औषधे आणि आरोग्य
शेती
खते व बी बियाणे
औषधशास्त्र
कीटक नाश
घेवडा लावणीपासून ते तोडणी करेपर्यंत पूर्ण माहिती द्या खते,औषध फवारणी व कोणती औषधे कोणती वापरावी?
1 उत्तर
1
answers
घेवडा लावणीपासून ते तोडणी करेपर्यंत पूर्ण माहिती द्या खते,औषध फवारणी व कोणती औषधे कोणती वापरावी?
1
Answer link
घेवडा लागवडीसाठी हलकी, मध्यम निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी हेक्टरी पुरेसे शेणखत मिसळावे. लागवडीसाठी फुले सुयश, कन्टेडर या जाती निवडाव्यात. लागवड जून, जुलै आणि जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत करावी. लागवड करताना सपाट वाफ्यात लागवड करताना 60 x 30 सें.मी. आणि सरी वरंबा पद्धतीने लागवड करताना 45 x 30 सें.मी. अंतराने लागवड करावी. लागवडीसाठी हेक्टरी 40 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाण्यास 15 ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धक प्रति 10 किलो बियाण्यास चोळावे. लागवडीपूर्वी पिकाला 25 किलो नत्र, 110 किलो स्फुरद आणि 110 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने 25 किलो नत्र प्रति हेक्टरी देऊन भर लावावी. साधारणपणे 110 दिवसांत पीक तयार होते.
लागवड
खरीप हंगामात पिकाची पेरणी पाभरीने अथवा तिफणीने पहिला पाऊस पडून गेल्यावर, जमिन वाफश्यावर आल्यावर करावी. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर 45 सेमी आणि दोन झाडातील अंतर 30 सेमी ठेवावे. यानंतर विरळणी करून दोन झाडात 30 सेमी अंतर ठेवावे.बिया टोकन पध्दतीने 2 ते 3 सेमी खोलीवर पेराव्यात. उन्हाळी हंगामात बियांची पेरणी 60 ते 70 सेमी अंतरावर सरी वरंब्यावर करावी. वरंब्याच्या दोन्ही बाजूला बगलेत 30 सेंटीमीटर अंतरावर 2 ते 3 बिया टोकाव्यात.
खते व पाणी व्यवस्थापन
सर्वसाधारणपणे हेक्टरी 720 किलो बियाण्याचे आणि 630 किलो पाल्याचे उत्पादन देणा-या घेवडयाचे पीक जमिनीतून 66 किलो नत्र 27 किलो स्फूरद आणि 55 किलो पालाश शोषून घेते. यावरून घेवडयाच्या पिकाला जमिनीतून लागणा-या मुख्य अन्नघटकाची आवश्यकता लक्षात येते. निरनिराळया प्रयोगावरून घेवडयाच्या पिकाला शेणखत आणि रासायनिक खतांच्या पुढील मात्रांची शिफारस करण्यात आली आहे.
घेवडयाच्या पिकाला 40 टन शेणखत, 50 ते 54 किलो नत्र 50 ते 100 किलो स्फुरद आणि 50 ते 110 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. स्फूद आणि पालाश पूर्ण आणि अर्धा नत्र पेरणीच्या वेळी द्यावा आणि उरलेला अर्धा नत्र बी उगवल्यानंतर तीन ते चार आठवडयांनी द्यावा.
घेवडयाच्या पिकाची मुळे जमिनीत उथळ वाढत असल्यामुळे पिकाला जास्त पाणी दिल्यास ते मुळांना अपायकारक ठरते. मात्र फूलो-याच्या वेळी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास फळधारणा कमी प्रमाणात होते. म्हणून घेवडयाच्या पिकाला फूले येण्याआधी पाणी द्यावे. तसेच पावसाळयात जमिनितील पाण्याचा निचरा होणे आवश्यक असते. खरीप हंगामातील घेवडयाच्या पिकाला पाणी देण्यात आवश्यकता भासत नाही. परंतू पाऊस नसल्यास पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे. उन्हाळी हंगामातील पिकाला 8 ते 10 दिवसांच्या अंतराने आणि जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळया द्याव्यात.
आंतरमशागत
खरीप हंगामात पिकाची पेरणी केल्यानंतर 15 दिवसांनी विरळणी करावी. खरीप हंगामात तणांचा योग्य वेळी बंदोबस्त करणे आवश्यक आहे. 1 ते 2 खुरपण्या देऊन तण काढावे किंवा पेरणीपूर्वी तणनाशकाची फवारणी करावी. खरीप हंगामात जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास आणि योग्य प्रमाणात पाण्याचा निचरा न झाल्यास चर खोदून पाणी शेताबाहेर काढून द्यावे.