अभिनेता
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
Answer link
सापेक्ष आर्द्रता ही एक टक्केवारी आहे जी दिलेल्या तापमानात हवेतील पाण्याच्या बाष्पाचे प्रमाण दर्शवते आणि त्याच तापमानावरील पाण्याच्या वाफेच्या जास्तीत जास्त संभाव्य प्रमाणाच्या तुलनेत. उदाहरणार्थ, 25 टक्के सापेक्ष आर्द्रता म्हणजे हवा तिच्या संभाव्य पाण्याच्या वाफ क्षमतेच्या एक चतुर्थांश आहे.
2
Answer link
७० आणि ८० चे दशक गाजवणारा एक महान अभिनेता म्हणजे, दादा कोंडके. "दादा कोंडके" हे नाव माहीत नाही असा कुणी मराठी माणुस नसेल.द्विअर्थी संवाद आणि विनोद ही त्यांच्या चित्रपटांची खासियत होती. यावरून त्यांच्यावर टीकाही झाली. पण दादा कोंडके यांच्या सिनेमांचा एक विशिष्ट प्रेक्षकवर्ग होता. या प्रेक्षकवर्गाने दादा कोंडके यांच्या चित्रपटावर प्रचंड प्रेम केले.
दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटसृष्टीवर अनेक वर्षं राज्य केले. त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ ला मुंबईत झाला. दादा कोंडके यांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट असल्याने त्यांचे बालपण खूपच हलाखीत गेले. नायगावच्या मराठी कामगार वस्तीमध्ये ते लहानाचे मोठे झाले. उदरनिर्वाहासाठी दादांनी अपना बाजार येथे नोकरी देखील केली आहे. ते लहानपणापासून नायगाव परिसरात खूपच प्रसिद्ध होते. त्यांना बँडवाले दादा असेच म्हटले जात असे.
दादा कोंडके यांनी सेवा दलाच्या बँड पथकामध्ये देखील काम केले आहे. त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात काम केले होते. त्यानंतर ते नाटकांमध्ये काम करू लागले. त्यानंतर त्यांनी दादा कोंडके आणि पार्टी असे पथकही काढले. त्याचवेळी त्यांची वसंत सबनीसांसोबत ओळख झाली. त्या दोघांची त्यावेळी चांगली मैत्री झाली आणि त्यांनी पुढे जाऊन स्वतःची नाटक कंपनी काढली. त्यानंतर विच्छा माझी पुरी करा हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आणले. हे नाटक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या नाटकाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यामुळे दादा कोंडके यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर यायला लागल्या. त्यांनी भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
दादा कोंडके यांनी उषा चव्हाण यांना ब्रेक दिला होता.‘सोंगाड्या’ या चित्रपटासाठी त्यांना अभिनेत्रीची गरज होती. त्यावेळी सातारा बसस्थानका जवळ दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांची पहिली भेट झाली होती. तेव्हा दादांनी उषा यांची निवड केली आणि त्यांना पहिला ब्रेक मिळाला.सोंगाड्या हा त्यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाने त्यांना मराठी चित्रपटसृष्टीत एक ओळख मिळवून दिली.दादा कोंडकेची ओळख म्हणजे त्याची ती ढगळ चड्डी होती. देखण्या हिरोंच्या जमान्यात एक लांब नाडी बाहेर आलेला चड्डी घालणारा सिनेमाचा हिरो कसा होऊ शकतो? झालाच तर त्याचे सलग ९ सिनेमे सुपरहिट होतात हे सगळ तेव्हा एक सरप्राईजचं होतं. दादा कोंडकेनी फिल्म इंडस्ट्रीचे व्हाईट कॉलर मानसिकतेवाले सगळे नियम धुडकावून आपलं अढळ असं स्थान निर्माण केलं होतं.नंतर त्यांनी राम राम गंगाराम, बोटं लावीन तिथे गुदगुल्या, पांडू हवालदार, आंधळा मारतो डोळा यांसारखे एकाहून एक हिट चित्रपट दिले. चित्रपटातील त्यांच्या डबल मीनिंग कॉमेडीला प्रेक्षकांची खास पसंती मिळत होती. एक वेळ असा होता दादा कोंडकेंचे ९ चित्रपट जवळपास २५ आठवडे चित्रपटगृहात सुरु होते. या रेकॉर्डची गिनीज बुकमध्येही नोंद करण्यात आली आहे.दादांच्या चित्रपटांची नावं अशी असायची की, सेन्साॉर बोर्डला चित्रपटाला संमती देण्यासाठी अक्षरश: नाकीनऊ यायची. पण तरीही दुहेरी अर्थ असणाऱ्या चित्रपटाच्या टायटलला सेन्सॉर बोर्ड अनेक प्रयत्न करुनही बॅन करु शकलं नाही.