घर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक उपकरणे महावितरण इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिसिटी

घरातील वीज जाते आणि येते मध्ये काय घडते, वीज गेल्यावर व आल्यानंतर काय खबरदारी घ्यावी ?

1 उत्तर
1 answers

घरातील वीज जाते आणि येते मध्ये काय घडते, वीज गेल्यावर व आल्यानंतर काय खबरदारी घ्यावी ?

29
घरातील वीज जाते आणि येते… मध्ये काय घडते?वीज गेल्यावर व आल्यानंतर काय खबरदारी घ्यावी?

_पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, आपण वीज वितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. वीज का गेली, का जाते, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत नसते. तसेच वीज जाते आणि येते, या मधल्या काळात काय घडते, हे जाणून घेण्याची गरज आहे._

*यंत्रणा जोखमीची*
रात्री-अपरात्री वीज गेल्यानंतर काही वेळातच ती परत येते. विजेची यंत्रणा अशी आहे की, ती चालू अथवा बंद करण्यासाठी व्यक्तीची गरज लागते. शिवाय या यंत्रणेत जिवाचा धोका असतो. रात्री-अपरात्री गेलेली वीज काही वेळात परत येते, तेव्हा कोणीतरी त्या पावसात-अंधारात स्वत:चा जीव धोक्यात घालून खांबावर चढलेला असतो. तेव्हा कुठे वीज येते. त्यामुळे वीज यंत्रणेवर दोषारोप करण्यापेक्षा त्याच्यातील गुंतागुंत समजून घेतली पाहिजे.

*सारा पसारा उघड्यावर*
पारंपरिक अथवा अपारंपरिक स्रोतांपासून देशाच्या कोन्या-कोपऱ्यातून निर्माण झालेली वीज ग्राहकांच्या दारात आणणे तेवढे सोपे नाही. त्यासाठी लाखो किलोमीटर वीजवाहिन्यांचे जाळे देशात सर्वदूर पसरलेले आहे. त्याला ‘ग्रीड’ म्हणतात. हा सारा पसारा उघड्यावर आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होऊन त्यात बिघाड होण्याची शक्यता असते. चक्रीवादळ, पूर, रस्ते अपघात यामुळे यंत्रणा कधी कधी ठप्प होते. एखादी उच्चदाब वाहिनी कोसळली तर कधी एखादा जिल्हा किंवा काही तालुके अंधारात जातात, तर कधी हा बिघाड गाव किंवा काही भागापुरता मर्यादित असतो.

*हानी टाळण्यासाठी यंत्रणा*
दुसरी बाब म्हणजे वीज खांबात विद्युतप्रवाह उतरू नये यासाठी चॉकलेटी रंगाचे चिनी मातीचे इन्सुलेटर खांबावर बसविले जातात. बहुधा ते उन्हामुळे किंवा विद्युतप्रवाहामुळे गरम होतात व त्यावर पावसाचे थेंब पडताच त्याला तडे जातात, ज्यामुळे वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो आणि लगेचच आपात्कालिन यंत्रणा कार्यान्वित होऊन फीडर (वीजवाहिनी) बंद पडतो. जर हा फीडर बंद पडला नाही तर जीवित वा वित्तहानी होण्याचा धोका असतो.

*बिघाड शोधणे जिकिरीचे*
जेव्हा वीजपुरवठा अचानक खंडित होतो, तेव्हा वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही, याची खात्री करत असतात. वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फीडर चालू केला जातो. जर फीडर पुन्हा ट्रीप झाला (बंद पडला) तर मात्र बिघाड झाल्याचे घोषित करण्यात येते. तथापि, बिघाड शोधणे जिकिरीचे असते. ऊन-वाऱ्याची, पावसाची अथवा अंधाराची तमा न करता ही शोध मोहीम हाती घेतली जाते. कधी बंद पडलेल्या वाहिनीवरील सर्व खांब तपासावे लागतात, तर कधी हा बिघाड काही खांबांदरम्यान सापडतो.

*वीज गेल्यास काय करावे आणि काय करू नये?*

👉 आपल्या घरात ईएलसीबी (अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर) असणे गरजेचे आहे, जेणेकरून घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाला तर वीजपुरवठा बंद होऊन जीवितहानी टाळता येईल.

👉अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे. गरजेनुसार त्याची तपासणी करावी.

👉वीज उपकरणे किंवा वायरिंग ओलाव्यापासून किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी.

👉वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी.

👉विद्युत खांबाला व ताणाला जनावरे बांधू नयेत.

👉 वीजपुरवठा खंडित झाल्यास 15 ते 20 मिनिटे थांबूनच वीज कंपनीला संपर्क करावा.

👉बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा.

👉विजेच्या तारा तुटल्यास त्याला हात लावू नये. तातडीने महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाला अथवा १९१२, १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर माहिती द्यावी.






उत्तर लिहिले · 11/6/2018
कर्म · 569205

Related Questions

इलेक्ट्रिक केटलच्या भागांची नावे कोणती आहेत?
इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज म्हणजे काय?
मला घरी बसून इलेक्ट्रिकल के काम मिळू शकते?
मोबाईल मधील बॅटरी किती चार्ज करावी?
पिस्टन रिंग्ज कोणकोणत्या प्रकारच्या असतात?
एकच स्कूटर पेट्रोल आणि इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी बाजारात उपलब्ध आहे का?
ऑप्टिकल फायबर म्हणजे काय?