संशोधन व्यसन तंबाखू

तंबाखू चा शोध कसा लागला ?

1 उत्तर
1 answers

तंबाखू चा शोध कसा लागला ?

4
तंबाखू, तमाकू आणि टोबॅको या नावांचे मूळ कॅरेबियन बेटांवर आहे असे मानले जाते. कोलंबस आणि त्याचे खलाशी इ.स. १४९२ मध्ये कॅरेबिअन बेटांवर उतरले. त्या काळात कॅरेबियन स्थानिक लोक तंबाखू वापरताना त्यांना आढळले. ते विस्तवावर तंबाखूची पाने टाकून, त्यांचा धूर नळीतून ते नाकाने ओढत. या नळीला ते ‘टाबाको’ म्हणत. त्यावरूनच पुढे तंबाखूची सर्व नावे प्रचलित झाली असावीत असे मानले जाते.
                            फ्रान्सचा पोर्तुगालमधील राजदूत जॉं निको (Jean Nicot) याने इ.स. १५६० मध्ये एका बेल्जियन व्यापाऱ्याकडून तंबाखू विकत घेतली. हा तंबाखू त्याने फ्रान्सच्या राणीला भेट दिला. वनस्पतींच्या ज्या वंशातूनतंबाखू उद्भवतो त्याला, याच जॉं निकोच्या स्मरणार्थ, ‘निकोटिआना’ असे नाव दिले गेले.  
                           तंबाखू भारतात उगवणारी एक वनस्पती आहे. हिची पाने वाळवून, कुस्करून त्याला चुना मळतात. याचा वापर लोक खाण्यासाठी करतात. त्याच चुन्यापासून गुटखा बनवतात. वाळलेल्या अखंड पानापासून विडी बनवितात. तंबाखू हा पदार्थ नशादायक आहे. विडी, सिगरेट, सिगार, चिरूट, हुक्का, गुटखा, तपकीर, हिरड्यांना लावण्याची मशेरी, चुन्याबरोबर मिसळून, पानात घालून आणि अशा नानाविध स्वरूपात हा पदार्थ वापरला जातो. तंबाखू एक नगदी पीक आहे. तंबाखूच्या वापराने कर्करोग होतो.

उत्तर लिहिले · 23/4/2020
कर्म · 1510

Related Questions

मोबाईल चे व्यसन?
राजाला कोणते व्यसन असू नये?
मोबाईल चे वेड लागले आहे काय करू?
शेती नाही पण कटलरी, स्टेशनरी शॉपी आहे. दिसायला देखील बरा आहे , 3 खोल्यांचे स्वतः चे घर आहे, व्यसनही करत नाही पण तरीही लग्न होईना काय करावे ?
माझे तोंड पूर्ण उघडत नाही आहे. मी गुटखा वगैरे काहीही खात नाही. तोंड जबरदस्तीने उघडायचा प्रयत्न केला तर कानाखाली एकीकडून खूप ञास होत आहे. नेमकं काय आहे हे यावर उपाय?
जर एखाद्या मुलीला आई नाही. वडील सोबत नाहीत(व्यसनी)आहेत तर तिला कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेता येऊ शकतो का?
सिगारेट ओढल्याने सर्दी जाते का?