1 उत्तर
1
answers
भारतातील आद्य शेतकरी याविषयी माहिती मिळेल का?
1
Answer link
भारतातील आद्य शेतकरी – इसवी सनापूर्वी ८००० या कालावधीच्या सुमारास भारतीय उपखंडामध्ये स्थिर वसाहती अस्तित्वात आल्या. त्या काळी हडप्पासारख्या काही वसाहती बऱ्याच विकसित झाल्या. या विकसित गाव-वसाहतींमधील जे शेतकरी विकसित झाले ते भारतीय उपखंडातील आद्य शेतकरी होय.
हे शेतकरी गहू, बाली इत्यादी पिकांचे उत्पन्न घेत असे. शेती करण्यासाठी बैल,गाय,मेंढ्या इत्यादी पशूंचे पालन पोषण करत असत. त्या वेळी आद्य शेतकरी राहण्यासाठी मातीची घरे बांधूनत्यामध्ये राहायचे. याच काळामध्ये शेतीच्या तंत्रज्ञानात सुधारणा झाली. तसेच हत्यारे बनवण्याच्या तंत्रज्ञानात ही बरीच प्रगती झाली.
शेतीची सुरुवात – इसवी सनापूर्व १०००० ते ८००० या दरम्यान नवाश्मयुगाच्या सुरुवातीच्या काळात शेती करण्यास सुरुवात झाली. नैसर्गिक रित्या उगवलेल्या धान्याची कापणी करतच मानव स्वतः धान्याची पेरणी करू लागला.
या वेळी गह, जवस, बार्ली यांसारख्या पिकांचे उत्पन्न घेतले जाऊ लागले. मानव शेती करण्यासाठी पशुंचाही उपयोग करू लागला आणि चांगल्या सुधारित पद्धतीने शेतीची कामे करू लागला.