पिके खते व बी बियाणे शेतकरी

वेगवेगळी खते व त्यांचे उपयोग काय?

1 उत्तर
1 answers

वेगवेगळी खते व त्यांचे उपयोग काय?

3
22/09/2020...

कृषी सल्या नुसार आपण संपूर्ण माहिती घ्यावी

■ प्रमुख विद्राव्य खते ■

★ १९:१९:१९, २०:२०:२०  या खतांना स्टार्टरग्रेड म्हणतात. यात नत्र अमाईड, अमोनिकल व नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो. या खताचा उपयोग प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो.
   
★ १२:६१:० ः या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात. यात अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो. यात पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे अधिक प्रमाण असते. नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढ, फुलांची योग्य वाढ आणि पुनरुत्पादनासाठी या खतांचा उपयोग होतो.

★  ०:५२:३८ ः या खतास मोनो पोेटॅशियम फॉस्फेट म्हणतात. यात स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये भरपूर आहेत. फुले लागण्यापुर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेसाठी तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते.

★    १३:०:४५ ः या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात. यात नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण जास्त असते. फुलोऱ्या नंतरच्या अवस्थेत आणि पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते. अन्न निर्मिती व त्याच्या वाहनासाठी हे खत उपयोगी आहे. या खतामुळे अवर्षण स्थितीत पिके तग धरू शकतात.
 
★  ०:०:५० ः१८ ः या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात. पालाश बरोबरच या खतांमध्ये उपलब्ध स्वरुपातील गंधकही असतो. पक्वतेच्या हे खत उपयोगी पडते. हे खत फवारले असता भुरी सारख्या रोगाचे नियंत्रण होऊ शकते. या खतामुळे पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते.
 

★  १३:४०:१३ ः कपाशीला पात्या, फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फूलगळ थांबून कपाशीची बोंडे वा अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते.
    कॅल्शियम नायट्रेट : मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरवातीच्या काळात ठोंबे किंवा शेंगा वाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.
  
★ २४:२८:० ः यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे. शाकीय वाढीच्या तसेच फूलधारणा अवस्थेत त्याचा वापर करता येतो.


■ ​फर्टिगेशनचे फायदे ■

    मजूर, यंत्रसामग्री, इंधन, वीज, पाणी व खतांची बचत होते.
    पिकाच्या गरजेनुसार योग्य ते अन्नद्रव्य ठराविक प्रमाणात योग्य वेळी देता येते.
    विद्राव्य द्रवरूप खते बहुतांशी आम्लधर्मीय असून क्षारभार कमी असणारी, सोडियम व क्लोरीन मुक्त असल्याने जमिनीच्या पाण्याचा व खतांचा कार्यक्षमतेने वापर झाल्याने जमिनीची सुपीकता टिकते, उत्पादनात चांगली वाढ होते.
    विद्राव्य खते ठिबक सिंचनामुळे पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात दिल्यामुळे त्यांचे शोषण कार्यक्षमरीत्या होते.
    पिकांची वाढ जोमाने होते, रोगास बळी पडत नाही, साहजिकच बुरशीनाशकावरील खर्च कमी होतो.
    पिकाच्या वाढीनुसार खते देता येतात. खतांची कार्यक्षमता वाढल्याने उत्पादनात वाढ होते.
    खते विभागून जमीन, पिकाच्या व हवामानातील बदलानुसार देता येतात.
    विद्राव्य खते ठिबक सिंचन आणि फवारणीद्वारे देता येतात.

■ विद्राव्य खतांची फवारणी ■

    पाण्यात विद्राव्य खतांचा वापर फवारणीसाठी करता येतो. साधारणत: पानांत असलेल्या अन्नद्रव्यांच्या पातळीवर पिकांची उत्पादन क्षमता ठरते. योग्य उत्पादनासाठी पानांतील अन्नद्रव्याची ही पातळी पुरेशी असणे आवश्यक असते. त्यासाठी संतुलित प्रमाणात ही अन्नद्रव्ये पीकवाढीच्या निरनिराळ्या वाढीच्या अवस्थेच्या गरजेनुसार मिळणे गरजेचे आहे.
    शिफारशीत मात्रेत फवारणीमुळे पिकांची जोमदार वाढ होऊन फळांचे वजन, आकार व प्रतीमध्ये चांगली वाढ होते. साठवणुकीत तसेच निर्यातक्षम उत्पादन राहिल्याने उत्पन्नातही वाढ होते.
    विद्राव्य खते घन व द्रवरूप स्वरूपात उपलब्ध असून त्यांची वाहतूक, साठवणूक आणि वापर सोयीचा आहे.
■ फवारणीतून विद्राव्य खते देण्याचा उद्देश ■