मराठी भाषेवरील मजबूत पकड, शब्दांचे सामर्थ्य, हजरजबाबीपणा आणि फ्री स्टाईल अभिनय हि त्यांची खासियत होती. विषय कोणताही असो, तो आपल्याला हवा तसाच वळवायचा आणि बिनदिक्कतपणे समोरच्याला पटवूनही द्यायचा ही त्यांची खास हातोटी. द्वयर्थी विनोदांचा वापर त्यांनी नक्कीच केला, पण त्याचा इतका चपखल वापर करण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकले नाही.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,‘आये’ हा शब्द तर जणू दादांचा कॉपीराईटच.द्वयर्थी विनोद पलीकडे जावून अगदी मेंढरू, कुत्रा बैल असे प्राणी व भाजीपाला, झाडे यावरील नितांत सुंदर रचना सहजतेने उतरल्या.मराठी मातीची नस दादांना अचूक सापडली होती म्हणूनच त्यांचे सर्वच चित्रपट सुपरहीट ठरले.. ग्रामीण जीवन आणि सर्वसामान्य व्यक्तिरेखा हा त्यांच्या चित्रपटाचा बाज. शहरी जीवन, त्यातून आलेला बकालपणा, ग्रामीण जनतेची शिक्षित वर्गाकडून होणारी कुचंबणा हे त्यांच्या चित्रपटाचे विषय असत.मराठीत निर्मिती केलेल्या सर्वच चित्रपटात सबकुछ दादाच असत. अभिनयापासून ते दिग्दर्शनापर्यंत सर्वच कामे ते स्वत: करत. मात्र, त्यांचा मोठेपणा असा की, सर्व कामे स्वत: करूनही त्याचे श्रेय ते एकटे कधीच घेत नसत. तर सोबतच्या मंडळींना त्याचे श्रेय ते देत असत.
http://bit.ly/3rMpAu6
यशवंतराव चव्हाण, पुलं देशपांडे, बाळासाहेब ठाकरे, प्र. के. अत्रे यांच्यासारखे दिग्गज त्यांच्या अभिनयाचे चाहते होते.
१९७३-७४चा तो काळ. त्या काळात मराठी माणूस चित्रपट सृष्टीत असला तरीही, त्यावर अधिकाराज्य होते ते हिंदी भाषकांचेच. त्यामुळे मराठी माणसाचे बॅनरवाले चित्रपट वगळता इतरांचे चित्रपट थिएटरला लावायला थिएटर मालकांचा नकार असे. त्यात ‘सोंगाड्या’ हा दादांचा पहिलाच चित्रपट. दादांना चित्रपट प्रदर्शित करण्याचा ना अनुभव होता ना त्यांच्याकडे पैसा होता. त्यामुळे ‘कोहिनूर’ चित्रपटगृहाच्या मालकाने दादांचा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला. त्यावेळी ‘तिन देवियां’ हा चित्रपट ‘कोहिनूर’ला लागला होता.दादांचा पहिलाच चित्रपट प्रदर्शनासाठी थिएटर न मिळाल्यामुळे रखडतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. दरम्यान, मुंबईत शिवसेनेचा बोलबाला वाढत होता. दादांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. मराठी माणसाचा चित्रपट प्रदर्शित करायला थिएटरमालक नकार देतो. ही गोष्ट बाळासाहेबांना खटकली. बाळासाहेबांनी आदेश दिला आणि दादांचा चित्रपट झळकला. तेव्हापासून दादांनी अखेरपर्यंत मागे वळून कधीच पाहिले नाही. दिवसेदिवस दादांच्या यशाची कमान चढतीच राहिली. मराठी रसिकांनी दादांवर भरभरून प्रेम केले.बाळासाहेबांच्या आदेशाने ‘सोंगाड्या’ ‘कोहिनूर’ला झळकला त्या दिवसापासून दादा, शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाते घट्ट झाले. इतके की, बाळासाहेब जेव्हा नाराज असत तेव्हा त्यांच्या खोलीत एकाच माणसाला प्रवेश असे, ते म्हणजे दादा कोंडके. बाळासाहेबांनीही दादांची मैत्री अखेरपर्यंत सांभाळली. इतकी की दादांचे निधन झाल्यावर बऱ्याच वर्षांनी शिवतिर्थावर अखेरचे भाषण करतानाही बाळासाहेबांनी दादा कोंडके यांची आठवण काढली होती.आपल्या चित्रपटांतून भाषणांतून दादांनी अनेक नेत्यांची खिल्ली उडवली. अगदी यशवंतराव चव्हाणांपासून ते शंकरराव चव्हाण, शरद पवार यांच्यापर्यंत.दादा अनेकदा शिवसेना उमेदवारांच्या प्रचारालाही जात. दादा तेथे आपल्या भाषणात डबल मिनींग बोलायचे. अगदी डबल मिनींग बोलून राजकीय नेत्यांचीही खिल्ली उडवायचे. अशा भाषणांनी दादांचे शत्रूही अनेक झाले होते. त्यामुळे दादांवर कोणीतरी हल्ला करेन असा विचार त्यांचे काही मित्र व्यक्त करायचे. तेव्हा दादांना घरापर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसैनिकांचा एक ताफाच दादांच्या दिमतीला असायचा.
