Topic icon

खते व बी बियाणे

3
उदा. जर तुम्हाला DAP(18.46) ची निवळी करावयाची असेल तर प्रथमतः फवारणीसाठीचे प्रमाण माहीत करून घ्या म्हणजे 200लिटर पाण्यासाठी 3 किलो जे कृषी अधिकारी, तज्ञ असतील त्यांच्याकडून माहिती घ्या. त्यानंतर  त्याप्रमाणात म्हणजे 3 किलो DAP बादलीत  घ्या.  त्यात  साधारणपणे निम्मे बादलीभर पाणी घ्या आणि रात्रभर  किंवा 2 ते 4 तास रासायनिक खतानुसार (विचारून घ्यावे) ठेवावे. त्यानंतर ते खत साधारणपणे विरघळले व तयार झालेली निवळी  गाळून घ्यावी व फवारणी करावी.
उत्तर लिहिले · 25/3/2022
कर्म · 11745
1
शेणखत
शेणखत हे पारंपारिक सेंद्रिय खत असून शेतकऱ्यांना ते शेतातच उपलब्ध होऊ शकते. जनावरांच्या गोठ्यातील शेणामध्ये जनावरांचे मूत्र आणि अर्धवट खाऊन टाकलेल्या चाऱ्यांचे अवशेषही असतात. गोठ्याच्या कडेला माती टाकून त्यात जनावरांचे मूत्र शोषून घेता येते. ती माती जर शेणखताच्या खड्ड्यात शेणाबरोबर टाकली, तर त्यामुळे शेणखताची प्रत सुधारते. सर्वसाधारणपणे चांगल्या कुजलेल्या शेणखतात ०.४ टक्के नत्र, ०.१५ टक्के स्फूरद आणि ०.५० टक्के पालाश असते, आपल्या देशातील उष्ण व दमट हवामानाच्या परिस्थितीत जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन वेगाने होऊन सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी होते जाते. त्यामुळे जमिनीची सुपिकता टिकवून पिकांचे भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी शेणखतासारख्या सेंद्रिय वरखताचा वापर करणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 20/3/2022
कर्म · 121725
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
2
हिरवळीचे खते
हिरवळीचे खते:
हिरवळीच्या खताचे फायदे :-
हिरवळीच्या खतांचे प्रकार -
हिरवळीचे खत तयार करण्याच्या पध्दती -
हिरवळीच्या खतांची पिके :-
सेंद्रिय पध्दतीने शेती करण्याच्या शेतक-यांचे हिरवळीच्या खतांचे प्रयोग :-
हिरवळीची खते सेंद्रिय पदार्थ तसेच पिकांच्या अन्नद्रव्यांचा जमिनीतील साठा वाढावा यासाठी हिरवे पिक जमिनीत गाडण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. अशा प्रक्रियेतून तयार झालेल्या खतांना हिरवळीचे खत वा बिवड म्हणतात. पावसाळ्यातील पहिल्या पावसात हिरवळीच्या खताचे बी पेरले जाते, व तयार झालेले पिक जमिनीत गाडले जाते. बरयाचदा करंज, भेंड, अंजन व ग्लीरीसिदिया या वनस्पतीची पानेही जमिनीत गाडली जातात. हिरवळीचे खत तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी पिके/वनस्पती व त्यातील नत्राचे प्रमाण : पिकाचे नाव नत्राचे शेकडा प्रमाण ताग (भोरू) ०.४६ चवळी ०.४२ गवार ०.४९ सुर्यफुल ०.४५ हरभरा ०.५० सोयाबीन ०.७१ उडीद ०.४७ मटकी ०.३५ लसून घास ०.७३ करंज २.६१ अंजन १.४२ ऐन २.०४ भेंड २.९० गिरिपुष्प २.७४

हिरवळीचे खत तयार करताना घ्यावयाची काळजी : पिक लवकर भरपूर वाढणारे असावे. पिक रसरशीत व तंतूचे असावे ज्यायोग्य ते लवकर कुजते. पिक कोणत्याही जमिनीत वाढणारे व शक्यतो शेंगाकुलीतील असावे. पिकामुळे जमिनीवर वाईट परिणाम होऊ नये. पिक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी ते जमिनीत गाडावे. पिकला सिंचनाची सुविधा असावी, म्हणजे पिक साधण्यास मदत होते.

