माण होतो.

उदा:- उपास मज लागला , सखेबाई, अपास मज लागला.

यांसारख्या कवितांंतून किंवा सुदाम्याचे पोहे, चिमणरावाचे चर्हाट, गुदगुल्या यांसारख्या विनोद लेखनातून व नाटकांतून हा रस आढळतो.

५) रौद्र - अतिशय क्रोध वा चीड या भावनेतून हा रस निर्माण होतो.

उदा:- पाड सिंहासने दुष्ट ती पालथी

ओढ हत्तीवरुनि मत नप खालली

मुकुट रंकासि दे, करटि भूपाप्रती

झाड खट् खट् तुझे खड् ग रुद्रा.

६) भयानक - भीती या भावनेतून हा रस निर्माण होतो. युध्द , सूड , राक्षस, स्मशान इत्यादींंच्या वर्णानांतून हा रस आढळतो.

भीति कथा, रहस्यकथांतील खून व सूड यांची वर्णने , युध्दकथा यातून हा रस आढळतो.

७) बीभत्स- किळस, वीट, तिटकारा वर्णन करणाय्रा कवितांतून वा वर्णातून हा रस आढळतो .

उदा:- ही बोटे चघळीत काय बसले - हे राम रे- लाळ ही ।

८) अदभुत - विस्मय हा या रसाचा स्थायीभाव , पर्यांच्या कथा , अरेबियन नाइटस, अलिबाबा व चाळीस चोर , यांसारख्या आश्र्चर्यकारक गोष्टींच्या वर्णानांतून हा रस आढळतो.

उदा:- आटपाट नगरात दुधाचे तळे

तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे

नगरातले लोक सारेच वेडे…

९) शांत - परमेश्वरविषयक भक्ती , सत्पुरुषांची संगती , देवालय वा आश्रम यांच्या परिसरातील वातावरण यांच्या वर्णनात हा रस आढळतो .

उदा. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला.


धन्यवाद
उत्तर लिहिले · 23/7/2020
कर्म · 16930