बॉलीवूड अभिनेत्री चित्रपट

माधुरी दिक्षित कोण आहे?

4 उत्तरे
4 answers

माधुरी दिक्षित कोण आहे?

2
माधुरी दीक्षित (मे १५, इ.स. १९६७ - हयात) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्री आहे. माधुरीने इ.स. १९८० च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि इ.स. १९९० च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून आपले स्थान पक्के केले. व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेल्या बऱ्याच चित्रपटांत तिने काम केले. त्यांत तिच्या अभिनयाची व नृत्यकौशल्याची खूप वाहवा झाली. इ.स. २००८ मध्ये भारत सरकारतर्फे तिला भारताचा चौथा महत्त्वाचा नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षित
जन्म
१५ मे, १९६७ (वय: ५३)
मुंबई
राष्ट्रीयत्व
भारतीय
कार्यक्षेत्र
अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ
इ.स. १९८४ -
भाषा
हिंदी भाषा, इंग्लिश भाषा , मराठी भाषा
पती
श्रीराम नेने
अपत्ये
रयान, अरीण
उत्तर लिहिले · 25/11/2020
कर्म · 2910
1
माधुरी दिक्षित ला न ओळख नारे लोक भारतात खुप कमी आहेत.माधुरी ही उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तेजाब, हम आपके है कौन,राम लखण,साजन अशा असंख्य सुपरहिट चित्रपटांमधे तीने काम केले आहे.
उत्तर लिहिले · 18/10/2020
कर्म · 18365
0
माधुरी दीक्षित एक लोकप्रिय भारतीय अभिनेत्री आहे, ज्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांच्या कामासाठी ओळखल्या जातात. त्यांनी 1984 मध्ये 'अबोध' चित्रपटातून पदार्पण केले आणि त्या 'तेजाब', 'दिल', 'हम आपके हैं कौन!', 'दिल तो पागल है' आणि 'देवदास' यांसारख्या अनेक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये झळकल्या.

माधुरी दीक्षित यांच्याबद्दल काही माहिती:

  • जन्म: १५ मे १९६७ (वय ५६ वर्षे)
  • जन्मस्थान: मुंबई, महाराष्ट्र, भारत
  • व्यवसाय: अभिनेत्री, नृत्यांगना, निर्माती
  • राष्ट्रीयत्व: भारतीय
  • वैवाहिक स्थिती: विवाहित (श्रीराम माधव नेने)
  • प्रसिद्ध चित्रपट: 'तेजाब', 'दिल', 'हम आपके हैं कौन!', 'दिल तो पागल है', 'देवदास'

माधुरी दीक्षित यांनी अनेक पुरस्कार जिंकले आहेत, ज्यात सहा फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांना भारत सरकारद्वारे 2008 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 210

Related Questions

चित्रपट भाषेची पातळी लिहा?
चित्रपटाचे दृश्य निर्माण करणाऱ्या यंत्राचा परिचय करून घ्या?
चित्रपटाचे दृश्य निर्माण करणारे यंत्र कोणते आहे हे स्पष्ट करा?
चित्रपट आणि यंत्र परिचय?
चित्रपट दृश्य निर्माण करणार्‍या यंत्राची माहिती?
चित्रपटाचे दृश्य यंत्राचा परिचय करून द्या?
चित्रपटाचे दृश्य निर्माण करणार्‍या यंत्राचा परिचय करून द्या?