दादांनी मराठीत एकूण १६ चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्यमोहोत्सवी ठरले. या विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. त्यांनी हिंदीत सुद्धा ४ चित्रपटांची निर्मिती केली.
दादा कोंडके यांचे लग्न झालेले होते. तसेच त्यांना तेजस्विनी नावाची मुलगी देखील होती. पण जनमानसांत ते अविवाहित म्हणूनच वावरत असत.दादांनी ‘एकटा जीव’ नावाचे पुस्तक लिहिले.(लेखिका अनिता पाध्ये) या पुस्तकात उषा चव्हाण यांच्यासह अनेक कालावंतांबद्दल बरेच काही बरेवाईट लिहिले गेले. खुद्द दादांना हे पुस्तक प्रकाशित करायचे नव्हते परंतु त्यांच्या मृत्यूनंतर हे पुस्तक प्रकाशित झाले. यानंतर या पुस्तकावर प्रचंड वाद झाला अखेर पुस्तकावर लगेचच बंदी घातली गेली.
मराठीतील या महान अभिनेत्याचे १४ मार्च १९९८ साली निधन झाले."एकटा जिव" या आत्मचरित्राच्या शेवटच्या पानावरील दादांचे शब्द प्रत्येक कलाकार आणि जीवंत व्यक्तीने वाचावे असे आहे.".आज एवढा पैसा, प्रॉपर्टी मिळवून काय उपयोग आहे ? कुणासाठी मी हे सर्व कमावलं आहे ? माझं दुःख, एकटेपण मी सहसा कुणाला जाणवू देत नाही. त्यामुळे मी एकटा मजेत जगतो अशी बऱ्याच जणांची समजूत आहे. एकटेपणाच्या बदल्यात देवाने मला पैसा, प्रसिद्धी, यश भरपूर दिलं. सर्वांनाच आयुष्यात मनासारख्या गोष्टी मिळत नाहीत अशी मी स्वतःचीच समजूत घालत असतो.
पुढल्या जन्मी देवाने मला पैसा, यश, प्रसिद्धी, काहीही दिलं नाही तरी चालेल, पण एकटेपण देऊ नये. माझी म्हणता येतील अशी माणसं द्यावीत हीच माझी इच्छा आहे."
अनिल पाटील,पेठवडगाव
9890875498http://bit.ly/3rMpAu6
9
Answer link
समीर गायकवाड हा पुणे जिल्ह्यातील वाघोलीतील एक समज माध्यमांवर चित्रफिती टाकणारा कलाकार होता.
तो फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब अशा अँपवर चित्रफिती टाकून लोकांचे मनोरंजन करायचा बघा. यातूनच त्याला काही पैसेही मिळायचे.
दोन दिवसांपूर्वी त्याने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.
समाजमाध्यमांच्या व्यसनी लागल्याने अशा घटना घडतात. अशा लोकांच्या काही चित्रफिती कमी वेळात सर्वत्र पसरतात, मग त्यांना आपण मोठे सेलेब्रिटी झाल्याचे वाटते. मात्र ही झगमग काही काळाचीच असते. काही दिवसातच लोक तुमच्याकडे पाठ फिरवतात आणि त्यातून नैराश्य पदरी पडून लोक असे पाऊले उचलतात.
म्हणून सांगतो मित्रांनो समाजमाध्यमांना डोक्यावर घेऊ नका, आणि आपला वेळ सत्कारणी लावा.