    पिकांना उदिप्त करून त्यांची उत्पादन प्रक्रिया वाढविण्याकरिता वाढीच्या निरनिराळ्या अवस्थेत फवारणी केली असता उत्पादनात वाढ होते.
    अतिवृष्टीमुळे किंवा सतत पाऊसमानामुळे जमिनीतील खते वाहून जातात. तसेच पाणी साचल्यामुळे मुळे कार्यरत नसतात. अशा वेळी काही वेळ पाऊस थांबला असता फवारणी मधून खते दिल्यास ती पिकांना ताबडतोब उपलब्ध होतात.
    जमिनीतील पाण्याची कमतरता किंवा कडक उन्हाळा अशा परिस्थितीत फवारणीद्वारे सायंकाळी खते दिल्यास पाने टवटवीत होऊन कार्यरत राहतात. पिके अवर्षण स्थितीत तग धरू शकतात.
    किडी-रोगांमुळे पाने कुरतडली, खाल्ली जातात. पानांची जाळी होते. अशा वेळी फवारणीतून खते दिली असता नवीन पालवी फुटून पिके कार्यरत होऊ शकतात.
    फवारणीतून दिलेली खते जमिनीतून दिलेल्या खतांना पर्यायी होऊ शकत नाहीत. परंतु अचानक निर्माण झालेल्या पानातील पोषण द्रव्यांची कमतरता भरून काढतात.
    फुलोऱ्यात, मोहोर येण्याच्या वेळी, फलधारणा, त्यानंतर फळांची वाढ होण्यसाठी जेव्हा अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात लागातात अशावेळी फवारणीद्वारे दिलेली खते उपयोगी पडतात. त्यामुळे उत्पादनात वाढ होते.
फवारणीसाठी द्रावण तयार करताना घ्यावयाची काळजी 

    पाण्यामध्ये खत विरघळवावे. खत पूर्णपणे विरघळेपर्यंत पाणी ढवळत राहावे.
    कॅल्शियम जास्त असलेल्या पाण्यात थोडे गरम पाणी किंवा आम्लयुक्त पाण्याचा वापर करावा. अशा कॅल्शियमयुक्त पाण्यात कीटकनाशके, बुरशीनाशके, खते वापरण्याचे टाळावे.
    बोर्डो किंवा लाईम मिक्चर साठवलेल्या डब्यात द्रावण तयार करू नये.
    फवारणी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४ ते ६.३० या वेळेत करावी.
फळबागेमध्ये विद्राव्य खते वापरण्याचे फायदे

    तीन ते चार वर्षे वयाच्या झाडांना वर्षभरात दोन वेळा (डिसेंबर-जानेवारी किंवा मे-जून) त्यांच्या वयानुसार (१० ते ४० किलो) तर त्यापेक्षा जास्त वयाच्या झाडांना वर्षात एकदा बहारानुसार ५० किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत प्रति झाड द्यावे. तसेच एक किलो निंबोळी पेंड प्रति झाड दरवर्षी फळ बागेस देण्यात यावी.
    ठिबक सिंचनाद्वारे दर दिवशी गरजेपुरतेच पाणी दिले जाईल अशी व्यवस्था करावी, अति पाण्याचा वापर टाळावा.
    खताचा वापर ठिबक सिंचन पद्धतीमधून केल्याने त्याची कार्यक्षमता ८० ते ९० टक्के मिळते. त्यामुळे फळ पिकाचे अधिक उत्पादन आणि गुणवत्ताही वाढते.
    ब­ऱ्याच वेळा अन्नद्रव्यांची फळपिकांसाठी उपलब्धता ही जमिनीचे तापमान, ओलावा, हवामानातील बदल, सामू, चुनखडीचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब इत्यादी बाबींवर अवलंबून असते.
उत्तर लिहिले · 22/9/2020
कर्म · 14865

Related Questions

शेतकरी गटाचे योजना काय आहे?
देवस्थान ईनाम वर्ग ३ शेतजमीन एखादा शेतकरी ६० वर्षाहुन अधिक काळ कसत असताना देवस्थान ट्रस्ट कडून जर त्या शेतकर्‍यास अचानक तेथे शेतीकरण्यास मनाई होत असल्यास शेतकर्‍याने काय करणे योगय राहिल?
शेतकरी स्वत: सरकारला थेट संपर्क करण्यासाठी सध्याच्या काळात कोणता मार्ग मोकळा नाही, मग काय करावे?
पत्रकार परीषद एक ग्रामीण शेतकरी कशी घेऊ शकतो पद्धत व संपुर्ण प्रक्रिया कशी करावी?
खरीप पिक म्हणजे काय? खरीप पिकाचे प्रकार कोणते आहे?
भारतातील आद्य शेतकरी याविषयी माहिती मिळेल का?
मला माझ्या शेतात विहीर खोदायची आहे, पण क्षेत्र सामायिक आहे आणि इतर शेतकरी सहमती देत नाहीत काय करता येईल?