हिरवळीचे खते:
हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती ,झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरुन आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरुन वाढलेली पिके फुलो-यावर आली म्हणजे शेतात नांगरून ती गाडून एकजीव करणे या वनस्पतींच्या हिरव्या व कोवळ्या अवशेषांपासून तयार झालेल्या खतास "हिरवळीचे खत "असे म्हणतात.
हिरवळीच्या खताचे फायदे :-
• ही ळते जवळजवळ प्रति हेक्टरी ५० -१७५ किलो नत्राचे योगदान करते .
• फार मोठ्या प्रमाणात जमिनीत कर्बाचे प्रमाण वाढवते .
• मातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवणयाची क्षमता वाढवते .
• मातीत फायदेशीर सुक्ष्म जीवाणूंच्या निर्मितीचे प्रमाण वाढवते
• मातीच्या भौतिक रासायनिक व जैविक पोतावर किंवा वातावरणात कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही.
• सर्वसाधारपणे शेंगवर्गीय पिकांपासून बनलेले १ टन हिरवळीचे खत २.८ ते ३ .० टन शेणखताच्या बरोबर असते .
या खतांच्या आच्छादनाने जमिनीची धुप होत नाही .
हिरवळीच्या खतांचे प्रकार -
हिरवळीच्या खतांचे दोन प्रकार आहेत .
१) शेतात लगवड करून घेण्यात येणारी हिरवळीची खते :- जेव्हा हिरवळीच्या खतांचे पीक शेतात सलग ,मिश्न किंवा एखाद्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून पेरतात व त्याच शेतात ते पीक फुलो-यावर येण्यापूर्वी शेतात नागंरून मिसळतात ,तेव्हा त्याला शेतातच घेण्यात येणारे हिरवळीचे खत असे म्हणतात .या प्रकारच्या हिरवळीच्या खतामध्ये ताग, गवार ,चवळी ,धैचा ,मूग ,मटकी ,मेथी ,लाख ,मसूर ,वाटाणा ,उडीद ,कुळीथ,सेंजी,शेवरी ,लसुरघास ,बरसीम या पिकांचा समावेश असतो.

