इलेक्ट्रॉनिक्स फोन आणि सिम इलेक्ट्रिकल

मोबाईल मधील बॅटरी किती चार्ज करावी?

1 उत्तर
1 answers

मोबाईल मधील बॅटरी किती चार्ज करावी?

5
कॅमेरा, स्क्रिन आणि त्याचा रॅम किती आहे हे लक्षात घेवून मोबाईल खरेदी केला जातो. पण, जस-जसे मोबाईल आपली गरज बनतो तसे आपण त्याच्या बॅटरी संदर्भात अधिक जागरूक रहायला लागतो. थोडे जरी चार्जिंग कमी असले तरी त्याला लगेच चार्जिंग लावले जाते. लोकांचे मोबाईल वेड पाहता काही अफवा पसरवल्या गेल्या आहेत. त्या अफवांवर विश्वास ठेवून तुम्ही मोबाईलची अधिक काळजी घ्यायला लागता. आज आपण अशाच काही व्हायरल होणाऱ्या अफवांमागील वास्तव नक्की काय आहे याची माहिती घेवू.
╔══╗
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
_*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
🔹फोन रात्रभर चार्जिंगला लावला असता त्याची बॅटरी खराब होते हे खोटे आहे. आजकाल जितके स्मार्टफोन्स बाजारात येतात त्या सर्व फोन्सना इंटरनल सर्किट असते. तुमचा फोन १०० टक्के चार्ज झाल्यानंतर हे सर्किट फोनची पावर बंद करते. त्यामुळे तुम्हालाही जर रात्रभर फोन चार्जिंगला लावून झोपण्याची सवय असेल तर Don’t Worry. 
 🔹चार्जिंगला लावला असताना त्यावर बोलणे किंवा फोनचा वापर करणे हे धोकादायक असल्याचे तुम्ही ऐकले असेल. फोन गरम होवून स्फोट होण्याची शक्यता असते असेही म्हणतात. पण, ही एक अफवा आहे. तुम्ही असे केल्यास फक्त फोनच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला धोका असतो. 
𓅂 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 
 🔹काही लोकांना मोबाईलमध्येअनेक ॲप्स भरून ठेवण्याची आवड असते. त्याचा रोजच्या दैनंदीन जीवनात काहीही उपयोग नसला तरी मोबाईल भरलेला असावा म्हणूनही काही लोक ॲप्स डाऊनलोड करून ठेवतात. अशा लोकांना मोबाईलची बॅटरी लवकर संपण्याची भिती वाटते. तुमच्या मोबाईलमध्ये जास्त ॲप्स असतील तर बॅटरी लवकर संपतनाही. तर तुम्ही त्या ॲपचा किती वापर करता यावर मोबाईलची बॅटरी कितीवेळ टिकेल हे अवलंबून असते.
𓅂
🔹३ जी नेटवर्कपेक्षा ४ जीमध्ये अधिक बॅटरी अशीही एक अफवा आहे. पण, खरी परिस्थिती अशी नसून जर तुमच्या मोबाईलमध्ये ३जी आणि ४जी नेटवर्कची सिग्नल क्वालिटी जर सेमच असेल तर बॅटरी एकाच स्तरावर संपेल.
𓅂
🔹लॅपटॉपवरून जर तुम्ही मोबाईल चार्ज केला तर ती बॅटरीअधिक काळ टिकत नाही. पण, खरी गोष्ट अशी आहे की, चार्जरने मोबाईल चार्ज केला तर तो लवकर चार्ज होतो आणि लॅपटॉपने मोबाईल चार्ज होण्यास उशीर होतो.

🔹मोबाईलचे ब्लुटूथ आणि जीपीएस ऑफ ठेवल्याने बॅटरी अधिक चालते असे म्हटले जाते. मात्र, हे खरे नसून ते ऑफ ठेवल्याने मोबाईलवर काहीही फरक पडत नाही. जीपीएस आणि ब्लुटूथ ऑफ ठेवावे कारण यामुळे तुमच्या मोबाईलचा डेटा सेफ राहतो.
---------------------------------------------
९८९०८७५४९८
_*✍माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव*_
-----------------

Related Questions

इलेक्ट्रिक केटलच्या भागांची नावे कोणती आहेत?
इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज म्हणजे काय?
मला घरी बसून इलेक्ट्रिकल के काम मिळू शकते?
पिस्टन रिंग्ज कोणकोणत्या प्रकारच्या असतात?
एकच स्कूटर पेट्रोल आणि इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी बाजारात उपलब्ध आहे का?
ऑप्टिकल फायबर म्हणजे काय?
इलेक्ट्रीक बील माफ होणार आहे काय ?