शेतकरी

शेतकरी गटाचे योजना काय आहे?

1 उत्तर
1 answers

शेतकरी गटाचे योजना काय आहे?

0



गट शेती योजना काय आहे

 आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशातील जास्तीत जास्त लोक हे शेती ह्या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या देशातील केंद्र तसेच राज्य सरकार हे देशातील नागरिकांसाठी अनेक शासकीय योजना राबवित असतात. अशा योजना पैकी एक योजना राबवण्यात येते ती म्हणजे गट शेती योजना होय. सण २०२२ पर्यंत देशातील सर्व शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्या हस्ते अनेक महत्वपूर्ण अशा योजना आणि नवनवीन उपक्रम हे राबविण्यात येत आहे. आजच्या या लेखा मध्ये आपण गट शेती योजना बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

गट शेती योजना काय आहे? फायदे अनुदान | 

शेतकरी बांधवांनी गट शेती करून स्वतःचा विकास करता यावा व तसेच शेतकरी बांधवांना शेतीवर लागणारा लागत खर्च कमी व्हावा या दृष्टीने गट शेती सर्व शेतकरी बांधवांना फायद्याची कश्या प्रकारे ठरू शकते हे सर्व शेतकरी बांधवांनी समजून घेऊन गट शेती केली पाहिजे. म्हणूनच शेतकरी बांधवांच्या गट शेतीस चालना देण्यासाठी सरकारने गट शेती ला 24 जुलै 2017 नुसार मान्यता दिलेली आहे.

 


गट शेती म्हणजे काय
गट शेती म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन स्वतः न कसता अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येणे आणि एकत्र आल्या नंतर शेती शिवारातील संलग्न भौगोलिक क्षेत्रामध्ये सामूहिक रित्या शेती करणे म्हणजे यालाच गट शेती असे म्हटले जाते.
शेतकरी गटयोजने

 मध्ये सर्व शेतकरी एकत्र येऊन विपणन करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने सामूहिक स्वरूपाची व्यवस्था निर्माण करतात, आणि या सर्व बाबींच्या माध्यमांतून आपल्या सर्व शेतकरी बांधवांचा म्हणजेच गट समूहाचा विकास साध्य करून सर्व शेतकऱ्यांची समूहाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करणे म्हणजे गटशेती होय.

 

आपल्या देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासनातर्फे अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे, तसेच गट शेती च्या माध्यमातून सामूहिक रित्या शेती करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल यासाठी गट शेती ला प्रोत्साहन हे देण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष शासनाने वर्ष २०२२ पर्यंत करण्याचे ठरविले आहे आणि त्याच साठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. आणि याच अनुषंगाने शासन तर्फे पथदर्शी योजना ही आखण्यात आलेली आहेत.

 

शेतकरी गट योजनेची अंमलबजावणी कश्या प्रकारे करावी:-
महाराष्ट्र राज्यात गट शेती योजना अंतर्गत शेती करण्यासाठी ज्यांना गट शेती करायची आहे त्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणी करावी व गट स्थापन करण्यात यावा. अथवा कंपनी कायदा 1956 च्या तरतुदी अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून शेतकरी गटाची नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे.

गट शेती योजना अनुदान:-
 

 वरील सर्व गोष्टी पूर्ण करून तुम्ही गट नोंदणी केल्या नंतर या गट शेती योजना अंतर्गत गटा साठी दोन वर्षांत या गटास जास्तीत जास्त एक कोटी रुपयांचे अनुदान हे शासनातर्फे देण्यात येणार आहेत.

 

आणि या गट शेती योजना चा लाभ देण्यासाठी 200 इतक्या नोंदणीकृत शेतकरी गटांना समूहांना या गट शेती योजना चां लाभ देण्यासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.

 

 

या गट शेती योजना च्या माध्यमातून तुमच्या भागातील शेती पद्धती व शेतीचा प्रकल्प हा विचारात घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर गटशेती कशी करायची या साठी गट शेती करण्याचे एक मॉडेल हे तयार करण्यात येईल.

 

या गट शेती च्या माध्यमातून शेतकरी समूहाला शेती व्यवसाय सोबतच शेती पूरक व्यवसाय तसेच विपणन या सर्व बाबींचे महत्व समजावे तसेच शेतकऱ्यांनी याचा अवलंब करावा या उद्देशाने पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग व रेशीम उद्योग आदी विभागांच्या देखील आदर्श नमुना प्रकल्पाचा सुद्धा समावेश ह्या गट शेती योजना च्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

 

तसेच या गट शेती योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना सर्वच शेती संबंधित जसे, शेती चे काम करण्यासाठी लागणारी विविध प्रकारची अवजारे, यंत्रे इत्यादी चा समावेश हा करण्यात येणार आहे.

 

जर या योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी संख्या १०० एकराच्या पटीमध्ये जर वाढवली तर शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान देखील शासनातर्फे वाढविण्यात येणार आहेत. जर वरील प्रमाणे शेतकऱ्यांची संख्या वाढविली तर प्रत्येकी 100 एकरांसाठी १ कोटी रुपये इतक्या रुपयाचे अनुदान वाढ करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची संख्या वाढविणे इतकेच जमीन चे म्हणजेच एकराचे प्रमाण देखील वाढवणे महत्वाचे असणार आहे.

 

या योजनेचा लाभ हा जास्तीत जास्त शेतकरी लाभार्थ्यांनी घ्यावा तसेच शेतकरी गटांनी चांगली कामगिरी करून या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेऊन स्वतःचा विकास साधावा या साठी जे शेतकरी उत्कृष्ट कामगिरी करतील अशा शेतकरी गटांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या मध्ये प्रथम येणाऱ्या शेतकरी गटास २५ लाख रुपये अनुदान तर द्वितीय येणाऱ्या गटास १५ लाख रुपये अनुदान तसेच जो गट तृतीय येईल त्या गटास ५ लाख रुपये इतके पारितोषिक हे शासनातर्फे देण्यात येणार आहेत.
उत्तर लिहिले · 15/2/2023
कर्म · 48465

Related Questions

देवस्थान ईनाम वर्ग ३ शेतजमीन एखादा शेतकरी ६० वर्षाहुन अधिक काळ कसत असताना देवस्थान ट्रस्ट कडून जर त्या शेतकर्‍यास अचानक तेथे शेतीकरण्यास मनाई होत असल्यास शेतकर्‍याने काय करणे योगय राहिल?
शेतकरी स्वत: सरकारला थेट संपर्क करण्यासाठी सध्याच्या काळात कोणता मार्ग मोकळा नाही, मग काय करावे?
पत्रकार परीषद एक ग्रामीण शेतकरी कशी घेऊ शकतो पद्धत व संपुर्ण प्रक्रिया कशी करावी?
खरीप पिक म्हणजे काय? खरीप पिकाचे प्रकार कोणते आहे?
भारतातील आद्य शेतकरी याविषयी माहिती मिळेल का?
मला माझ्या शेतात विहीर खोदायची आहे, पण क्षेत्र सामायिक आहे आणि इतर शेतकरी सहमती देत नाहीत काय करता येईल?
मी एक शेतकरी आहे, कधी-कधी असं वाटतं की आत्महत्या करावी, खूप शेतीत नुकसान होतं. तुम्हीच सांगा आत्महत्या करावी का नाही करावा?