२) हिरव्या कोवळ्या पानांचे हिरवळीचे खत :- पडीक जमिनीवर अथवा जंगलात वाढणा-या वनस्पतीची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात गाडणे अथवा पडीक जमिनीवर किंवा शेताच्या बांधावर हिरवळीच्या झाडांची लगवड करून त्याचा पाला आणि कोवळ्या फांद्या शेतात पसरवून नांगरणीच्या अथवा चिखलणीच्या वेळी मातीत मिसळणे होय .हिरवळीच्या खतासाठी गिरिपुष्प , शेवरी ,करंज ,सुबाभुळ ,टाकळा,कर्णिया,ऎन ,किंजळ यांची झाडे व झुडपे पडीक जमिनीत वाढ्वून त्यांच्या हिरव्या पानाण्चा व कोवळ्या फांद्याचा हिरवळीच्या खतासाठी वापर करतात .
हिरवळीचे खत तयार करण्याच्या पध्दती -
१) निरनिराळ्या हंगामातील पिकांचे हिरवळीचे खत करण्याच्या वेळी हिरवळीचे पीक फुलो-यावर आलेले असावे .ही पिके ६ ते ८ आठवड्यात फुलो-यावर येतात .ही पिके ज्या शेतात घेतली असतील त्याचे खत तयार करावे .या हिरवळीच्या पिकांची पाने बाहेरून आणतात ती जमिनीवर पसरवून नांगरामागे टाकून गाडावीत .ट्रायकोडरमा चा उपयोग केल्यास ह्या खताची प्रत वाढविता येईल .
२) नुकत्याच फूलो-यात आलेले हिरवळीच्या पिकांची जमिनीलगत कापणी करावी . कापलेले हिरवळीचे पीक शेतात लोखंडी नागंराने तास घेउन नागंराच्या प्रत्येक सरीमध्ये उपलब्ध प्रमाणात टाकावे .नंतर नागंराच्या दुस-या तासाच्या वेळी अन्यथा धानाच्या चिखलणीच्या वेळी संपूर्ण गाडले जाईल याची काळजी घ्यावी .हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरुन फळी किंवा मैद फिरवावा .त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय पदार्थ पूर्णपणॆ झाकले अथवा दाबले जाऊन ते कुजण्याची क्रिया वेगाने सुरु हाते.
३) हिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा लागतो म्हणून सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून अथवा पावसाच्या सुरवातीस करुन आँगस्टमध्ये गाडणी करावी . हिरवळीचे पीक गाडण्याच्या वेळी जर पाऊस पडला नाही किंवा जमिनीलगत ओलावा कमी असेल तर पाणी द्यावे .त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होईल .
४) शेतात उपलब्ध काडी कचरा व गवत ह्यांचे ढिग शेतात जागोजागी करुन कुजण्यास ठेवावे व योग्यवेळी जमिनीत गाडावे कुजण्याची प्रक्रिया लवकर होण्यास ३ .५ फुट x ३.५ फुट खड्डयात गवत व काडी कचरा कुजवता येईल .
५) कपाशीच्या रांगामध्ये तूणधान्य ,शेगवर्गीय व तेलवर्गीय पीक घेऊन ह्या पिकांच्या कापणी नंतर कपाशीच्या रांगामध्ये जमिनीत पुरावे ,उत्तम हिरवळ खत म्हणून कपाशीवर ह्याचा परिणाम दिसून येतॊ . सोयाबिन ,तूर व ज्वारी सोबत पेरून ,सोयाबीन हिरवळखत म्हणून वापरता येईल ;ज्वारी व तूर ह्यांचे उत्पादनात वाढ होईल .
हिरवळीच्या खतांची पिके :-
१) ताग / बोरु - ताग हे हिरवळिचे उत्तम खत आहे .ज्या विभागात पुरेसा पाऊस अथवा सिंचनाच्या पाण्याची हमी असते तेथे तागाचे पीक घेण्यात यावे .सर्व प्रकारच्या जमिनीत या खताची वाढ चांगली होत असली तरी आम्लधर्मिय जमिनीत या पीकांची वाढ जोमाने होत नाही .तसेच पाणी साचून राहणा-या शेतात तागाची चांगली वाढ होत नाही .पावसाळ्याच्या सुरूवातीस तागाचे बी हेक्टरी ५० ते ६० किलो पेरावे .पेरणीनंतर ५ ते ६ आठवड्यांनी हे पीक फुलो-यावर येण्याच्या सुमारास ६० ते ७० से .मी .उंच वाढली असतांना नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडून टाकावे .तागामध्ये नत्राचे प्रमाण ०.४६ टक्के असून या पिकापासून हेक्टरी ८० ते ९० किलो नत्र मिळते .
२) धैचा - तागापेक्षा काटक असे हिरवळीचे हे पीक असून कमी ,पर्जन्यमान ,पाणथळ िकाण ,क्षारमय अथवा आम्लधर्मीय जमिनीत सुध्द हे पिक तग धरु शकते .या वनस्पतीच्या मुळांवर तसेच खोडावरही गाठी दिसून येतात या गाठीमध्ये रायझोबियम जीवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात .
या पिकांच्या लगवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० किलो बियोणे पावसाळ्याच्या सुरूवातीस शेतात पेरावे . बियाण्याची उगवण लवकर होण्यासाठी त्यास गंधकाची प्रक्रिय करून परत थंड पाण्याने धुवावे आणि त्यानंतर रायझॊबियम जीवाणू संवर्धनाची प्रक्रिय बियाण्यास करावी .पिकाच्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करून पीक ६ ते ७ आठवड्यात ९० ते १०० से .मी .उंचीपर्यत वाढले असता जमिनीत नांगराने गाडून टाकावे .या काळात धैच्यापासून १० ते २० टनापर्यत हिरव्या सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते .या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण ०.४६ ट्क्के इतके आहे .भाताची लावणी करण्यापूर्वी आठ दिवस पीक जमिनीत गाडल्यास हेक्टरी ८० किलो नत्राची उपलब्धता होऊ शकते .
३) घेवडा :- हे पीक कमी पर्जन्यमान व हलक्या प्रतीच्या जमिनीत चांगले वाढते .पाणथळ जमीनीस हे पीक योग्य नाही .पावसाळ्याच्या सुरूवातील प्रती हेक्टरी ५० किलो बियोण पेरावे .नतर आँगस्टच्या दुस-या आठवड्यात ते जमिनीत गाडावे .
४) सेंजी :- रब्बी हंगामासाठी हे उपयुक्त हिरवळीचे खत आहे . सिचनाची सोय असलेल्या ठिकाणी हेक्टरी ३०त े ४० किलो बियाण्याचा वापर करून पेरणी करावी .जानेवारीच्या अखेरीस जमिनीत गाडण्यास ते योग्य होते.उसाच्या पिकास ते योग्य हिरवळीचे खत आहे .
५) द्विदल कडधान्याची पिके :- पावसाळ्याच्या सुरुवातीस शेत तयार करून मूग ,चवळी ,उडीद ,कुळी्थ ,गवार ,यांचे बियाणे शेतात पेरले असता या द्विदल वर्गीय पिकांचा हिरवळीच्या खतासाी चांगला उपयोग होतो जमिनीची पुर्व मशागत केल्यावर मूग ,उडीद ,कुळीथ यासाठी २५ ते ३० कि .ग्रँ . प्रति हेक्टरी बियाणे पेरावे पेरणीपुर्वी बियाण्यास राय़झॊबियम जीवाणु चोळूण आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात .पीक फुलो-यावर येण्यापुर्वी नांगरणी करून जमिनीत गाडले असता यापासून प्रति हेक्टरी ५० ते ६० कि .ग्रँ .नत्र पिकास उपल्ब्ध होतो.
६) गिरीपुष्प (ग्लिरिसिडिया) - झुडुप वर्गातील हे हिरवळीचे खत कोणत्याही प्रकारच्या जमिनीत तसेच निरनिराळ्या पर्जन्यामानाच्या प्रदेशात चांगले येते .या झाडाची लगवड दोन प्रकारे करतात .पहिल्या पध्दतीत छाट कलमाद्वारे लागवड करण्यासाठी ३० से .मी . लांब ३ सेमी .व्यासाची दोन छाट कलमे निवडून पावसाळ्याच्या सुरुवातीस ३० x३० x ३० सेमी .आकाराचा खड्डा करून बाधावर अथवा पडीक जमिनीत लगवड करावी .दुस-या
पध्दतीत गादी वाफे तयार करून अथवा प्लँस्टिकच्या पिशवीत बी पेरून रोपे तयार करावे .ही रोपे ५ आठवड्यांची झाल्यावर पावसाच्या सुरूवातीस शेताच्या बांधावर खड्डे खोदून लावावीत .पहिल्या वर्षी उन्हाळ्यात रोपांना पाणी देणे आवश्यक असून दुस-या वर्षापासून पुढे प्रत्येक छाटणीला २५ ते ३० किलो हिरवा चारा मिळू शकतो .या झाडाच्या फांद्याची वरचे वर छाटणी करूनही या झाडांना नवीन फूट येते आणि त्यांच्या हिरव्या पालवीपासून हिरवळीचे उत्तम खत मिळते .
गिरीपुष्पाची पाने धैचा .मेंड व वनझाडाचा पालापाचोला यापेक्षा जलद कुजतात .गिरीपुष्पाच्या पानांम्ध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते .सेंद्रिय कर्ब ३६ टक्के ,नत्र २. ७० टक्के ,स्फूरद ०. ५ टक्के व पालाश १ .१५ टक्के आहे म्हणून नत्रयुक्त खतांच्या खर्चात बचत करण्यासाठी गिरीपुष्प हिरवळीच्या खतांचा मोठा सहभाग आहे .
सेंद्रिय पध्दतीने शेती करण्याच्या शेतक-यांचे हिरवळीच्या खतांचे प्रयोग :-
काही सेंद्रिय शेतक-यानी हिरवळीच्या खतांचे अनेक प्रयोग पीक उत्पादनातील वाढ अनुभवली आहे . जागेवरच हिरवळीच्या खतांची लगवड करण्याच्या प्रयोगात तीन फुट अंतरावर कापूस किंवा तुराची पेरणी करून पिकात मूग , उडीद ,अशी अल्प मुदतीची पिके घेऊन त्यामुळे निर्माण होणा-या हिरवळीचा फायदा मुख्य पिकाला होतो . पाँण्डेचरीमधील आँरव्हिले या गावी मिश्न बियाणे पेरुन २५ ते ३० दिवासांनी जागेवरच गाडून त्यापासून खत व आच्छादन म्हणून वापर केला जातो .काही शेतकरी पिकांच्या दोन ओळींमध्ये एकदल ,द्विद्ल तेलबिय ताग ,धने इत्यादी सर्व प्रकारचे बी एकत्र मिसळून एकरी १० कि .ग्रँ .या प्रमाणात फेकून मातीने झाकतात पेरणीनंतर ३० दिवसांनी मुख्य पीक स्वच्छ ठेवून नंतर अ‍ॅरोग्रीन पेरावे व ते मूळ पिकापेक्षा उंच होऊ लागले की जागेवरच पाडावे .अशाप्रकारे १० किलो बियाण्यांपासून ४ ते ५ टन हिरवळीचे खत मिळते .या हिरवळीच्या खताचे पूथ:करण केले असता त्यापासून एकरी ४० किलो नत्र उपलब्ध होतो शिवाय यासाठी लागणारा खर्चही कमी असून आपल्या शेतात अधिकधिक जैविक विविधता निर्माण करून पिकांना आवश्यक असणा-या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविता येते.
स्तोत्र :विकासपिडिया 
 
उत्तर लिहिले · 25/3/2021
कर्म · 495
2
कंपोष्ट खत तयार करणे ही एक जिवशास्त्रीय प्रक्रिया असून तिच्यामध्ये न कुजलेली सेंद्रिय पदार्थाचे सूक्षम जिवाण मार्फत विघटन होते आणि कार्बन-नायट्रोजन यांचे गुणोत्तर कमी होते. अशा विघटन झालेल्या सेंद्रिय पदार्थांना कंपोष्ट खत असे म्हणतात.
उत्तर लिहिले · 22/3/2021
कर्म · 55
3
22/09/2020...

कृषी सल्या नुसार आपण संपूर्ण माहिती घ्यावी

■ प्रमुख विद्राव्य खते ■

★ १९:१९:१९, २०:२०:२०  या खतांना स्टार्टरग्रेड म्हणतात. यात नत्र अमाईड, अमोनिकल व नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो. या खताचा उपयोग प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो.
   
★ १२:६१:० ः या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात. यात अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो. यात पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे अधिक प्रमाण असते. नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढ, फुलांची योग्य वाढ आणि पुनरुत्पादनासाठी या खतांचा उपयोग होतो.

★  ०:५२:३८ ः या खतास मोनो पोेटॅशियम फॉस्फेट म्हणतात. यात स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये भरपूर आहेत. फुले लागण्यापुर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेसाठी तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते.

★    १३:०:४५ ः या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात. यात नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण जास्त असते. फुलोऱ्या नंतरच्या अवस्थेत आणि पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते. अन्न निर्मिती व त्याच्या वाहनासाठी हे खत उपयोगी आहे. या खतामुळे अवर्षण स्थितीत पिके तग धरू शकतात.
 
★  ०:०:५० ः१८ ः या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात. पालाश बरोबरच या खतांमध्ये उपलब्ध स्वरुपातील गंधकही असतो. पक्वतेच्या हे खत उपयोगी पडते. हे खत फवारले असता भुरी सारख्या रोगाचे नियंत्रण होऊ शकते. या खतामुळे पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते.
 

★  १३:४०:१३ ः कपाशीला पात्या, फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फूलगळ थांबून कपाशीची बोंडे वा अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते.
    कॅल्शियम नायट्रेट : मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरवातीच्या काळात ठोंबे किंवा शेंगा वाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.
  
★ २४:२८:० ः यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे. शाकीय वाढीच्या तसेच फूलधारणा अवस्थेत त्याचा वापर करता येतो.


■ ​फर्टिगेशनचे फायदे ■

    मजूर, यंत्रसामग्री, इंधन, वीज, पाणी व खतांची बचत होते.
    पिकाच्या गरजेनुसार योग्य ते अन्नद्रव्य ठराविक प्रमाणात योग्य वेळी देता येते.
    विद्राव्य द्रवरूप खते बहुतांशी आम्लधर्मीय असून क्षारभार कमी असणारी, सोडियम व क्लोरीन मुक्त असल्याने जमिनीच्या पाण्याचा व खतांचा कार्यक्षमतेने वापर झाल्याने जमिनीची सुपीकता टिकते, उत्पादनात चांगली वाढ होते.
    विद्राव्य खते ठिबक सिंचनामुळे पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात दिल्यामुळे त्यांचे शोषण कार्यक्षमरीत्या होते.
    पिकांची वाढ जोमाने होते, रोगास बळी पडत नाही, साहजिकच बुरशीनाशकावरील खर्च कमी होतो.
    पिकाच्या वाढीनुसार खते देता येतात. खतांची कार्यक्षमता वाढल्याने उत्पादनात वाढ होते.
    खते विभागून जमीन, पिकाच्या व हवामानातील बदलानुसार देता येतात.
    विद्राव्य खते ठिबक सिंचन आणि फवारणीद्वारे देता येतात.

■ विद्राव्य खतांची फवारणी ■

    पाण्यात विद्राव्य खतांचा वापर फवारणीसाठी करता येतो. साधारणत: पानांत असलेल्या अन्नद्रव्यांच्या पातळीवर पिकांची उत्पादन क्षमता ठरते. योग्य उत्पादनासाठी पानांतील अन्नद्रव्याची ही पातळी पुरेशी असणे आवश्यक असते. त्यासाठी संतुलित प्रमाणात ही अन्नद्रव्ये पीकवाढीच्या निरनिराळ्या वाढीच्या अवस्थेच्या गरजेनुसार मिळणे गरजेचे आहे.
    शिफारशीत मात्रेत फवारणीमुळे पिकांची जोमदार वाढ होऊन फळांचे वजन, आकार व प्रतीमध्ये चांगली वाढ होते. साठवणुकीत तसेच निर्यातक्षम उत्पादन राहिल्याने उत्पन्नातही वाढ होते.
    विद्राव्य खते घन व द्रवरूप स्वरूपात उपलब्ध असून त्यांची वाहतूक, साठवणूक आणि वापर सोयीचा आहे.
■ फवारणीतून विद्राव्य खते देण्याचा उद्देश ■

    पिकांना उदिप्त करून त्यांची उत्पादन प्रक्रिया वाढविण्याकरिता वाढीच्या निरनिराळ्या अवस्थेत फवारणी केली असता उत्पादनात वाढ होते.
    अतिवृष्टीमुळे किंवा सतत पाऊसमानामुळे जमिनीतील खते वाहून जातात. तसेच पाणी साचल्यामुळे मुळे कार्यरत नसतात. अशा वेळी काही वेळ पाऊस थांबला असता फवारणी मधून खते दिल्यास ती पिकांना ताबडतोब उपलब्ध होतात.
    जमिनीतील पाण्याची कमतरता किंवा कडक उन्हाळा अशा परिस्थितीत फवारणीद्वारे सायंकाळी खते दिल्यास पाने टवटवीत होऊन कार्यरत राहतात. पिके अवर्षण स्थितीत तग धरू शकतात.
    किडी-रोगांमुळे पाने कुरतडली, खाल्ली जातात. पानांची जाळी होते. अशा वेळी फवारणीतून खते दिली असता नवीन पालवी फुटून पिके कार्यरत होऊ शकतात.
    फवारणीतून दिलेली खते जमिनीतून दिलेल्या खतांना पर्यायी होऊ शकत नाहीत. परंतु अचानक निर्माण झालेल्या पानातील पोषण द्रव्यांची कमतरता भरून काढतात.
    फुलोऱ्यात, मोहोर येण्याच्या वेळी, फलधारणा, त्यानंतर फळांची वाढ होण्यसाठी जेव्हा अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात लागातात अशावेळी फवारणीद्वारे दिलेली खते उपयोगी पडतात. त्यामुळे उत्पादनात वाढ होते.
फवारणीसाठी द्रावण तयार करताना घ्यावयाची काळजी 

    पाण्यामध्ये खत विरघळवावे. खत पूर्णपणे विरघळेपर्यंत पाणी ढवळत राहावे.
    कॅल्शियम जास्त असलेल्या पाण्यात थोडे गरम पाणी किंवा आम्लयुक्त पाण्याचा वापर करावा. अशा कॅल्शियमयुक्त पाण्यात कीटकनाशके, बुरशीनाशके, खते वापरण्याचे टाळावे.
    बोर्डो किंवा लाईम मिक्चर साठवलेल्या डब्यात द्रावण तयार करू नये.
    फवारणी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४ ते ६.३० या वेळेत करावी.
फळबागेमध्ये विद्राव्य खते वापरण्याचे फायदे

    तीन ते चार वर्षे वयाच्या झाडांना वर्षभरात दोन वेळा (डिसेंबर-जानेवारी किंवा मे-जून) त्यांच्या वयानुसार (१० ते ४० किलो) तर त्यापेक्षा जास्त वयाच्या झाडांना वर्षात एकदा बहारानुसार ५० किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत प्रति झाड द्यावे. तसेच एक किलो निंबोळी पेंड प्रति झाड दरवर्षी फळ बागेस देण्यात यावी.
    ठिबक सिंचनाद्वारे दर दिवशी गरजेपुरतेच पाणी दिले जाईल अशी व्यवस्था करावी, अति पाण्याचा वापर टाळावा.
    खताचा वापर ठिबक सिंचन पद्धतीमधून केल्याने त्याची कार्यक्षमता ८० ते ९० टक्के मिळते. त्यामुळे फळ पिकाचे अधिक उत्पादन आणि गुणवत्ताही वाढते.
    ब­ऱ्याच वेळा अन्नद्रव्यांची फळपिकांसाठी उपलब्धता ही जमिनीचे तापमान, ओलावा, हवामानातील बदल, सामू, चुनखडीचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब इत्यादी बाबींवर अवलंबून असते.
उत्तर लिहिले · 22/9/2020
कर्म · 14865